महानगर गॅस लिमिटेड...

 जास्त स्मार्टसुरक्षितसोयीस्कर

महानगर गॅस लिमिटेड आता व्हॉट्सॲपवरून पीएनजी मीटर रीडिंग स्वीकारते

02 जुलै 2025, मुंबई : महानगर गॅस लिमिटेडभारतामधील एक मोठी शहर गॅस वितरण कंपनीग्राहकांशी होणारे आदानप्रदान अधिक सुरळीत करण्यासाठीआता व्हॉट्सॲपमार्फत पीएनजी मीटर रीडिंग पाठवण्याचा वापरकर्त्यांसाठी सोपा पर्याय सादर करून बिलिंग अधिक सोयीचे करत आहे.

घरगुती ग्राहक आता एमजीएलच्या अधिकृत व्हॉट्सॲप खात्यावरून आलेल्या विनंतीला उत्तर देताना त्यांच्या पीएनजी मीटरचा फोटो पाठवू शकतातज्यामध्ये ‘‘मीटर रीडिंग (8 अंकीआणि मीटर क्रमांकदिसत असेलयामुळे बिलिंगची प्रक्रिया वेळच्या वेळी आणि अचूक रीतीने होईल.

व्हॉट्सॲपबरोबरचग्राहक अनेक विविध डिजिटल आणि पारंपरिक माध्यमांतून त्यांचे मीटर रीडिंग पाठवत राहू शकतात:

  • एमजीएल कनेक्ट ॲप -ॲपवर मीटरचा फोटो अपलोड करून
  • 9223555557 या क्रमांकावर <BP क्र.>स्पेस<5 अंक (काळे)> SMS करून
  • मीटर फोटो आणि रीडिंगसह support@mahanagargas.com येथे ईमेल पाठवून
  • वेबसाईट - www.mahanagargas.com येथे लॉगिन करून आणि त्यांचे मीटर रीडिंग प्रविष्ट करून
  • ग्राहकसेवा - (022) 6867 4500 / (022) 6156 4500 येथे कॉल करून

ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी त्यांच्या बीपी / सीए क्रवर नोंदवून घ्यावेतयासाठी ग्राहकसेवेला (022) 6867 4500 / (022) 6156 4500 येथे कॉल करावा आणि आमच्या डिजिटल उपक्रमांमार्फत त्यांना अधिक चांगली सेवा पुरवण्यास आम्हाला साहाय्य करावे.

ग्राहकांना आम्ही असे सुचवतो की कोणतेही तपशील देण्यापूर्वीत्यांनी एमजीएलच्या अधिकृत व्हॉट्सॲप खात्यावर निळी टिक असल्याची पडताळणी करून घ्यावी.

हा उपक्रम ग्राहकांना स्वच्छ ऊर्जा आणि सुलभ आणि सोयीस्कर प्रक्रिया उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एमजीएलच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K