*सीएटचा ऑफ-हायवे मोबिलिटीमध्ये पुढचा मोठा टप्पा – कॅम्सो ब्रँड कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसाय आता या प्रवासात सहभागी*
● सीएटने मिशेलिन ग्रुपच्या कॅम्सो कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईन व्यवसायाचे अधिग्रहण केले असून, यात श्रीलंकेतील मिडिगामा प्लांट व कोटुगोडा कास्टिंग प्रॉडक्ट प्लांट यांचा समावेश आहे. या पावलामुळे सीएटने आपल्या ऑफ-हायवे टायर्स (OHT) धोरणात कॅम्सो ब्रँडचे एकत्रीकरण केले आहे.
● युरोप व उत्तर अमेरिकेत कॅम्सो ब्रँडच्या मजबूत उपस्थितीमुळे सीएटला आता 40 हून अधिक जागतिक OEMs आणि प्रीमियम डिस्ट्रीब्युटर्स पर्यंत थेट प्रवेश मिळणार आहे. यामुळे कंपनीच्या जागतिक ऑफ-हायवे मोबिलिटी क्षेत्रातील अग्रगण्य स्थानाच्या दृष्टीकोनाला गती मिळेल.
● सीएटने श्रीलंकेत 171 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली असून, त्यामुळे 1483 नोकऱ्या सुरक्षित राहणार आहेत आणि श्रीलंकेची भूमिका जागतिक OHT हब म्हणून अधिक मजबूत होणार आहे.
ठाणे, डोंबिवली – 03 सप्टेंबर, 2025 : सीएट लिमिटेडने आपल्या ऑफ-हायवे टायर्स (OHT) वाढ धोरणात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, मिशेलिन ग्रुपचा कॅम्सो कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईन व्यवसाय अधिकृतरीत्या अधिग्रहित केला आहे. यामध्ये श्रीलंकेत असलेले मिडिगामा प्लांट व कोटुगोडा कास्टिंग प्रॉडक्ट प्लांट यांचा समावेश आहे. या व्यवहारामुळे सीएटला कॅम्सो ब्रँडचे जागतिक पातळीवर मालकी मिळवून दिली असून, पुढील तीन वर्षांच्या लायसन्सिंग कालावधीनंतर कायमस्वरूपी विविध श्रेणींमध्ये हस्तांतरित होईल.
कॅम्सो ब्रँडचे हे अधिग्रहण सीएटसाठी उच्च-नफा देणाऱ्या OHT क्षेत्रात जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी होण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या दशकभरात सीएटने मजबूत कृषी पोर्टफोलिओ उभारला आहे आणि कॅम्सोच्या कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट ट्रॅक्स व टायर्स विषयक कौशल्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित बळकटीमुळे सीएटला 40 हून अधिक जागतिक OEMs व प्रीमियम आंतरराष्ट्रीय OHT वितरकांपर्यंत प्रवेशाचे नवे दरवाजे उघडतील. या व्यवहारानंतर मिशेलिन कंपनी कॉम्पॅक्ट लाईन बायस टायर्स व कन्स्ट्रक्शन ट्रॅक्स संबंधित व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडणार आहे.
भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त एच.ई. संतोष झा म्हणाले : “श्रीलंकेत सीएट लिमिटेडच्या गुंतवणुकीबद्दल मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या काही वर्षांत भारत हा श्रीलंकेतील सर्वात मोठा एफडीआय (विदेशी थेट गुंतवणूक) स्रोत राहिला आहे आणि हा प्रवाह पुढेही कायम असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वामुळे गुंतवणूक-आधारित भागीदारी अधिक दृढ होत आहे. हे आमच्या नागरिकांसाठी सामायिक समृद्धीचे भविष्य उभारण्याच्या दृष्टीकोनाला बळ देते. भारताचा खासगी क्षेत्र श्रीलंकेत गुंतवणूक करत असल्यामुळे मला विश्वास आहे की दोन्ही देशांतील आर्थिक व व्यापारी संबंध अधिकाधिक मजबूत होत राहतील.”
सीएट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णब बॅनर्जी म्हणाले : “कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसायाचे एकत्रीकरण व कॅम्सो ब्रँडचे अधिग्रहण ही सीएटच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला पुढे नेणारी आणि ऑफ-हायवे मोबिलिटी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कंपनी होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे. उत्पादनं, क्षमता आणि बाजारपेठेतील आमच्या वाढलेल्या सामर्थ्यामुळे आम्हाला नव्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये प्रवेश करता येईल, पोर्टफोलिओ वाढवता येईल आणि आगामी काळात शाश्वत वाढ साधता येईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
सीएट स्पेशॅलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित तोलानी म्हणाले : “कॅम्सोच्या प्रीमियम ब्रँडचे व कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईनच्या उत्पादन क्षमतांचे सीएटमध्ये एकत्रीकरण हा आमच्या प्रवासातील परिवर्तन घडवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. आमचा तातडीचा भर हा सुगम संक्रमण, ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करणे आणि श्रीलंकेत आमच्या कार्यपद्धती अधिक मजबूत करणे यावर आहे.”
कॅम्सोच्या कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसायाचा समावेश आपल्या पोर्टफोलिओत करून सीएट आता आत्मविश्वासाने पुढे जात आहे आणि जगभरातील ऑफ-हायवे टायर्स व ट्रॅक्स क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह नाव बनण्याच्या दृष्टीकोनाला अधिक वेग देत आहे.
Comments
Post a Comment