विनझो चे पीएम केयर्स फंडमध्ये योगदान

विनझो आपल्या २० दशलक्ष युजर बेसना पीएम केयर्स फंडमध्ये 
योगदान देण्यासाठी प्रेरित करणार
मुंबई, २४ एप्रिल २०२०: कोविड-१९ च्या विरोधात भारताच्या लढाईमध्ये स्थानिक सोशल गेमिंग प्लॅटफॉर्म विनझो आपल्या २ कोटी युजर्सना या महामारीविषयी शिक्षित करून त्यांना मायक्रोट्रान्जॅक्शन पॉवर्ड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पीएम केयर्स फंडमध्ये योगदान देण्यासाठी प्रेरित करणार आहे.
विनझोने आपल्या प्लॅटफॉर्मवर खेळाडूंद्वारे जिंकल्या जाणार्या प्रत्येक गेमसाठी पीएम केयर्स फंड लाईव्ह काउंटर सुरु केले आहे. ते आता आपली मायक्रो-विनिंग पीएम फंडमध्ये देऊ शकतील. विनझोच्या स्थानीय प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला १ बिलियन गेम्स खेळले जातात, यांमध्ये भारताच्या दूरगामी भागातील लोकांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त युजर्स या फंडमध्ये थेट योगदानही देऊ शकतील.
विनझो गेम्सचे सहसंस्थापक सौम्य राठोड म्हणाले कि, "देश आणि सरकारचे सहयोग करणे हे आमचे कर्तव्य आहे, जे आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्ही आमची पोहोच आणि संलग्नता यांचा उपयोग करणार आहोत जेणेकरून देशाच्या दूरगामी भागामध्ये जाऊन स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे याचे प्रशिक्षण देऊ शकू. आमची अशी इच्छा आहे कि प्रत्येकाने आपली जिंकलेली रक्कम पीएम केयर्स फंडमध्ये द्यावी. आम्ही 'के.ओ.' कोरोना विरुद्ध या लढाईमध्ये सक्रिय भूमिका निभावण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.
मागील काही आठवड्यांमध्ये विनझोने आपल्या प्लॅटफॉर्मवर गेमिंगच्या गतिविधींमध्ये वाढ पहिली आहे. हि कंपनी सातत्याने आपल्या ॲपवर नवीन कन्टेन्ट प्रस्तुत करत आहे. युजर्सच्या मागणीनुसार ल्युडो, पबजी मोबाईल आणि फ्रिफायर सारखे गेम्स आपल्या प्लॅटफॉर्मवर निःशुल्क प्रस्तुत केले आहेत."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..