सॉलिट्यूड हॉलिडे ॲप....
सॉलिट्युड हॉलिडे अँप: प्रवासाची नवी क्रांती शुभांगी गोखले, सायली संजीव, अभिज्ञा भावे, यशोमान आपटे आदी सेलिब्रिटींसोबत करा जगाची सैर ट्रॅव्हल लव्हर्स आपल्या प्रवासप्रेमींसाठी अनोखा ॲप घेऊन येत आहेत. ‘सॉलिट्यूड हॉलिडे’ असे या ॲपचे नाव असून यामुळे आता प्रवास अधिकच अविस्मरणीय होणार आहे. या ॲपद्वारे आता सेलिब्रिटींसोबत जगभर प्रवास करण्याची संधी मिळणार असून प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या या ॲपमुळे प्रवासी त्यांच्या आवडीनुसार व बजेटनुसार प्रवासाचे नियोजन करू शकतात. या ॲपचा उद्देश प्रवाशांना जगभरातील अनोखी स्थळे शोधण्याची आणि सुखद आठवणी तयार करण्याची संधी देणे आहे. या ॲपमध्ये विविध प्रकारच्या प्रवाशांसाठी खास सेवा उपलब्ध आहेत. अँपच्या सहाय्याने प्रवासी त्यांच्या आवडीनुसार, बजेटनुसार खास प्रवासाचे पर्याय निवडू शकतात. प्रवाशांना एकत्र आणणारे कम्युनिटी फोरम हे या ॲपचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. याद्वारे जगभरातील इतर प्रवाशांशी संवाद साधता येईल, अनुभव शेअर करता येईल, आणि तुम्हाला हवे असलेले प्रवासासंबंधित सल्लेही मिळतील. ‘सॉलिट्यूड हॉलिडे’ ची खास वैशिष्ट्ये म्हणजे सेलिब्रिटी...