भू-वैज्ञानिकांसाठी ई-ट्रेनिंगची सुविधा
जीएसआयटीआयकडून भारतभरातील भू-वैज्ञानिकांसाठी ई-ट्रेनिंगची सुविधा
मुंबई, २० मे २०२०: - जीएसआयटीआय ही जीएसआयची हैद्राबादमधील प्रशिक्षण संस्था भारतभरातील भूवैज्ञानिकांसाठी १८ मे २०२० पासून एनजीसीएम (नॅशनल जिओ-केमिकल मॅपिंग) डेटा प्रोसेसिंग आणि एनजीपीएम (नॅशनल जिओ-फिजिकल मॅपिंग) यावर ई-ट्रेनिंगची सुविधा देत आहे.
डीडीजी आणि मिशन-V चे प्रमुख श्री. सीएच. वेंकटेश्वर राव, डीडीजी-आरटीडी व एफटीसीचे श्री. बिस्वजीत गंगोपाध्याय आणि जीएसआयटीआय हैद्राबाद येथील डायरेक्टर आणि ट्रैनिंग कोऑर्डिनेटर डॉ. तारकनाथ पाल यांच्या हस्ते अधिकृतरित्या या ई-ट्रेनिंग कोर्सेसचे उद्घाटन करण्यात आले. दोन्ही प्रशिक्षण ३० मे २०२० पर्यंत सुरू राहतील. जीएसआयचे भूवैज्ञानिक, केंद्रीय विभाग, राज्यांचे डीजीएम आणि भारतभरातील इतर संस्था या ई-ट्रेनिंग व्यासपीठाच्या माध्यमातून कनेक्ट होतील आणि जीएसआयटीआय त्यांना आगामी दिवसांमधील विविध थीम्सबाबत प्रशिक्षण देईल. यामधून जीएसआयटीआयद्वारे वर्षभरात सुरू करण्यात येणा-या ई-ट्रेनिंग प्रोग्रामची सुरूवात दिसून येते. यापैकी काही ई-ट्रेनिंग कोर्सेस जागतिक स्तरावर देखील राबवण्यात येतील.

जीएसआयने भारतभरात वर्ष २००१ व २००२ पासून अनुक्रमे ''नॅशनल जिओकेमिकल मॅपिंग (एनजीसीएम)'' आणि ''नॅशनल जिओफिजिकल मॅपिंग (एनजीपीएम)'' या महत्त्वाकांक्षी प्रोग्रामची सुरूवात केली आहे. बहुघटकीय विश्लेषणाचा वापर करत भारताचा राष्ट्रीय जिओकेमिकल बेसलाइन डेटाबेस तयार करणे आणि संपूर्ण देशासाठी विविध घटकांचे एकसंधी जिओकेमिकल मॅप्स तयार करणे हा एनजीसीएमचा प्रमुख उद्देश आहे. भूगर्भशास्त्राच्या भूगर्भीय वैशिष्ट्यांचे वर्णन करण्याकरिता गुणात्मक आणि परिमाणात्मक स्पष्टीकरणासाठी देशाचे गुरुत्व आणि चुंबकीय समोच्च नकाशे तयार करणे हा एनजीपीएमचा उद्देश आहे. हे मॅपिंग्ज १:५०,००० मापनावर अत्यंत पद्धतशीरपणे करण्यात आले आहेत आणि यामुळे खनिज उद्योग, कृषी उद्योग, पर्यावरण, वनीकरण आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रचंड प्रमाणात लाभ होईल.
जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (जीएसआयटीआय) मुख्यत्वे जगभरातील भूवैज्ञानिकांसाठी क्लासरूम, क्षेत्रीय प्रशिक्षण सत्र आणि प्रयोगशाळा-आधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यासाठी ओळखली जाते. त्यांचा व्यावसायिक व शैक्षणिक संस्थांमधील इंटरअॅक्टिव्ह प्रशिक्षण व्यासपीठ भूवीसामवाद उपक्रम देखील आहे. काळ परिवर्तनासह १९७६ मधील जीएसआयटीआयच्या स्थापनेपासून संस्था पहिल्यांदाच विशेषत: कोविड-१९च्या स्थितीमध्ये विविध विषयांवर आधारित ई-ट्रेनिंगचे आयोजन करण्यासोबत क्लासरूम लेक्चर्स, प्रयोगशाळा व क्षेत्रीय प्रशिक्षण देत आहे.

Comments
Post a Comment