‘वंदे गणपती’ गायिका सावनी रविंद्र

सावनी रविंद्रच्या वंदे गणपती गाण्याला संगीत रसिकांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद

सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रने मराठी, गुजराती तमिल, तेलगु, मल्याळम, कन्नडा आणि बंगाली अशा सात भारतीय भाषांमध्ये गाणी गाऊन बहुभाषिक रसिंकांवर आपल्या सुरांची मोहिनी घातली आहे. यानंतर नुकतीच तिने गणेशोत्सवानिर्मित्ताने ‘वंदे गणपती’ ही संस्कृत बंदिश गायली. ह्या गाण्याला सध्या संगीत रसिंकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.

संस्कृतमध्ये पदवी घेतलेल्या गायिका सावनी रविंद्रची ब-याच अवधीपासून संस्कृतमध्ये गाणे गाण्याची इच्छा होती. ही इच्छा ‘वंदे गणपती’ ह्या गाण्यातून पूर्ण झाली आहे.

गायिका सावनी म्हणते, “वंदे गणपती ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली बंदिश माझ्या आईच्या गुरू वीणा सदस्रबुध्दे ह्यांनी गायलेली आहे. त्यामुळे लहानपणापासून ह्या बंदिशीसोबत एक ऋणानुबंध जुळला आहे. पंडित काशीनाथ बोडस ह्यांची ही रचना सतत मनात रूंजी घालत राहिलीय. त्याच बंदिशीला कर्नाटिक शास्त्रीय संगीताची किनार देण्याचं काम माझा मित्र आर. संजय ह्याने केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना एक सकारात्मक मंगलमय गाणे रसिकांच्या भेटीला घेऊन आले. आणि ते रसिकांनी उचलून धरले, ह्याचा आनंद आहे.”

सावनीच्या कर्नाटक शास्त्रीय संगीतात सजलेल्या सुरांना अभिनेत्री आणि नृत्यांगना अदिती द्रविडने भरतनाट्यम शैलीत साकारल्याने हे गाणे व्हिज्युअल ट्रिट झाले आहे. डॉ. आशिष धांडे निर्मित ह्या गाण्याला व्हिज्युअल डायरी मोशन पिक्चर्सच्या श्रेयस शिंदे ह्यांनी चित्रीत केले आहे. टाइम्स म्युझिक स्पिरीच्युअलचे हे गाणे गणेश आराधनेत रसिकांना स्वरमयी साथ देत आहे.

 You Tube - 

https://www.youtube.com/watch?v=CfcV7JVCBL0&feature=youtu.be  

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight