स्पोर्ट्झ व्हिलेज

'स्पोर्ट्झ व्हिलेज’चे ॲक्टीव्ह क्लब प्रोग्रामच्या साथीने मुलांकरिता स्क्रीन टाईम अधिक उपयुक्त करण्याचे उद्दिष्ट     

भारत, 2020 – कोविड-19 महासाथीने केवळ वैश्विक अर्थकारणावरच मोठा परिणाम निर्माण केलेला नाही तर आपली जीवनशैली देखील प्रचंड प्रभावित केली हे सर्वांनाच ठाऊक आहे. घरातील मुलांची अवस्था देखील काही वेगळी नाही; ती स्वत:च्या घरांत कोंडून गेली. एका सर्वेक्षणानुसार मुलांमध्ये टाळेबंदीच्या काळात स्क्रीन समोर बसण्याचे प्रमाण 100 टक्क्यांनी वाढलेले दिसते. 

जी मुले अधिक काळ स्क्रीनसमोर बसतात त्यांच्यात मायओपिया होण्याचे किंवा टाळेबंदीमुळे शारीरिक हालचालीचा अभाव असल्याने वजन वाढण्याची जोखीम असते. मुले स्क्रीनवर जो वेळ घालवत आहेत त्यातील अधिकांश वेळेचा भविष्यात फायदा नसल्याने सध्या पालक वर्ग चिंतेत दिसतो. मुलांचा हा स्क्रीन टाइम सत्कारणी लागावा यासाठी पालक विविध पर्यायांच्या शोधात आहेत.    

नेमकी हीच गरज लक्षात घेऊन Sportz Village(स्पोर्ट्झ व्हिलेज) या भारताच्या सर्वात मोठ्या युवा क्रीडा मंचाने 4 ते 19 वयोगटातील मुलांसाठी ॲक्टीव्ह क्लब या विशेष कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या गुंतवून ठेवणाऱ्या सुदृढ आणि कौशल्य-आधारीत कार्यक्रमाद्वारे मुलांना त्यांच्या घरातच शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याचे तसेच क्रीडा प्रवासाला प्रोत्साहन देण्याचे स्पोर्ट्झ व्हिलेजचे उदिष्ट आहे. अगदी कमी कालावधीत ॲक्टीव्ह क्लब प्रोग्राम’ने 1,200 हून अधिक पालकांचा विश्वास संपादित केला. 

सध्या शाळा अनिश्चित काळासाठी बंद आहेत. मुलांची शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ऑफलाइन असलेल्या शाळा ऑनलाइन झाल्या. मात्र खेळ आणि शारीरिक शिक्षणाच्या दृष्टीने ऑनलाइन पर्यायाचा स्वीकार झालेला दिसत नाही. कोविड-बाधित किंवा कोविड-नसलेल्या मुलांनी आरोग्य, रोग प्रतिकारशक्ती तसेच आनंदाकरिता खेळण्याची आवश्यकता आहे. त्यांनी घरालाच स्वत:चे नवे मैदान करणे ही काळाची गरज आहे.   

ॲक्टीव्ह क्लब प्रोग्राम’चे फायदे

  • सुदृढ शारीरिक आरोग्य  
  • चांगले मानसिक स्वास्थ्य 
  • मित्रपरिवारासमवेत संवाद साधण्याची संधी 

मुलांच्या नियमित वेळापत्रकात क्रीडा तसेच तंदुरुस्तीचा सहभाग व्हावा आणि शारीरिक हालचालींबाबत सजगता निर्माण व्हावी हे Active club प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे. मुलांना केवळ खेळण्याची संधी देण्याची खातरजमा क्टीव्ह क्लब प्रोग्राम करत नसून त्यांचा क्रीडा प्रवास मजेदार करण्याच्या दृष्टीने शुभारंभ केला आहे. हा प्रशिक्षक-प्रणीत कार्यक्रम आहे. या माध्यमातून मुले आणि पालकांना निरनिराळे   ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासाचे धडे सबस्क्राईब करता येतील. जिथे प्रमाणित करण्यात आलेले प्रशिक्षक विविध वयोगटातील मुलांना त्यांच्या वयानुसार, विशिष्ट खेळाचे आणि तंदुरुस्त राहण्यासाठी असलेले क्रियाकलाप शिकवतील, त्याशिवाय अभ्यासक्रमातील सर्व शारीरिक क्रियाकलाप स्क्रीनवर ठरावीक अंतरावरून शिकविण्यात येणार असल्याने एखाद्याच्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल. 

जॉन ग्लोस्टर हे मागील 22 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताशी संबंधित असून ते 2004 – 2008 करिता भारतीय क्रिकेट संघाचे फिजियोथेरपिस्ट होते. तसेच सौमील मजमुदार हे स्पोर्ट्झ व्हिलेज’चे सहसंस्थापक, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते अॅक्टीव्ह क्लब प्रोग्रामच्या विकासाकरिता प्रयत्नशील आहेत. 

ॲक्टीव्ह क्लब प्रोग्रामशी निगडीत तंदुरुस्ती तसेच स्वत:च्या सहभागाविषयी बोलताना स्पोर्ट्झ व्हिलेज इंडियाचे चीफ क्वालिटी अँड परफॉरमन्स ऑफिसर, बोर्ड डव्हायजर, जॉन ग्लोस्टर म्हणाले की,मला या क्टीव्ह क्लब प्रोग्रामचा भाग असल्याचा आनंद वाटतो. मुलांना गुंतवून ठेवायचा हा एक कल्पक मार्ग आहे. मी एक व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून मुलांना योग्य वयात विविध क्रीडा तसेच शारीरिक क्रियाकलापांची गोडी लागली पाहिजे, असे माझे मत आहे. खेळामुळे केवळ शिस्तशीर जीवनशैलीची खातरजमा राहत नाही, तर त्यामुळे मुलांमध्ये टीमवर्क (सांघिक कौशल्ये), नेतृत्व आणि आत्मविश्वास यांसारखी काही सामाजिक-भावनिक कौशल्ये देखील रुजतात.” 

क्टीव्ह क्लब प्रोग्रामविषयी बोलताना स्पोर्ट्झ व्हिलेजचे सह-संस्थापक, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सौमील मजमुदार म्हणाले की, “मुलांच्या नियमित वेळापत्रकात तंदुरुस्ती आणि खेळ रुजविणाऱ्या क्रांतिकारी पर्यायाच्या दृष्टीने आमचे उद्दिष्ट आहे. मुलांचा बहुतांशी वेळ हा स्क्रीनसमोर जातो. त्यांचा हा स्क्रीनटाईम अधिक फायदेशीर असणे आवश्यक ठरते. मुलांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती याकडे आमचा कायम कटाक्ष असतो. सर्वोत्तम तंदुरुस्त तज्ज्ञ आणि प्रशिक्षकांचा समावेश असेल याबाबत आम्ही आग्रही आहोत. ज्यामुळे मुलांना या अभ्यास कार्यक्रमात आनंदाने सहभागी होता येईल. कोविड-बाधित किंवा कोविड नसलेली मुले सुदृढ आणि क्रियाशील असावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”  


  

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..