आदित्य रॉय कपूर बनला आपली स्वत:ची '3डी बोलकी बाहुली' असलेला बॉलीवूडचा पहिला अभिनेता !

फिल्ममेकर अनुराग बासुच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या लूडो ह्या चित्रपटाची सध्या सर्वत्र वाखाणणी होत हे. ह्या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरला शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांची कला वगत असते. ह्या सिनेमात आदित्यची ऑल्टर इगो’  दाखण्यात  आलेली त्याच्यासारखी हुबेहुब दिसारी बाहुली सुप्रसिध्द शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये ह्यांनी बनवली आहे. 3डी प्रींटिंग प्रालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसाराखी दिसारी बाहुली बनवलीय. आदित्य रॉय कपूर  आपली स्वत:ची अशा पध्दतीच 3डी बाहुली असलेला पहिला अभिनेता बनला आहे.

 

ह्याविषयी अधिक माहिती देताना शब्दभ्रमकार रामदास पाध्ये म्हतात, अनुराग बासु ह्यांना आम्ही हुबेहुब दिसा-या बाहुल्या बनवू शकतो,ह्याविषयी माहिती होती. ते आमच्याकडे आले असता, आम्ही काही संग्रही असलेल्या बाहुल्या दाखवल्या. तेव्हा त्यातले बारकावे पाहून ते चकित झाले होते.

 

शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांच्या कलेत 53 वर्षांचा गाढा नुभव असलेल्या रामदास पाध्येंच्या संग्रही 2200 पेक्षा जास्त बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाेच ह्या क्षेत्रात नाव कमावलेले सत्यजित पाध्ये तर इंडियाज गॉट टैंलेंट, केबीसी’, बिग बॉस अशा लोकप्रिय शो मध्येही दिसले आहेत.

 

सत्यजीत सांगतात, "आदित्यची 3डी बाहुली बनवताना आम्ही त्याचा 3 डी स्कॅन केरून घेतला. त्यानंतर आदित्यचे काही 3 डी फोटो काढले. आणि मग त्यानूसार, आम्ही फायनल 3डी प्रीटेंड बाहुली तयार केली. आदित्यच्या ह्या बाहुलीचं वैशिष्ठ्य ठेवायचं होतं, त्याची हेयरस्टाइल आणि त्याच्या चेह-यावरचं लांबसडक नाक. 

 

ही बाहुली बनवल्यावर पुढे होता सर्वात कठीण भाग. तोंडाची ठेवण, भुवया, आणि पाप्या ह्यांची हालचाल करायची होती. मग इथे रामदास पाध्ये ह्यांचा प्रगाढ अनुभव कामी आला. ह्यानंतर आदित्यला सत्यजीतने ट्रेनिंग दिले.

 

ट्रेनिंगच्या अनुभवाविषयी सत्यजित सांगतात, आदित्यच्यासोबत काम कर्याचा अनुभव चांगला होता. तो मन लावून ही कला आत्मसात कर्यामध्ये लक्ष द्यायचा. मी त्याच्या घरी त्याला शिकवायला जायचो. शब्दभ्रमकार बनण्याचे तंत्रशुध्द शिक्षण आदित्यने खूप लवकर शिकले. शुटिंगच्या दरम्यान मदतीसाठी मी उपस्थित होतो. पण मला सांगायला आनंद वाटतो, की, आदित्यने अनेक बारकाव्यांसह ही भूमिका चांगली वठवलीय. 

आदित्य रॉय कपूरने सत्यजीतला फिल्मनंतर मेसेज करत त्याचे आभार मानले आहेत. आदित्यने म्हटलंय, ह्या चित्रपटातल्या माझ्या भुमिकेच्या तयारीसाठी आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्याकडून ही सुंदर कला शिकणे हा एक अद्भुत अनुभव होता. आपल्या वडिलांना (रामदास पाध्ये) ह्यांनाही माझा परफॉर्मन्स आवडेल अशी आशा आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..