कॅनरा बँक

कॅनरा बँके तर्फे मुंबई मेगा रिटेल एक्स्पोचे आयोजन

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२१-  कॅनरा बँके तर्फे आज गाला ऑडिटोरियम, पटुक कॅम्पस सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथे मेगा रिटेल एक्स्पो कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. एक्स्पो मध्ये मुंबई आणि आसपासचे आघाडीचे बिल्डर्स आणि विकासक, महत्त्वपूर्ण ऑटोमोबाईल वितर, आघाडीच्या शिक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर बँके कडून दक्षिण मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर व ठाणे येथील सेलिब्रेशन बँक्वेट हॉल येथेही एक्स्पोचे एकाच दिवशी आयोजन करण्यात आले होते. 

या एक्स्पोला उपस्थित मान्यवरांमध्ये जनरल मॅनेजर, रीटैल ऐसेट आणि मार्केटिंग- हेड ऑफिस- बंगलोर श्री आर पी जयस्वाल, चीफ जनरल मॅनेजर - मुंबई सर्कल श्री पी. संतोष, रिजनल ऑफिस १ चे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री मनोज कुमार दास, डेप्युटी जनरल मॅनेजर रिजनल ऑफिस २ श्री प्रवीण काबरा आणि  ठाणे रिजनल ऑफिस च्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती के बी गीता व अन्य मान्यवरांचा समावेश होता.

या एक्स्पो मध्ये सर्व मान्यवरांनी ग्राहकांशी संवाद साधला आणि एक्स्पो मधील सर्व स्टॉल्सना भेट दिली.  एक्स्पो मध्ये उपस्थित असलेल्या रिटेलर्स नी त्यांच्या स्टॉलवर त्यांची विविध उत्पादने प्रदर्शित केली होती.  आज आयोजित करण्यात आलेल्या या एक्स्पो मध्ये  रू. 224.30 कोटी च्या कर्जांचे वाटप करण्यात आले.  

या एक्स्पो बरोबरच कॅनरा बँकेने नानावटी हॉस्पिटलच्या सहकार्याने एक्स्पो ला भेट देणार्‍या लोकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणीचेही आयोजन केले होते. या एक्स्पोच्या दरम्यान बँकेकडून  कोविड-१९ साठी आवश्यक सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले,  यामध्ये प्रवेश करतांना थर्मल स्कॅनिंग करणे, मास्क आणि सॅनिटायझेशन स्टेशन्स, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच थोड्या लोकांना प्रवेश देणे इत्यादींचा समावेश आहे.

कॅनरा बँके विषयी -

एक ग्राहकाभिमुख बँक म्हणून कॅनरा बँकेची स्थापना ही कर्नाटकातील त्या काळातील एक छोटे शहर असलेल्या मंगलोर येथे जुलै १९०६ मध्ये एक प्रसिध्द समाजसेवक व द्रष्टे नेते श्री अम्मेबल सुब्बा राव पै यांनी केली. एप्रिल २०२० मध्ये सिंडिकेट बँकेच्या विलिनीकरणानंतर बँकेने देशभरांतील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक हा दर्जा  प्राप्त केला आहे. बँकेच्या आता १०४९८ स्थानीय शाखा, १३०२३ एटीएम्स आहेत. आपल्या शतकाहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत बँकेने विविध स्तरांवर काम केले आहे.  १९६९ मध्ये राष्ट्रीयकृत बँक झाल्यानंतर नेहमीच बँकेने राष्ट्रीय स्तरावरील एक खेळाडू म्हणून तसेच भौगोलिक स्तरावर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे.  ऐशीच्या दशकात त्यांनी वैविध्य आणले. जून २००६ हे वर्ष बँकेचे शताब्दी वर्ष होते. अशा या मोठ्या कारकिर्दीत बँकेने अनेक महत्त्वपूर्ण घटना पूर्ण केल्या आहे.  आजमितीस कॅनरा बँक ही आघाडीच्या भारतीय बँकांपैकी एक म्हणून गणली जाते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..