बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लिमिटेड

 बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लिमिटेडच्या इक्विटी शेअर्सची खुली भागविक्री 24 मार्च, 2021 रोजी सुरू होईल

·       Rs.498 – Rs.500 दरम्यान प्रत्येक इक्विटी शेअरची किंमत असेलदर्शनी मूल्य प्रत्येकी Rs.5 (इक्विटी शेअर)

·       बिड/ऑफर सुरू होण्याची तारीख - बुधवार, 24 मार्च 2021 आणि बिड/ऑफर समाप्त होण्याची तारीख - शुक्रवार, 26 मार्च 2021

·       किमान बोली (मिनिमम बिड लॉट) 30 समभाग आणि त्यानंतर 30 समभागांच्या पटीत

·       फ्लोअर किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 99.6 पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 100 पट आहे.

मुंबई, 22 मार्च, 2021 बार्बेक्यू-नेशन हॉस्पिटॅलिटी लिमिटेड (ज्याला बीएनएचएल किंवा कंपनी असे संबोधले जाईल) ही टेक्नोपॅक अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड (टेक्नोपॅर्क रिपोर्ट”) यांनी 19 फेब्रुवारी 2021 रोजी तयार केलेल्या रिपोर्टनुसार भारतातील एक आघाडीची कॅज्युअल डायनिंगची चेन (30 सप्टेंबर 2020 रोजी आउटलेट्सच्या संख्येनुसार) आहे. बुधवार,  24  मार्च 2021 रोजी त्यांच्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या (आरंभिक ऑफर” / “आयपीओ”) च्या इनिशिअल पब्लिक ऑफरशी संबंधित बोली / ऑफर कालावधी सुरू होईल आणि शुक्रवार26 मार्च 2021 रोजी बंद होईल. या ऑफरसाठीचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर Rs.498- Rs.500 असा ठरविण्यात आला आहे. कंपनी आणि टमारा प्रायव्हेट लिमिटेड (टीपीएल) हे  विक्रेते समभागधारक बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या  (BRLMs) सल्ल्याने अँकर इन्व्हेस्टर्सच्या सहभागाविषयी विचार करू शकतातजे बिड/ऑफर ऑपरेटिंग दिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी 23 मार्च, 2021 रोजी  असेल. 

आयपीओ हा फ्रेश इश्युअन्स आहे. याचे दर्शनी मूल्य Rs.5 आहे आणि एकूण मूल्य 180 कोटीपर्यंत आहे आणि 54,57,470 इक्विटी शेअर्सपर्यंत विक्री करण्याची ऑफर असून त्यांचे दर्शनी मूल्य प्रत्येकी Rs.आहेजे विक्रेत्या समभागधारकांकडून आहे. Rs.2 कोटीपर्यंचे शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. या फ्रेश इश्युमधून संकलित होणारी रक्कम विस्तारीकरण आणि नवीन रेस्टॉरंट्स उघडण्यासाठी कंपनीकडून वापरण्यात येईलकंपनीतर्फे घेण्यात आलेल्या काही थकीत कर्जांची एकत्रित पूर्वपरतफेड (प्रिपेमेंट) किंवा परतफेड करण्यासाठी किंवा इतर कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

टेक्नोपॅक रिपोर्टनुसार बीएनएचएलने भारतात ओव्हर द टेबल बार्बेक्यू फॉरमॅट संकल्पनेची सुरुवात केली. बार्बेक्यू नेशनच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या सयाजी हॉटेल्स लिमिटेड (SHL) यांनी 2006 साली पहिले बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंट सुरू केले. बीएनएचएलने आपले पहिले बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंट 2008  साली सरू केले आणि एसएचएलच्या मालकीची आणि संचलित करण्यात येणारी रेस्टॉरंट्स 2012पर्यंत संपादित केली. 31 डिसेंबर 2020पर्यंत बीएनएचएलतर्फे सध्या भारतातील 77 शहरांमध्ये 147 बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंट्सचे  (खुलीतात्पुरती बंद असलेली आणि बांधाकामांतर्गत असलेली समाविष्ट) आणि यूएईओमान आणि मलेशिया या 3 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय बार्बेक्यू नेशन्सचे संचलन करत आहे

बीएनएचएलने रेड अॅपल किचन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचा 61.35% हिस्सा (फुल्ली डायल्युटेड आधारे) संपादित करत आपल्या ऑफरिंगचे विस्तारीकरण केले आहे. रेड अॅपल किचन कन्सल्टन्सीची ‘टोस्कानो’ या ब्रँडनावांतर्गत पुणेबंगळुरू आणि चेन्नई येथे ‘ला टेरेस’ आणि ‘कॉलेज’ या नावाची रेस्टॉरंट्स मालकीची आहे आणि त्यांच्यातर्फे ती संचलित करण्यात येतात. त्याचप्रमाणेआपल्या व्हॅल्यू सेगमेंटमध्ये भारतीय पदार्थ आ-ला-कार्ट आधारे उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने यूबीक्यू बाय बार्बेक्यू नेशन सादर करून आपल्या ऑफरिंगचे अधिक विस्तारीकरण केले आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत भारतातील 77 शहरांमध्ये आपल्या विद्यमान किचन सुविधेच्या माध्यमातून यूबीक्यू बाय बार्बेक्यू नेशनअंतर्गत डिलिव्हरी उपलब्ध करून देत होती. डिलिव्हरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ‘ग्रिल्स इन द बॉक्स’ आणि ‘मील्स इ द बॉक्स’ या दोन इतर प्रॉडक्टशिवाय वर नमूद केलेली सेवा उपलब्ध करून देण्यात येत होती.

या इश्युसाठी बीआरएलएम म्हणून आयआयएफएल सिक्युरिटीजअॅक्सिस कॅपिटल लिमिटेडअॅम्बिट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिक्युरिटीज अँड एक्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यु ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर आवश्यकत्ता) 2018 च्या नियमनांच्या नियम 6(2) चे अनुपालन करून आणि बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून ही ऑफर देण्यात आली आहे. या प्रक्रियेनुसार क्वालिफाइड इन्स्टिट्युशन बायरर्सना प्रमाणानुसारी पायाच्या आधारे (क्यूआयबी आणि असे पोर्शन्सक्यूआयबी पोर्शन) नेट ऑफरच्या किमान 75% ऑफर उपलब्ध असेल. आमची कंपनी आणि टीपीएल बीआरएलएमच्या सल्ल्याने क्यूआयबीचा 60%पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना स्वेच्छाधीन आधारे (अँकर गुंतवणूकदार पोर्शन) वाटप करू शकतेज्यापैकी किमान एक-तृतियांश फक्त स्थानिक मच्युअल फंडांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असेल. अँकर गुंतवणूकदार वाटप किमतीएवढ्या किंवा त्याहून अधिक किमतीसाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून वैध बोली प्राप्त होण्यावर हे अवलंबून असेल.  क्यूआयबी पोर्शनचे (अँकर गुंतवणूकदार पोर्शन वगळता) 5% केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणानुसारी वाटपासाठी उपलब्ध असतील आणि क्यूआयबी पोर्शनची शिल्लक सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांना प्रमाणानुसारी वाटपासाठी उपलब्ध असतीलज्यात म्युच्युअल फंड्सचा समावेश असेलऑफर किमतीएवढी किंवा त्याहून अधिक किमतीची वैध बोली प्राप्त होण्यावर हे अवलंबून असेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..