सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची’ कलर्स मराठीवर!                               ५ एप्रिलपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा.

मुंबई ३१ मार्च, २०२१ : महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहेत्या मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारा कलर्स मराठी वाहिनीवरचा “सूर नवा ध्यास नवा” हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच येत आहे..... ‘सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची” हे नवं कोरं पर्व घेऊन!! या कार्यक्रमाचं हे चौथं पर्व असून ते १५ ते ३० वयोगटातील फक्त मुलींचंच हे विशेष पर्व असणार आहे. या अनोख्या पर्वात गायक मुलींना मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे दोन लाडके परीक्षक अर्थात सुप्रसिध्द गायकसंगीतकार नि अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे.  संगीतक्षेत्रातले हे दोन मान्यवर कलावंत ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या या पर्वातून शोध घेतीलमहाराष्ट्राच्या नव्या सुरांचा.... महाराष्ट्राच्या नव्या महागायिकेचा !! या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे सर्वांची लाडकी गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी. तर सज्ज व्हासुरांच्या या नव्या कोऱ्या मैफलीसाठी... “सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची!! “ ५ एप्रिलपासून सोम ते बुधवार रात्री साडे नऊ वाजता घरोघरी सूर घुमणार महाराष्ट्रातील विविधरंगी गायिकांचे... आता सुरांचा मंच गाजवणार महाराष्ट्राच्या लेकी !!!

या कार्यक्रमाबद्दल बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजनवायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “मराठी माणूस खरा खुरा श्रीमंत आहे तो त्याच्या कलासक्त मनामुळे. संगीत,गाणं,नृत्य,नाट्य,चित्रपट,साहित्ययावर मनापासून प्रेम करतो तो मराठी माणूस! प्रत्येक मराठी माणूस तानसेन नसला तरी कानसेन नक्की आहे. म्हणूनच महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगातील मराठी माणसांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं ते कलर्स मराठीच्या “सूर नवा ध्यास नवा “ ह्या कार्यक्रमाने. यावेळचं पर्व मुलींचं विशेष पर्व आहे. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतभरातून मराठी मुलींनी या पर्वासाठी निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवला. यातून विविध आर्थिक - सामाजिक स्तरातून मुलींची निवड या पर्वात झाली आहे. त्यामुळे हे पर्व मुलींचं केवळ गाण्याचं पर्व नसून महाराष्ट्रातील मुलींचा तो आतला आवाज आहे. यात मुलींच्या गळ्यातील सूर तर आहेच पण हृदयातला हुंकारही आहे. आजवरच्या तिन्ही पर्वांनी रसिकांची पावती मिळवली आहे. तशीच दाद हे पर्वदेखील मिळवेल अशी आशा करतो”.

कार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले की, “सूर नवा ध्यास नवा “ कार्यक्रम माझ्या हृदयाच्या खास जवळचा कार्यक्रम आहे. आणि यावेळचं पर्व तर महाराष्ट्रातील गायिकांचं पर्व आहे... त्यामुळे हा सिझन या प्रवासातला एक वेगळा अध्याय असणार आहे.  “सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची” हा महाराष्ट्रातल्या गायिकांचा शोध आहे. त्यामुळे सुरांचा हा अद्भुत सोहळा असणार आहे नि त्या सोहळ्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे.

अवधूत गुप्तेंसाठी हे पर्व खास असणार आहे कारण पहिल्यांदाच ते दुहेरी भूमिका पार पडणार आहेत म्हणजेच यावर्षी परीक्षणासोबत कार्यक्रमाचे निर्माते देखील आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, “सूर नवा ध्यास नवा” हा कार्यक्रम पहिल्या पर्वाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. यंदाच्या वर्षी मात्र जबाबदारी वाढली आहे कारणया चौथ्या पर्वाचा मी निर्माता देखील आहे. परीक्षक म्हणून मी जितक्या प्रामाणिकपणे ही जबाबदारी पेलत आलेलो आहेतितक्याच प्रामाणिकपणे निर्माता म्हणून देखील माझी जबाबदारी मोठी आहे...आमच्या सर्वांसाठी हे पर्व अत्यंत महत्त्वाचं आहे कारणकरोनाच्या आव्हानाला तोंड देत हे पर्व दिमाखदार करण्याचं आव्हान संपूर्ण टीमपुढे आहे. महत्वाची बाब म्हणजे या पर्वात महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगातील सर्वच महिलांना मानवंदना देणारं हे पर्व असेल. हे पर्व महिलांसाठी विशेष असेलच पण त्यांच्या कुटुंबासठीत्यामधील पुरूष मंडळीसाठी देखील विशेष असणार आहे”. 

कार्यक्रमाची सूत्रसंचालक स्पृहा जोशी कार्यक्रमाबद्दल म्हणाली, “यावेळी मुलींचं विशेष पर्व असल्याने खूपच आनंद होतो आहे... सेटवर प्रचंड उत्साह आहे . महाराष्ट्रातील तमाम मुलींना यानिमित्ताने एक नवी प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे. कलर्स मराठीचं खूप कौतुक कारण त्यांनी अशा पध्दतीचे पर्व आणले”. 

“सूर नवा ध्यास नवा” या  सूरतालाच्या मैफिलीत आपलं कौशल्य सिद्ध करण्यासाठी निवडक स्वयंसिद्धा सज्ज आहेत. सुरांची अलौकिक मैफिल "सूर नवा ध्यास नवा -आशा उद्याची" ५ एप्रिलपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर...

याच दिवसापासून जय जय स्वामी समर्थ रात्री ८.०० वा. आणि ८ एप्रिलपासून सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस गुरु – शुक्र रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.कलर्स मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K