जीसिम्सने केले बहुप्रतीक्षित हॉरर चित्रपट ‘बळीच्या टीझरचे अनावरण ,

बळीचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक विशाल फुरिया यांचे तर प्रमुख भूमिकेत आहे प्रेक्षकांचा लाडका स्वप्निल जोशी,

बळी’ चित्रपट १६ एप्रिल रोजी होतोय सर्वत्र प्रदर्शित ,

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार चित्रपटाचे प्रस्तुतकर्तेनवीन टीझरमुळे प्रेक्षकांमधील उत्कंठा शिखरावर

जीसिम्सची निर्मिती असलेल्या प्रस्तुतकर्ते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नवीन  बहुप्रतीक्षित ‘बळी’ या चित्रपटाच्या नवीन टीझरचे अनावरण नुकतेच करण्यात आलेयाआधी प्रकाशित झालेल्या दोन पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनलेल्या ‘बळीच्या या टीझरमुळे चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा आता शिखरावर पोहोचली आहे. ‘बळी’ हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे आहेप्रेक्षकांचा लाडका सुपरस्टार स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत आहे

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ऊसासे टाकणाऱ्या आवाजातील एका आईचे आर्त उद्गार कानी पडतात. ‘बाSSळा’ अशी आर्त हाक ती कुणालातरी घालते आहेत्यानंतर या चित्रपटाचा नायक एका पडक्या वाडारुपी रुग्णालयात कुणाचातरी शोध घेताना दिसतो. ‘मी इथेच आहे बाळा,’ असा त्या आईचा काहीसा घाबराघुबरा आवाज ऐकू येतोत्या पाठोपाठ ‘एलिझाबेथSS’ अशी हाक ऐकू येतेती आई ‘घाबरू नकोस...’ म्हणत आपल्या बाळाला धीर देवू पाहते....

काही सेकंदांचा हा टीझर अत्यंत घबराट निर्माण करतोअंगावर शहारा आणतोही एलिझाबेथ कोणत्यातील आईचे आणि तिचे काही नाते आहे काचित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी कुणाचा शोध घेत आहेअसे असंख्य प्रश्न आपल्याला हा टीझर पाहिल्यावर पडल्याशिवाय राहत नाहीतदरम्यान ‘समांतर आणि लपछपीच्या निर्मात्यांची प्रस्तुती’ असे शब्द पडद्यावर उमटतातआपल्याला दर्जेदार निर्मितीची हमी मिळतेआपण काहीतरी अभूतपूर्व असे पाहत आहोतअशी खात्री हा टीझर पाहून होते आणि ‘बळीबद्दलची उत्कंठा ताणली जाते.  

या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहेया चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्सने केली आहेया कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-’ आणि ‘समांतर-’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे

बळीची याआधी जी दोन पोस्टर आम्ही प्रदर्शित केली त्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहेत्यांच्याकडून चित्रपट कधी येतोयअशी विचारणा सुरु झाली आहेहॉरर चित्रपट म्हटला की विशाल फुरियापेक्षा आणखी चांगला पर्याय काय असू शकतोत्याशिवाय मराठी चित्रपटक्षेत्रातील एक सर्वोत्तम नट स्वप्निल जोशी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेसर्वकाही सर्वोत्तम असे जुळून आले आहेत्यामुळे हा चित्रपट मराठी चित्रपट रसिकांना एक वेगळा आणि अभूतपूर्व असा अनुभव मिळवून देईलहे आम्ही नक्की सांगू शकतो,” असे उद्गार निर्माते आणि ‘जीसिम्सचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले.  

लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आलेले दिग्दर्शक विशाल फुरिया ‘बळीबद्दल म्हणाले, “लपाछपीपेक्षाही हा वेगळा चित्रपट आहे आणि त्याची प्रचीती प्रेक्षकांना या टीझरवरून आली असेलयातील प्रत्येक नटाने आपली भूमिका उत्तमरित्या साकार केली आहेनिर्मितीमूल्यांमध्ये निर्मात्यांनी कोणतीच कसर सोडलेली नाहीत्यामुळे एक देखणा चित्रपट या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K