एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका घेऊन येत आहे आनंदाश्रू आणणारे क्षण आणि सरप्राईजेजची धमाल

दर आठवड्याला एण्‍ड टीव्‍हीने उत्‍साह, अपेक्षा व हास्‍यासह प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीन्‍सकडे आकर्षून घेतले आहे, ज्‍यामुळे प्रेक्षक देखील अधिकाधिक मनोरंजनाची मागणी करत आहेत. मालिका 'भाबीजी घर पर है'च्‍या आगामी एपिसोडमध्‍ये विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) आणखी एक असामान्‍य व्‍यवसाय स्‍वीकारतो, ज्‍यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होणार आहे. तो टूरिस्‍ट गाइड बनला असताना खूप धमाल व मौजमजा येते, पण अनिता भाभी (नेहा पेंडसे) त्‍याच्‍यामध्‍ये अडथळा निर्माण करते, पण का? मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील काटे (आश्‍ना किशोर) तिच्‍या परीक्षेमध्‍ये अनुत्तीर्ण होते. रागावलेला दरोगा हप्‍पू सिंग (योगेश त्रिपाठी) तिचा पाणउतारा करतो. पण एक अतिथी आहे, जो घरामध्‍ये स्‍वत:ची उपस्थिती दर्शवत त्याला याची जाणीव करुन देतो आणि तो काटेच्‍या खूप जवळ आहे. हा केसाळ व जंगली अतिथी कोण आहे? मालिका 'संतोषी माँ सुनाएं व्रत कथाएं'मध्‍ये धरतीलोकवर लग्‍नसराई सुरू झाली असताना देवलोकमध्‍ये युद्धाचा काळ सुरू झाला आहे. संतोषी माँ(ग्रेसी सिंग) आणि असुर राणी पौलोमी (सारा खान) यांच्‍यामध्‍ये युद्ध सुरू झाले आहे. मालिका 'गुडिया हमारी सभी पे भारी'मधील गुडिया (सारिका बहरोलिया) काय गोंधळ घालणार आहे? तिच्‍या बालपणीच्‍या मैत्रिणीचा एका मुलाशी विवाह होणार आहे, याबाबत ती हेवा करत त्‍या विवाहामध्‍ये अडथळा निर्माण करेल की जिवलग मैत्रिणीप्रमाणे साथ देईल? आगामी एपिसोडबाबत सांगताना आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्‍हणाले, ''अनिता ही कुटुंबाची एकमेव कमावती व्‍यक्‍ती आहे, ज्‍यामुळे विभुती नेहमीच पैसे कमावण्‍यासाठी विलक्षण व जलद पद्धतींचा शोध घेत असतो. भूत बंगला बघण्‍याची उत्‍कट इच्‍छा असलेल्‍या पर्यटकांचा गाइड बनलेला विभुती मनमोहन तिवारीला (रोहिताश्‍व गौड) त्‍याचे घर भूत बंगल्यामध्‍ये बदलण्‍यास सांगतो.'' योगश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्‍पू सिंग म्‍हणाले, ''जेव्‍हा किंग काँग गोरिला येईल तेव्‍हा घरातील शेर देखील घाबरून जाईल. संपूर्ण सिंग कुटुंब या हंकी गोरिलाचा सामना करते तेव्‍हा प्रेक्षकांना रोमांचपूर्ण सीक्‍वेन्‍स पाहण्‍याचा आनंद मिळेल. या एपिसोडसाठी शूटिंग करताना खूप धमाल आली आणि प्रत्‍येकाची गोरिलाचा पोशाख परिधान करण्‍याची इच्‍छा होती.'' सारा खान ऊर्फ असुर राणी पौलोमी म्‍हणाल्‍या, ''महादेवाच्‍या (दिनेश मेहता) पुढील परीक्षेची वेळ आली आहे, ज्‍यामुळे संतोषी माँ आणि पौलोमी यांच्‍यामध्‍ये मोठे युद्ध पाहायला मिळेल. यादरम्‍यान, पृथ्‍वीवर रिंकी (प्रिया वर्मा) व देवेश त्रिपाठी (धीरज राय) यांच्‍या विवाहाची तयारी सुरू असते. यावेळी दुष्‍ट शक्‍तींचा विजय होईल का?'' सारिका बहरोलिया ऊर्फ गुडिया म्‍हणाली, ''भाषा ही एखाद्याच्‍या मनातील भावना व्‍यक्‍त करण्‍याचा सोपा मार्ग आहे. इंग्रजी भाषा काही वेगळी नाही, तर मग आपण त्‍या भाषेचा आग्रह का करावा? आगामी एपिसोडमध्‍ये गुडिया एका विलक्षण स्थितीचा सामना करणार आहे, जेथे एक मुलगा भाषा माहित नसल्‍यामुळे तिच्‍या मैत्रिणीला नकार देतो. यामधून शिकवण मिळेल आणि नाट्याचा उलगडा होईल.''

अमर्याद धमाल व ड्रामासाठी पहा 'संतोषी माँसुनाएं व्रत कथाएं' रात्री ९ वाजता, 'गुडिया हमारी सभी पे भारी' रात्री ९.३० वाजता, 'हप्‍पू की उलटन पलटन' रात्री १० वाजता आणि 'भाबीजी घर पर है' रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार