प्रसिद्ध अंकज्योतिषी जे सी चौधरी यांनी “जेसी न्यूम्मेरो ॲप” केले लॉन्च,  

व्यक्तिगत आणि कॉर्पोरेटना भविष्य वेध घेणे आता शक्य    

  • आपला भाग्यशाली आणि अशुभ अंक कोणता, जोडीदारासोबतचे सहजीवन, मुले, कंपनी, निवासी पत्ता, शहर, देश, मोबाईल, वाहन क्रमांक, शुभ रत्न याविषयीच्या सर्व प्रश्नांवर हे ॲप मार्गदर्शक ठरणार  
  • अँड्रॉईड आणि आयफोनवर अनुक्रमे गुगल आणि ॲपल प्लेस्टोअरवर उपलब्ध  

 27 मे, 2021: सुप्रसिद्ध अंकज्योतिषी आणि चौधरी न्यूम्मेरो प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष जे सी चौधरी यांनी अंकशास्त्राच्या 35 वर्षांच्या समृद्ध अनुभवातून ‘जेसी न्यूम्मेरोॲप’ची निर्मिती केली आहे.  या ॲपवर विविध अंकशास्त्र आधारीत घटक जसे की, मूलांक, प्रारब्धांक, नामां, अधिपती अंक इत्यादी मौल्यवान अंदाज आणि जवळपास अचूक भाकीत उपलब्ध होईल.     

हे ॲप अँड्रॉईड आणि आयफोनवर अनुक्रमे गुगल आणि ॲपल प्लेस्टोअरवर डाऊनलोडकरिता उपलब्ध आहे. 

अंकशास्त्र हे अतिशय अचूक भाकीत वर्तवणारे शास्त्र मानले जाते. अंक आणि एखाद्याच्या जीवनातील घटनाक्रम यांचा परस्पर संबंध असतो. अंकशास्त्राचा प्रमुख फायदा म्हणजे हे ज्ञान वेळ वाचवते आणि वाईट काळात संरक्षक उपाययोजना सुचवते. या यंत्रणेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तिचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणे शक्य होते.  

जेसी न्यूम्मेरो ॲपच्या साथीने उपभोक्त्याला नियमित भविष्यवेध, मासिक भविष्यवेध, वार्षिक भविष्यवेध, एखाद्याविषयीचे चांगले आकलन, गुंतवणुकीकरिता चांगले वर्ष आणि अशी अनेक प्रकारची माहिती मिळवता येईल.  

या मार्फत एखाद्याला त्याचे/तिचे शुभ-अशुभ अंक आणि तारखा, जोडीदार समवेतची अनुकुलता, मुले-बाळे, कंपनी, निवासी पत्ता, शहर, देश, मोबाईल, वाहन क्रमांक, शुभ रत्न इत्यादीची माहिती घेणे शक्य होते. चायनीज अंकशास्त्रानुसार हे ॲप अंदाज उपलब्ध करून देते. जसे की, लो-शू ग्रीड लोकांना कोणता अंक गायब आहे आणि तुमच्या ग्रीडमध्ये पुन्हा वापरला पाहिजे याविषयीचा अंदाज देते. त्यांच्या प्रभावाकरिता उपाय सुचवते.  

“जेसी न्यूम्मेरो ॲप”द्वारे एखाद्या व्यक्तीला जे सी चौधरी यांच्या समवेत वैयक्तिक सल्ला-मसलतीची केवळ वेळच नोंदवता येत नाही, तर तुमच्या कंपनीच्या न्यूमेरोलॉजिकल ऑडिटकरिता व्यवसायविषयक मार्गदर्शन सल्ला घेता येईल. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तिचा त्याच्या व्यावसायिक भागीदारासमवेत अनुकुलता कशाप्रकारची असेल, त्याचे/तिचे व्यावसायिक भागीदारासमवेत नियोजनाचा वेध घेता येईल.   

या ॲपच्या लॉन्चवर बोलताना चौधरी न्यूम्मेरो प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष जे सी चौधरी म्हणाले की, “अंकशास्त्राचा वापर प्राचीन काळापासून होत आला आहे. हे शास्त्र एखाद्याच्या भविष्याचा अगदी जलद आणि अचूक वेध घेते. माझ्या या अंकशास्त्र क्षेत्रातील 35 वर्षांच्या अनुभवाचे फलित म्हणजे हे प्लिकेशन आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर करून विस्तृत प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या शंकांचे समाधान करू शकतो. एखाद्याच्या भविष्यातील अनिश्चितता दूर करून आवश्यक ते उपाय सुचवू शकतो. हे अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर लोकांना लाभकारक ठरेल आणि जीवनात शांतता आणि समाधान आणेल अशी कामना करतो.” 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..