श्री. ब्रिज मोहन शर्मा - कॅनरा बँकेचे नवीन कार्यकारी संचालक 

बंगलोर, २७ मे २०२१ - श्री. ब्रिज मोहन शर्मा हे बि-कॉम ची पदवी (सुवर्णपदक विजेता), एम.कॉम (बिझनेस ॲडमिन, पदक विजेता) आणि सीएआयआयबी प्राप्त आहेत.

त्यांनी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स मध्ये १९८३ पासून काम करायला सुरूवात केली, त्यानंतर ते प्रगती करत पंजाब नॅशनल बँकेत चीफ जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहोचले.  आपल्या बँकिंग क्षेत्रातील ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.  त्यांनी पुणे आणि भोपाळ विभागाचे स्थानीय प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहेत.  तसेच ते क्लस्टर मॉनिटरींग हेड, ब्रॅन्च बिझनेस, वेस्टर्न इंडिया आणि इन्स्पेक्शन व कंट्रोल विभागाचे व्हर्टिकल हेड म्हणूनही काम पाहिले आहे.

त्यांच्या कडे ब्रॅन्च बँकिंग, कॉर्पोरेट क्रेडिट, रिटेल क्रेडिट, इन्स्पेक्शन आणि ऑडिट विभाग इत्यादी विभागांसह बँकिंग क्षेत्रातील विविध घटकांचा अनुभव आहे. 

त्यांनी दिनांक १९.०५.२०२१ पासून कॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्विकारला आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO