“महाराष्ट्राचा फेवरेट कोण’?” सुवर्णदशक सोहळा !

नामांकनातून कोण मारणार बाजी? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला !

 

मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकाररसिकांचे ज्या पुरस्कार सोहळयाकडे विशेष लक्ष असते असा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांपासून पुरस्कार वितरणापर्यंत सर्वच गोष्टी नावीन्यतेनं नटलेल्या असतातत्यात यंदाच्या सोहळयाची खासियत जरा वेगळी आहे. यंदाचा “महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा लोकप्रिय सोहळा ‘सुवर्णदशक सोहळा’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयात गेल्या १० वर्षातील दर्जेदार कलाकृतींचा गौरव केला जाणार आहे. ४ डिसेंबरला हा सोहळा रंगणार आहे.

झी टॉकीज आयोजित हा सन्मान सोहळा रसिकांनी दिलेल्या मतांवर अवलंबून असतो.झी टॉकीजची ही अभिनव संकल्पना मराठी सिनेसृष्टीत चांगलीच नावाजली गेली. यातील विजेत्यांची निवड थेट प्रेक्षकांकडून केली जाते. त्यामुळे या सुवर्णसोहळ्यात प्रेक्षक कोणाला महाविजेता ठरवणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. नुकतीच या सोहळ्यातील पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. “महाराष्ट्राचा फेवरेट कोण?” सुवर्ण दशक सोहळ्यामध्ये १२ श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये फेवरेट चित्रपटफेवरेट दिग्दर्शकफेवरेट अभिनेताफेवरेट अभिनेत्रीफेवरेट सहाय्यक अभिनेताफेवरेट सहाय्यक अभिनेत्रीफेवरेट खलनायकफेवरेट गीतफेवरेट गायकफेवरेट गायिका आणि फेवरेट पॉप्युलर फेसफेवरेट स्टाईल आयकॉन असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या सुवर्णदशक सोहळयाविषयी बोलताना ‘झी’च्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर श्री.बवेश जानवलेकर सांगतात, ‘’गेलं दशक हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. २०१० ते २०१९ या कालावधीत मराठी चित्रपट उद्योगाने वेगाने प्रगती केली. चित्रपटांची संख्या वाढलीचित्रपट निर्मीतीवरचा खर्चत्याचबरोबर प्रेक्षकांची तसेच चित्रपटगृहांचीही संख्या वाढली. मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्टया ही कमालीची प्रगती झाली. मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार गेला. जगभरातल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिमाखाने झळकू लागला. याच दशकात मराठी चित्रपटाने लोकप्रियतेबरोबरच बॉक्स ऑफिसवरही कोटींची मजल मारत विक्रमी झेप घेतली. आशय-विषय आणि सादरीकरणातील नवनवे मापदंड याच दशकात निर्माण झाले. सर्वार्थाने हे दशक मराठी चित्रपटांसाठी सोनेरी ठरलं. कोरोनामुळे काही काळ घडी विस्कळीत झालेली असली तरी आगामी काळात पुन्हा एकदा आपली मराठी चित्रपटसृष्टी डौलाने घौडदौड़ करेलयात मला शंका वाटत नाही’’.

यंदाच्या सुवर्णदशक सोहळयातील नामांकनाची यादी पुढील प्रमाणे .....

सर्वोत्कृष्ट चित्रपट   

२०१०- (मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)

२०११-(मी सिंधुताई सपकाळ)

२०१२-(काकस्पर्श )

२०१३-(दुनियादारी)

२०१४-(लय भारी)

२०१५-(डॉ. प्रकाश बाबा आमटे)

२०१६-(सैराट)

२०१७-(फास्टर फेणे)

२०१८-(मुळशी पॅटर्न)

२०१९- (हिरकणी)

 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक        

२०१०-संतोष मांजरेकर(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)

२०११-महेश मांजरेकर  (लालबाग परळ )

२०१२-महेश मांजरेकर (काकस्पर्श)

२०१३-संजय जाधव (दुनियादारी)

२०१४-निशिकांत कामत (लय भारी)

२०१५-परेश मोकाशी (एलिझाबेथ एकादशी)

२०१६-नागराज मंजुळे (सैराट)

२०१७-अदित्य सरपोतदार (फास्टर फेणे)

२०१८-प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न)

२०१९-संजय जाधव (खारी बिस्कीट)

 

 

सर्वोत्कृष्ट अभिनेता        

२०१०सचिन खेडेकर(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)

२०११-सचिन खेडेकर(ताऱ्यांचे बेट)

२०१२-सचिन खेडकर(काकस्पर्श)

२०१३-स्वप्निल जोशी (दुनियादारी)

२०१४ –रितेश देशमुख(लय भारी)

२०१५- अंकुश चौधरी  (क्लासमेट्स)

२०१६-आकाश ठोसर (सैराट)

२०१७-अमेय वाघ (फास्टर फेणे)

२०१८-सुबोध भावे (पुष्पक विमान)

२०१९-ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)

 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री        

२०१०-      

२०११ –विशाखा सुभेदार (मस्त चाललंय आमचं )

२०१२- सविता मालपेकर(काकस्पर्श)

२०१३- उर्मिला कानिटकर(दुनियादारी)

२०१४-तन्वी आझमी(लय भारी)

२०१५- सई ताम्हणकर (क्लासमेट्स )

२०१६-छाया कदम (सैराट)

२०१७-शिल्पा तुळसकर (बॉइज)

२०१८- मृणाल कुलकर्णी (ये रे ये रे पैसा)

२०१९- मृणाल कुलकर्णी(फत्तेशिकस्त) 


 

सर्वोत्कृष्ट खलनायक       

२०१०- सयाजी शिंदे (गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा)

२०११–सचिन खेडेकर (फक्त लढ म्हणा)

२०१२- वैभव मांगले (काकस्पर्श)

२०१३- जितेंद्र जोशी (दुनियादारी)

२०१४-शरद केळकर (लय भारी)

२०१५-      

२०१६-सचिन पिळगावकर (कट्यार काळजात घुसली)

२०१७-गिरीश कुलकर्णी (फास्टर फेणे)

२०१८-प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न)

२०१९-              

 

सर्वोत्कृष्ट गीत   

२०१०-  वाजले की बारा  (नटरंग )

२०११ –हे भास्करा मी (सिंधुताई सपकाळ )

२०१२- गणाधीश (मोरया )

२०१३- टिक टिक वाजते (दुनियादारी)

२०१४-माउली माउली(लय भारी)

२०१५- किती सांगायचंय (मला डबल सीट)

२०१६- झिंगाट(सैराट)

२०१७-हृदयात वाजे समथिंग(ती सध्या काय करते)

२०१८-जाऊ दे न व (नाळ)

२०१९- तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)

सर्वोत्कृष्ट गायक  

२०१०-  अजय गोगावले -खेळ मांडला (नटरंग)

२०११ –सुरेश वाडकर- हे भास्करा (मी सिंधुताई सपकाळ)

२०१२- अवधूत गुप्ते - गणाधीश (मोरया )

२०१३- सोनू निगम - टिक टिक (वाजते दुनियादारी)

२०१४-अजय गोगावले - माउली माउली (लय भारी)

२०१५- जसराज जोशी - किती सांगायचंय मला (डबल सीट)

२०१६- अजय-अतुल-झिंगाट (सैराट)

२०१७-कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर-लग्नाळू(बॉइज)

२०१८-अजय गोगावले- देवाक काळजी(रेडु)

२०१९-  आदर्श शिंदे-तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)

सर्वोत्कृष्ट गायिका 

२०१०-  बेला शेंडे - वाजले की बारा (नटरंग)

२०११ –बेला शेंडे - आज म्हारे घर पावण(बालगंधर्व )

२०१२- उर्मिला धनगर - वेलकम हो राया वेलकम (देऊळ)

२०१३- सायली पंकज - टिक टिक वाजते (दुनियादारी)

२०१४-केतकी माटेगावकर - मला वेड लागले प्रेमाचे (टाइमपास)

२०१५- आनंदी जोशी - किती सांगायचंय मला (डबल सीट)

२०१६- श्रेया घोषाल - आत्ताच बया का बावरलं (सैराट)

२०१७-आर्या आंबेकर - हृदयात वाजे समथिंग  (ती सध्या काय करते)

२०१८-वैशाली सामंत - खंडाळा घाट (ये रे ये रे पैसा)

२०१९- रोंकिनी गुप्ता - तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)

सर्वोत्कृष्ट पॉप्युलर फेस

सोनाली कुलकर्णी

क्रांती रेडकर

केतकी माटेगावकर

सई ताम्हणकर

अमृता खानविलकर

प्रिया बापट

रिंकू राजगुरू

वैदेही परशुरामी

शिवानी सुर्वे

 

सर्वोत्कृष्ट स्टाईल आयकॉन

अंकुश चौधरी

अनिकेत विश्वासराव

स्वप्नील जोशी

रितेश देशमुख

आकाश ठोसर

अमेय वाघ 


उत्तम संकल्पना, नेत्रदीपक सादरीकरणआणि खुमासदार सूत्रसंचालन याने “महाराष्ट्राचा फेवरेट कोण? नेहमीच गाजत राहिला आणि रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला आहे. गेली १० वर्षे प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करणारा हा सोहळा यंदा आपलं सुवर्ण दशक साजरा करतोय, त्यामुळे यंदा नेमकं काय विशेष असणार? महाराष्ट्राचा फेवरेट कोण ठरणार? याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांना आहे. आपलं वेगळेपण जपत रंगणारा हा दिमाखदार सोहळा यंदाही मनोरजंनाची परंपरा कायम ठेवीत प्रेक्षकांचं दिलखुलास रंजन करेल यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..