झी टॉकीजवर ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ तुकाराम बीज विशेष भाग

महाराष्ट्रातील संतांच्या भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजेज्ञान व भक्तीचा अनोखा संगम. सतराव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी भक्ती आणि ज्ञानाने समाजप्रबोधनाचे उत्तम कार्य केले. तुकाराम महाराज हे आपल्या कीर्तनातून जनजागृती करीत. त्यांचे अभंग आणि कीर्तने ही अनुभवातून आली होती. भागवत धर्म खऱ्या अर्थाने सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराज अनंतात विलीन झाले आणि वैकुंठाला गेलेअसे मानले जाते. त्यांचा निर्वाण दिवस हा ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ‘तुकाराम बीज’ याचे औचित्य साधत झी टॉकीजने ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ तुकाराम बीज विशेष भाग आपल्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ तुकाराम बीज विशेष भागाचे निरूपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रकाशमहाराज साठे करणार आहेत. रविवार २० मार्चला  दुपारी १२.०० वा. आणि संध्याकाळी ६.०० वा. झी टॉकीजवर या विशेष भागाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले. तुकोबांच्या याच नानाविध अभंगांची व त्यांच्या विचारांची अनुभूती कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या कीर्तनातून प्रेक्षकांना घेता येणार आहे.

नाचू कीर्तनाचे रंगी’ तुकाराम बीज विशेष भागातून संतश्रेष्ठाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत कीर्तनाचा सोहळा रंगणार आहे. तेव्हा रविवार २० मार्चला दुपारी १२.०० वा. आणि संध्याकाळी ६.०० वा. झी टॉकीजवर प्रक्षेपित होणाऱ्या या भागाचा अवश्य आस्वाद घ्या.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..