ब्लू डार्टच्यादिवाली एक्सप्रेसतर्फे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय भेटवस्तू शीपमेंटवर ग्राहकांकरिता 65% पर्यंतची सवलत

  • ऑफर 29 ऑक्टोबर 2022 पर्यंत वैध

मुंबई,19ऑक्टोबर, 2022: ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड ही दक्षिण आशियाची महत्त्वपूर्ण एक्सप्रेस एअर, एकात्मिक वाहतूक आणि वितरण लॉजिस्टीक कंपनी असून त्यांनी उत्सवी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ‘दिवाली एक्सप्रेसची घोषणा केली आहे. हा प्रस्ताव 27 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2022 पर्यंत वैध असेल. सवलतीचे दर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पत्त्यांवरील सर्व दिवाळी गिफ्ट शीपमेंटवर उपलब्ध असतील, ग्राहकांना त्यांच्या सर्व लॉजिस्टीक गरजांकरिता व्यापक पर्याय उपलब्ध राहतील. तर भारतभर 2 किलो ते 35 किलो वजनांच्या स्थानिक डीपी शिपमेंटवर 40% ची घसघशीत सूट मिळणार असून आंतरराष्ट्रीय नॉन-डॉक ऑफर 65% असेल, ही सवलत मुख्य बाजारपेठांत 2 किलो ते 10 किलो, 15 किलो, 20 किलो, 25 किलो, 30 किलो आणि 35 किलो वजनांच्या शिपमेंटवर उपलब्ध असणार आहे. 

आपल्या ग्राहकांना त्यांनी मोजलेल्या पैशाची किंमत जाणून ब्लू डार्ट अविरत आपली उत्पादने आणि सेवांसाठी कार्यरत आहे. या प्रस्तावासह, ग्राहकांना घरी आनंद आणणे शक्य होईल तसेच आपल्या प्रियजनांना भेटवस्तू हॅंपर, मिठाया, कपडे इत्यादी पाठवता येणार असल्याने त्यांना घरी असल्याची जाणीव होईल. भारतभर जवळपास 55,000 हून अधिक ठिकाणी, त्याशिवाय जगातील 220 देश आणि प्रदेशात राहणाऱ्या आपल्या जीवलगांसाठी भेटवस्तू पाठविणे शक्य होणार आहे.

ब्लू डार्टचे चीफ कर्मशियल ऑफिसर केतन कुलकर्णी म्हणाले, “महामारीमुळे मागील दोन वर्षे अतिशय बिकट होती आणि लोकांना मनाप्रमाणे दिवाळीची मजा लुटता आली नाही. यंदा, दिवाळी सर्वांसाठी अधिक खास आहे आणि आम्हाला ब्लू डार्टमध्ये लोकांनी त्यांच्या देश-परदेशातील जिवलगांच्या संपर्कात राहून सणासुदीची पुरेपूर मजा घ्यावी असं वाटते. जगभर मोठ्या प्रमाणात शिपमेंटची वाहतूक राहील हा आमचा अंदाज आहे आणि ही मागणी कार्यशील राहून आम्ही सहज पूर्ण करू. ज्यामुळे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या जीवनात फरक निर्माण करण्यात मदत होईल.”    

ते पुढे म्हणाले, "ब्लू डार्ट ही कायमच ग्राहक-केंद्री संघटना राहिली असून तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन प्रेरणेने मार्गक्रमण करते आहे. आमच्या व्यवसायाचे मुख्य केंद्र हे आमच्या भविष्यसूचक लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मचा फायदा घेण्याचं आहे, जे आम्हाला संपूर्ण देशभरात अखंड वितरण सुनिश्चित करण्यात मदत करते, ज्यामुळे लोकांना उत्सव साजरा करता येतो”.

ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण स्वीकार्ह देय पद्धतींमधून निवड करता येईल, ज्यामध्ये 14 डिजीटल वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडीट व डेबिट कार्ड, भारत क्यूआर कोड तसेच युपीआय (भीम)चा समावेश असेल. त्याचप्रमाणे मागील वर्षीचा प्रोटोकॉल पाळत, ब्लू डार्टचे फ्रंटलायनर डिलिव्हरी दरम्यान खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहेत.

ब्लू डार्ट सेवांचा लाभ घेण्यासाठी आणि कोणत्याही अधिक चौकशीकरिता ग्राहक कस्टमर केअर क्रमांक - 1860 233 1234 वर संपर्क करू शकतील किंवा त्यांना customerservice@bluedart.com वर ईमेल पाठवता येईल.   

आपला नजीकचा ब्लू डार्ट काउंटर शोधण्यासाठी, http://www.bluedart.com वर लॉग ऑन करा/ किंवा अॅपल स्टोअर आणि प्ले स्टोअरवरील ‘My Blue Dart’ मोबाईल ॲप्लिकेशन वापरा. 



ब्लू डार्ट सेवांचा लाभ घेण्यासाठी आणि कोणत्याही अधिक चौकशीकरिता ग्राहक कस्टमर केअर क्रमांक - 1860 233 1234 वर संपर्क करू शकतील किंवा त्यांना customerservice@bluedart.com वर ईमेल पाठवता येईल.   

आपला नजीकचा ब्लू डार्ट काउंटर शोधण्यासाठी, http://www.bluedart.com वर लॉग ऑन कराकिंवा अॅपल स्टोअर आणि प्ले स्टोअरवरील ‘My Blue Dart’ मोबाईल ॲप्लिकेशन वापरा

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..