योगी डिवाइन सोसायटी पवई,मुंबई..

योगी डिवाइन सोसायटी पवई,मुंबई यांचे तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत

पवई,मुंबई स्थित योगी डिवाइन सोसायटीशी संलग्न हरी मंदिर, हिरण्यनगर , गारखेडा तर्फे भागवत पारायण दिनांक 28-10-22 ते 3-11-22 पर्यंत जबिंदा ग्राउंड ,बीड बायपास येथे आयोजित केले आहे.
वरील कार्यक्रमा प्रित्यर्थ दिनांक 20-10-22 रोजी हरी मंदिर हिरण्य नगर गारखेडा येथे प.पू.संत वशीभाई यांच्या हस्ते मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा(प्रियदर्शनी)मयुरबन कॉलनी,गारखेडा यांना त्यांच्या विनंतीनुसार चारशे वह्या व 100 लेझीम देण्यात आले.
ह्या शाळेतर्फे मनपा शिक्षणाधिकारी श्री संजीव सोनार सर व मुख्याध्यापक शशिकांत उबाळे सर उपस्थित होते. तसेच शिशु विकास प्राथमिक शाळा,गुलमंडी यांना फळे (ब्लॅकबोर्ड)देण्यात आले. शाळेच्या वतीने सचिव संजीवनी ताई वरधावे, मुख्याध्यापिका कळसकर मॅडम तसेच सौ साधना साबळे व सौ वैजयंती दळवी हजर होत्या. वरील शैक्षणिक साहित्य मदत म्हणून देऊन योगी डिवाइन सोसायटीने मुलांच्या शैक्षणिक व शारीरिक प्रगतीस हातभार लावला. यापुढे नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळेस मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे आश्वासन प.पू. संत वशीभाई यांनी दिले.
योगी डिवाइन सोसायटी एनजीओ म्हणूनही कार्य करते. शिक्षणाधिकारी सोनार सर म्हणाले एक अध्यात्मिक, धार्मिक संस्था सामाजिक कार्यात इतकी भाग घेते हे कौतुकास्पद आहे.सदर कार्यक्रमास खास मुंबईहून उपस्थित राहिलेले प.भ. घनश्यामभाई अमीन व प.भ.कॅप्टन दीपक  जहागीरदार व हरी मंदिरचे नरेश भाई मुळे व इतर भक्तगण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

Racks & Rollers..