'जाऊ बाई गावात' ६ स्पर्धकांची नाव जाहीर

 'जाऊ बाई गावात' ६ स्पर्धकांची नाव जाहीर  !

शहरातल्या मुली गावाला त्यांचा प्रेमात पाडू शकतील? करणार तेव्हा कळणार !

'जाऊ बाई गावात' ह्या नव्या रिऍलिटी शोचा आज आणखी एक उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात ‘हार्दिक जोशीने’  अजून दोन नवीन स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. या शोची पाचवी स्पर्धक आहे  सुरेल संस्कारी ‘श्रेजा म्हात्रे’, मॉडेल आणि सोशल मीडियाची आहे ती राणी लिहू शकेल का ती गावात स्वतःची एक वेगळी कहाणी? सहावी स्पर्धक ‘मोनिशा आजगावकर’, फोटोग्राफी आणि सामाजिक कार्याची आहे हिला आवड. आपल्या कॅमेरामध्ये दुनियेला जी करते कैद. शहरातल्या सवयी गावात कश्या टिकणार ?

तर पहिले चार स्पर्धक आहेत श्रीमंत घरची नात जिला घाबरतात सर्व घरात नाव आहे तिचे ‘स्नेहा भोसले’जी आहे लेडी डॉन, तिच्या किक बॉक्सिंगचा आहे सगळीकडे बोलबाला. दुसरी स्पर्धक आहे पापा की परी ‘संस्कृती साळुंखे’  जिचा चॉईसच आहे महाग, क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा तिला आहे अभिमान, तिच्या समोर कोणी काहीही लपवू शकत नाही. तिसरी स्पर्धक आहे फॅशन दिवा ‘रसिका ढोबळे’ जिच्या फॅशन फिगरवर आहेत सर्व फिदा. चौथी स्पर्धक आहे प्लस साइझ मॉडेल ‘हेतल पाखरे’ जिचं व्यक्तिमत्व आहे वजनदार.

स्वताच्याच प्रेमात असलेल्या ह्या मुली गावाला त्यांच्या प्रेमात पडू शकणार का? ‘आता करणार तेव्हा कळणार'. हळू हळू तुमच्यासमोर उलगडतील आणखी एका पेक्षा एक व्यक्तिमत्वाचे स्पर्धक.

प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा नवीन रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात' आपल्या भेटीस येत आहे ४ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..