महानगर गॅस लिमिटेड..
महानगर गॅस लिमिटेडने आपले पहिले अधिग्रहण पूर्ण केले
युनिझन एन्वीरोमधील १००% इक्विटी एमजीएलकडे हस्तांतरित
मुंबई, फेब्रुवारी १, २०२४ – महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) या भारतातील प्रमुख गॅस वितरण कंपनीने युनिझन एन्वीरो प्रायवेट लिमिटेड (यूइपीएल) च्या १००% इक्विटी भागांचा ताबा घेतल्याचे जाहीर केले आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आणि एमजीएलच्या इतिहासातील पहिल्याच अधिग्रहण प्रक्रियेमुळे कंपनीचे दीर्घ-कालीन वाढीचे धोरण अधिकच बळकट झालेले आहे.
पेट्रोलियम व नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (पीएनजीआरबी) यांचेकडून १३ डिसेंबर २०२३ रोजी यासाठी मंजुरी प्राप्त झाल्यानंतर अधिग्रहणाची प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण करण्यात आलेली आहे. या हस्तांतरणापूर्वी, यूइपीएलमधील इक्विटी अशोका बिल्डकॉन लिमिटेड (एबीएल) आणि मॉर्गन स्टॅन्ले इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर (एमएसआयआय) यांच्या व्यवस्थापनाखालील एका इन्वेस्टमेंट फंडकडे होती.
श्री. आशु शिंघल, मॅनेजिंग डायरेक्टर, महानगर गॅस लिमिटेड यांनी सांगितले की, “युनिझन एन्वीरो प्रायवेट लिमिटेड हे आमचे पहिले अैक्विझिशन आहे. हा क्षण एमजीएलसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा आमच्या कॉर्पोरेट इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यूइपीएलचे अैक्विझिशन हे आमच्या दीर्घ-कालीन वाढीबद्दलच्या नियोजनाशी मिळतेजुळते असेच आहे. यामुळे केवळ आमचा शहरी गॅस वितरणाचा कोअर बिझिनेस वाढण्यालाच मदत होईल एवढेच नव्हे तर त्यामुळे यूइपीएल यांनाही त्यांच्या डोमेन नॉलेजचा, संभाव्य एकत्रीकरणामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या शक्यतांचा उपयोग करून अधिकाधिक वृद्धी साधता येईल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही यूइपीएलच्या कर्मचाऱ्यांचे, भागीदारांचे व ग्राहकांचे एमजीएल परिवारात मन:पूर्वक स्वागत करीत आहोत.’’
श्री. आशिष कटारिया, अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे डायरेक्टर, यांनी सांगितले की, ‘‘या प्रक्रियेमुळे एबीएलची नवीन व आशादायक क्षेत्रे निवडण्याची व अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता प्रकर्षाने दिसून येत आहे. आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याप्रती आणि देशाला स्वच्छ उर्जेच्या दिशेने प्रगती करण्यास मदत करण्यासाठी आमच्या बांधिलकीचा पुन्हा एकदा उच्चार करीत आहोत. आम्ही आमचे गुंतवणूकदार मॉर्गन स्टॅन्ले इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर यांनी ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी दिलेल्या सहयोगाबद्दल त्यांचे आभारी आहोत. महानगर गॅस लिमिटेड यांनी यूइपीएलमध्ये शंभर टक्के हितसंबंध (स्टेक) ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्या सर्व हितधारकांना योग्य ते मूल्य देता आल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे.’’
श्री. शामसुंदर गुरूमूर्ती, मॅनेजिंग डायरेक्टर, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर यांनी सांगितले की, ‘‘आमच्या गुंतवणुकीच्या वेळेस यूइपीएल ही एक प्री-रेव्हेन्यू कंपनी होती आणि तेथपासून ते २५,०००+ ग्राहकांना सेवा देणारी एक प्रॉफिटेबल कंपनी होण्यातील तिचा प्रवास लक्षणीय आहे. यूइपीएलच्या बांधणीत अशोका बिल्डकॉन लिमिटेड यांच्या सहयोगाने काम केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’
एमजीएल, यूइपीएल आणि त्यांचे भागधारक, एबीएल आणि एमएसआयआय यांचेमधील शेअर पर्चेस एग्रीमेंटवर दि ३ मार्च २०२३ रोजी सह्या करण्यात आल्या व त्यामुळे रू.५६२ कोटींच्या रोख किंमतीवर अैक्विझिशन करण्यात आले.एचडीएफसी बँकेने एमजीएलचे एक्सक्लुजिव्ह ट्रान्झॅक्शन एडव्हायजर म्हणून काम केले तर कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनीने अशोका बिल्डकॉन लिमिटेड व मॉर्गन स्टॅन्ले इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर यांचे एक्सक्लुजिव्ह फायनान्शियल एडव्हायजर म्हणून काम पाहिले.
या अत्यंत महत्त्वाच्या एक्विझिशन प्रक्रियेबरोबरच, एमजीएलने महानगर एलएनजी प्रायवेट लिमिटेडची स्थापना करून आपला एनर्जी पोर्टफोलिओ अधिकच विस्तारलेला आहे. याखेरीज एमजीएल बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (बीएमसी) यांचे सहकार्याने मुंबई येथे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट (घन कचरा) वर आधारीत सर्वात मोठा बायोगॅस प्लँट उभारत आहे. हायड्रोजन, इव्ही, रिन्यूएबल या संबंधित विभागांमध्येही एमजीएलला त्यांचा एनर्जी पोर्टफोलिओ विस्तारायचा आहे, ज्यासाठी कंपनी आपल्या वाढीसाठी सुयोग्य अशा संधींच्या शोधात आहे.
Comments
Post a Comment