तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटाशी झुंज देणाऱ्या 'गूगल आई'चे पोस्टर प्रदर्शित

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटाशी झुंज देणाऱ्या 'गूगल आई'चे पोस्टर प्रदर्शित 

डॉलर्स मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत 'गूगल आई' या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्य निर्माण झाले असेल. 

तंत्रज्ञानाच्या मदतीने संकटात सापडलेल्या आपल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या एका लहान मुलीची ही गोष्ट आहे. यात प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'गूगल आई' या चित्रपटाची निर्मिती डॉलर्स दिवाकर रेड्डी यांनी केली आहे. तर गोविंद वराह यांनी दिग्दर्शनासहित कथा, पटकथा, लेखनाची धुरा सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, "निरागसता, तंत्रज्ञानाविषयी लहान मुलीचे असणारे ज्ञान, समजूतदारपणा, संकटांशी झुंज असा रोमांचक आणि मनोरंजनात्मक असा हा प्रवास आहे. मुळात चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, याचा अंदाज आला असेलच. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आहे, हे पाहाणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.’’

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight