स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 साठी गोदरेज अप्लायन्सेसची शिक्षण मंत्रालयासोबत भागीदारी

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 साठी गोदरेज अप्लायन्सेसची शिक्षण मंत्रालयासोबत भागीदारी

मुंबई, 20 सप्टेंबर 2024: गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या, तसेच गोदरेज आणि बॉयसच्या अप्लायन्सेसने स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) 2024 च्या 7व्या आवृत्तीसाठी शिक्षण मंत्रालयासोबत भागीदारी केली आहे. सर्जनशीलता, तसेच वास्तविक जगातील आव्हाने सोडविण्यासाठी तरुण मनाच्या कल्पकतेचा योग्य दिशेने उपयोग केला जावा, या उद्देशाने हा देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे.

या वर्षी SIH साठी गोदरेज अप्लायन्सेसने "शाश्वततेसाठी नावीन्य: पर्यावरण रक्षणासाठी साधनांचा वापर (ऊर्जा आणि पाणी) मोठ्या उपकरणांमध्ये (एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन आणि डेझर्ट एअर कूलर)" ही संकल्पना निवडली आहे, ज्यायोगे विद्यार्थ्यांना यावर काम करता येईल. ही थीम सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हॅकाथॉन या दोन्हींसाठी डिझाइन केली आहेतसेच ती सहभागींना नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास प्रोत्साहित करतेजे या आवश्यक घरगुती उपकरणांचा टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढवू शकते, तसेच साधनांचे संवर्धन आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या जागतिक उद्दिष्टांशी हे जोडलेले आहे.

या भागीदारीबद्दल बोलताना, कमल नंदी, बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष – गोदरेज अप्लायन्सेस म्हणाले, “स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2024 साठी शिक्षण मंत्रालयासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नावीन्यपूर्ण शक्तींवर आमचा नेहमीच विश्वास आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये टिकून राहण्यासाठी समीक्षक आणि सर्जनशीलतेने विचार व्हायला हवा. त्यासाठी तेजस्वी तरुण मनांच्या सर्जनशीलतेला आम्ही आव्हान देतो. ही नवीन पिढी निश्चितच चांगल्या आणि हरित भवितव्यासाठी योगदान देईल.

या भागीदारीबाबत उत्साह व्यक्त करताना, डॉ. अभय जेरे, उपाध्यक्ष, AICTE आणि मुख्य नवोन्मेष अधिकारी, इनोव्हेशन सेल, शिक्षण मंत्रालय म्हणाले, “नावीन्य आणि उत्कृष्टतेचे समानार्थी असलेले गोदरेज अप्लायन्सेस हे भारतातील तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या, तसेच सशक्त करण्याच्या आमच्या मिशनमध्ये सहभागी झाले आहे. गोदरेज अप्लायन्सेससोबत भागीदारी झाल्याने आम्ही खूप आनंदी आहोत. यामुळे एक नावीन्यपूर्ण आणि प्रभावी असा प्रवास सुरू होईल,  ज्याचा केवळ उद्योगालाच फायदा होणार नाहीतर अनेक चांगल्या गोष्टींनाही हातभार लागेल. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि त्याचा प्रत्यक्षातील वापर यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. गोदरेज अप्लायन्सेससारख्या आघाडीच्या उद्योगांमुळे हा उपक्रम यश आणि नावीन्यतेची नवीन शिखरे नक्कीच गाठेल.''

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) हा एक देशव्यापी उपक्रम आहे, जो विज्ञान, अभियांत्रिकी, डिझान, व्यवस्थापन इत्यादी सारख्या विविध क्षेत्रांत पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या काही आव्हानांचे निराकरण करण्यात गुंतवून ठेवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. व्यावहारिक समस्या नावीन्यपूर्णतेने सोडविण्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी हा नवीन प्रकार सुरू करण्यात आला आहे. रोजच्या जगण्यातील समस्यांवर सर्जनशील उपाय विकसित करण्यासाठी, तसेच ते लोकांसमोर आणण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देते.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

The Federation of Obstetric & Gynaecological Societies of India..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight