दशकातील सर्वात मोठा अॅक्शनपट ‘रानटी’ मराठी रुपेरी पडद्यावर
दशकातील सर्वात मोठा अॅक्शनपट ‘रानटी’ मराठी रुपेरी पडद्यावर
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट "रानटी"
जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या कथेचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून... "काही ‘रानटी’ असतात, काही बनतात!
प्रदर्शित झालेल्या ह्या पोस्टरवरनं ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अॅक्शनने भरलेला आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे ‘सरप्राईज’ असणार आहे.
शरद केळकर हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे ह्या पोस्टरमधूनही कळतंय आणि त्याचा ‘रानटीपणा’ नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की,'अधर्मी वृत्तींचा नाश करणार्या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे.
चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड ह्यांनी पार पाडलीये. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखविणाऱ्या या दिग्दर्शकाकडून ‘रानटी’च्या निमित्ताने श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक समित कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायम नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समित कक्कड यांनी रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अॅक्शन, एंटरटेनमेंट ‘रानटी’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटातून महाराष्ट्रातील न्यू ‘अँग्री यंग मॅन’ शरद केळकरच्या रूपाने मिळणार असल्याचे समित सांगतात. समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ सॉईल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्या या चित्रपटाच्या निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे.
ह्या सिनेमासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.
आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, 'रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने एक चांगली टीम झाली आहे. दिग्दर्शक समित कक्कड याने नेहमीच आपल्यातील वेगळेपण दाखविला आहे. त्याच्या साथीने मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
चित्रपटाचं पोस्टर आणि चित्रपटाचं नाव यावरून ‘रानटी’ प्रेक्षकांचं मनोरंजन करून पैसा वसुल करणार हे नक्की. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.
Comments
Post a Comment