महाराष्ट्र स्टेट पोलिसांतर्फे बनावट गुड नाइट उत्पादनांचा साठा असलेल्या स्टोअरेज युनिटवर छापे
महाराष्ट्र स्टेट पोलिसांतर्फे बनावट गुड नाइट उत्पादनांचा साठा असलेल्या स्टोअरेज युनिटवर छापे
मुंबई, १९ सप्टेंबर २०२४ – गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (जीसीपीएल) या प्रसिद्ध गुड नाइट ब्रँडच्या उत्पादक कंपनीने नुकताच नागपूर, महाराष्ट्र येथे बेकायदेशीर स्टोअरेज युनिटवर बनावट गुड नाइट उत्पादनांचा साठा केल्याबद्दल छापा घातला. नियमित दर्जा तपासणीच्या दरम्यान जीसीपीएलला बनावट गुड नाइट उत्पादने महाराष्ट्रात विकली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या.
ही माहिती मिळाल्यानंतर तपासणी पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांसह संबंधित रिटेलवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान बनावट गुडनाइट उत्पादनांची ७९ युनिट्स जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात सेक्शन ५१ आणि कॉपीराइट कायदा १९५३, ६३ सेक्शनअंतर्गत एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) दाखल करण्यात आली आहे. हे सेक्शन्स बनावटी माल आणि कॉपीराइट उल्लंघनाशी संबंधित आहेत.
पोलिस सध्या या बनावटी उत्पादनांसाठी जबाबदार असलेल्या वितरण नेटवर्कचा तपास करत असून, त्याद्वारे महाराष्ट्रात डुप्लिकेट उत्पादन विक्रीला आळा घालण्याचे लक्ष्य आहे. या कृतीमुळे बनावटी उत्पादने विकणाऱ्या वितरकांपर्यंत ठोस संदेश जाईल आणि ग्राहकांना सुरक्षित व अस्सल गुड नाइट उत्पादने मिळतील.
या समस्येविषयी गोदरेज कन्झ्युमर उत्पादन लि. (जीसीपीएल) कंपनीच्या होम केयर विभागाचे प्रमुख शेखर सौरभ म्हणाले, ‘देशभरात बनावट उत्पादनांचा होत असलेला प्रसार एफएमसीजी उद्योगापुढचे मोठे आव्हान आहे. बनावट उत्पादने बेकायदेशीर असतातच, शिवाय मानवी आरोग्यासाठी धोकादायक आणि घातक असतात. जीसीपीएलद्वारे आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्यासाठी व त्याद्वारे ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी वापरले जातात. घरगुती कीटकनाशक विभागात गुडनिट आघाडीवर आहे, हे असे एक उदाहरण आहे. आम्ही वितरण नेटवर्क, स्थानिक अधिकारी व ग्राहकांच्या मदतीने सातत्याने आमच्या उत्पादनांचा दर्जा तपासत असतो. नागपूर पोलिस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने राज्यात बनावट गुड नाइट उत्पादनांची विक्री करणारे स्थानिक रिटेलर्स, उत्पादक आणि वितरकांना चाप बसेल.’
बाजारपेठेत बनावट गुड नाइट उत्पादने उपलब्ध असल्याने ग्राहकांनी सतर्क राहाणे आवश्यक असून, प्रामाणिक विक्रीची खात्री करावी. ग्राहकांना बनावट गुड नाइट उत्पादने आढळल्यास किंवा त्यांची विक्री करणारे घाऊक किंवा रिटेलर विक्रेते माहिती झाल्यास ही बाब जीपीसीएलच्या निदर्शनास आणून द्यावी. त्यासाठी किंवा care@godrejcp.com वर ईमेल करता येईल आणि 1800-266-0007 वर संपर्क करता येईल.
Comments
Post a Comment