पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे 'थेट प्रक्षेपण'!
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे 'थेट प्रक्षेपण'!
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक म्हणजे एक मंगलमय सोहळाच! लाखो भाविक श्रद्धेने पुण्यातील गणपतींचे दर्शन घेण्यासाठी येतात, खासकरून 'विसर्जन मिरवणूक' बघण्यासाठी!
ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी लोटते, पण आता कुठला गणपती कोणत्या चौकात आलाय? कोणत्या पथकाचं वादन सुरु आहे असे अनेक अपडेट्स घरबसल्या देखील मिळू शकणार आहेत, 'आरपार' या युट्यूब चॅनेलमार्फत!
'आरपार' (Aarpaar) या युट्यूब चॅनेलवर पुनीत बालन प्रस्तुत 'बाप्पा मोरया रे' या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण उद्या, १७ तारखेला सकाळी ९ वाजल्यापासून पुढील २४ तास असणार आहे. अनेक मान्यवरांच्या मुलाखती, विसर्जन मिरवणुकीतील घडामोडी, ढोल-पथकांचे वादन अशा सगळ्या गोष्टींचा आनंद प्रेक्षकांना घरबसल्या घेता येईल.
नक्की बघा पुण्यातील विसर्जन मिरवणुकांचा Live सोहळा सकाळी ९ वाजल्यापासून! २४ तास थेट प्रक्षेपण!
Comments
Post a Comment