विशीतल्या रुग्णाची डायरेक्ट अँटीरियर हीप रीप्लेसमेंटच्या साहाय्याने अवस्क्युलर नेक्रोसिसपासून मुक्ती...

विशीतल्या रुग्णाची डायरेक्ट अँटीरियर हीप रीप्लेसमेंटच्या साहाय्याने अवस्क्युलर नेक्रोसिसपासून मुक्ती : सहा तासात चालायला सुरुवात अन् 24 तासात रुग्णालयातून सुट्टी

विशीतल्या एका तरुणाने गेल्या काही वर्षात हालचालींमुळे खुब्यात वेदना वाढल्याचे सांगत रुग्णालयात प्रवेश घेतला. अलीकडच्या काळात लंगडण्याची समस्या निर्माण झाल्याचे आणि यामुळे मांडी घालून बसणे, बाईक चालवणे आणि भारतीय कमोड वापरण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाल्याचेही या तरुण रुग्णाच्या लक्षात आले. आपल्याला होत असलेल्या त्रासाविषयी सविस्तर सल्ला मसलत केल्यानंतर या तरुण रुग्णाने आपल्या खुब्यावर शस्त्रक्रिया केली जावी, असे म्हटले.

तद्नंतर या रुग्णाची तपासणी केली असता त्याला एव्हस्कुलर नेक्रोसिसचे (एव्हीएन) निदान झाले. रक्तपुरवठा न झाल्याने फेमोरल हेड मृतवत होते आणि यामुळे अशी परिस्थिती उद्भवते अन् खुब्याचा भाग खराब होतो. अल्कोहोल सेवन, स्टिरॉइडचा वापर, रक्त विकार जसे की सिकलसेल रोग किंवा थॅलेसेमिया किंवा इडिओपॅथिक समस्या यांसह विविध कारणांमुळे एव्हीएन होऊ शकते. या तरुण रुग्णाच्या प्रकरणात एव्हस्कुलर नेक्रोसिसचा त्रास पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचला होता. परिणामी, खुब्यातील अनियमितता आणि आर्थरीटीक सरफेसमुळे तीव्र वेदना झाल्याने रुग्णाला हालचाल करण्यात शक्तीहीनता जाणवत होती. या तरुण रुग्णाचा राऊंड हिप बॉल विकृत झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.

सदर तरुण रुग्णावर डायरेक्ट अँटीरियर पद्धतीचा वापर करून टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. या तंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे, याद्वारे कमीत कमी त्रासासह शस्त्रक्रिया केली जाते आणि नंतर रुग्ण लवकर बरा होतो, तसेच शस्त्रक्रिया केलेल्या जागेच्या भोवती अडसर निर्माण होत नाही. या तरुण रुग्णावर सदर तंत्राने शस्त्रक्रिया केल्यानंतर तो जलद बरा झाला : शस्त्रक्रियेनंतर केवळ सहा तासात हा रुग्ण चालू लागला आणि 12 तासांच्या आत पायऱ्या चढला, तर 24 तासांच्या आत या रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. विशेष म्हणजे यादरम्यान तो लंगडत असल्याचे निदर्शनास आले नाही. लवकर बरा झाल्यामुळे रुग्ण अस्वस्थ न होता त्याला त्याची दैनंदिन कामे करता येऊ लागली.

वोकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलचे कन्सल्टंट आर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. सुप्रित बाजवा याबाबत म्हणाले की, "सदर रुग्णाच्या अव्हस्कुलर नेक्रोसिस या आजारावर केलेल्या उपचारात आधुनिक शस्त्रक्रिया तंत्राचा वापर करण्यात आला, हे परिवर्तनीय प्रभावाचे उत्तम उदाहरण आहे. हिप रिप्लेसमेंटसाठी डायरेक्ट अँटीरियर पद्धती वापरून, आम्ही उल्लेखनीयरित्या कमी कालावधीत रुग्णाची आयुष्य जगण्याची गुणवत्ता आणि गतिशीलता लक्षणीयरीत्या सुधारली. एव्हीएनच्या गंभीर प्रकरणांवर उपचार करण्यासाठी वेळेवर आणि जलद हस्तक्षेप तसेच अचूक शस्त्रक्रिया व्यवस्थापन महत्त्वपूर्ण आहे. यामुळे रुग्णांना त्यांची हालचाल करण्याची किंवा काम करण्याची क्षमता पुन्हा प्राप्त होऊ शकते आणि त्यांचे संपूर्ण आरोग्य सुधारू शकते."

सदर तरुण रुग्णाच्या प्रकरणातून प्रगत अवस्कुलर नेक्रोसिस व्यवस्थापित करण्यासाठी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया प्रभावी उपचार पद्धती असल्याचे अधोरेखित होते. वेळेवर केलेला उपचार विषयक हस्तक्षेप आणि योग्य शस्त्रक्रिया तंत्रांमुळे सदर रुग्णाच्या हालचालीत आणि जीवन जगण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली. रुग्ण जलदरित्या बरा झाल्याने डायरेक्ट अँटीरियर पद्धतीचे फायदे दिसून आले. याद्वारे रुग्ण लवकर बरा होतो आणि दैनंदिन हालचाल, कामे सुलभरित्या करू लागतो, हे स्पष्ट झाले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..