कमळीने दूरच्या वाटा सोप्या केल्या, दुर्गम भागातील १०० शाळकरी मुलींना सायकल वाटप
शिक्षणासाठी न थांबणा-या मुली, कमळीच्या सायकलींवर भविष्याकडे धावणार !
कमळीच्या मदतीने सोप्पी झाली १०० मुलींच्या शिक्षणाची वाटकमळीने दूरच्या वाटा सोप्या केल्या, दुर्गम भागातील १०० शाळकरी मुलींना सायकल वाटप
मुलगी शिकली, प्रगती झाली… किती सहज रुळलंय हे वाक्य आपल्या जिभेवर. शिक्षणाचं महत्व माहित नाही असं एकही घर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. पण अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात अश्या दुर्गम जागा आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत, पण गावच्या मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं स्वप्नं मात्र पेरलं गेलंय. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज असते ती संधीची आणि प्रोत्साहनाची आणि हीच गरज लक्षात घेऊन 'कमळी'ने एक स्तुत्य पाऊल उचललं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 'कुरुंदवाड' मधील शाळेत जाऊन त्या १०० मुलींना सायकलींचं वाटप केलं. ह्या मुली दररोज शाळेत ८ ते १० किमी च अंतर कापून शाळेत येतात. त्या भागात शाळेत पोहोचायला सार्वजनिक वाहतूक म्हणजे ST बसचाच एकमेव आधार, पण त्याही फेऱ्या मर्यादित. त्यामुळे शाळेत वेळेवर पोहोचणं, परत येणं हे या मुलींसाठी एक दिवसभराचं आव्हान बनतं. अशा परिस्थितीत या मुलींना शाळेची वाट सोपी करायची असेल, तर एक साधन हवं होतं आणि ते साधन ठरल्या या सायकली.आपला आनंद व्यक्त करताना विजया बाबर म्हणजे आपल्या सर्वांची कमळी म्हणाली "या मुलींच्या डोळ्यांत शिक्षणाचं स्वप्न पाहिलं, आणि त्या स्वप्नपूर्ती मध्ये आपला खारीचा वाटा असणार आहे याच सुख मला milale . सायकल ही फक्त एक वाहन नाही, ती त्या मुलींच्या शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात आहे. रोजची धावपळ, अंतर, आणि अडचणी पाहिल्यावर मला जाणवलं की शिक्षणाच्या दिशेने त्यांची प्रत्येक पावलं थोडी सोपी करणं, हीच खरी साथ आहे. सायकल हातात घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं, ते पाहून डोळ्यांत नकळत पाणी आलं. एक साधी सायकल त्यांच्यासाठी किती मोठा आधार ठरू शकते, हे प्रत्यक्ष अनुभवलं. शाळेपर्यंतचा लांब रस्ता आता त्यांच्यासाठी अडथळा न राहता संधीचा मार्ग बनतो आहे, हे पाहून खूप समाधान वाटतं. शिक्षण हे प्रत्येकाचं हक्काचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला गती देणं हीच कमळीची भूमिका आहे." या उपक्रमामागे असलेली कमळीची भावना ही केवळ एकतर्फी मदत नव्हे, तर शिक्षणाची खरी गरज आणि त्यामागचं स्वप्न ओळखणारी आहे. कारण कमळी स्वतः शिकून इथ पर्यंत आली आहे आणि शिक्षणामुळे तिचं आयुष्य घडत आहे. म्हणूनच ती स्वतःच्या गावात एक महाविद्यालय सुरू करण्याचं स्वप्न बाळगते, जिथे तिच्यासारख्या शिकायची जिद्द असणाऱ्या अनेक मुलींना शिकता येईल. कमळीचा हा प्रवास आणि तिचं कर्तृत्व हे केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायी देखील आहे. जिथे परिस्थितीचा डोंगर वाटेवर असतो, तिथे अशी एखादी साथ मिळाली, की मुलींची पावलं शिक्षणाच्या दिशेने झपाट्याने चालू लागतात.
तर, या प्रेरणादायी वाटचालीचा साक्षीदार व्हा. ‘कमळी’ ३० जूनपासून दररोज रात्री ९ वाजता, सदैव आपल्या झी मराठीवर.
Comments
Post a Comment