विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विठ्ठल नामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा -'अवघे गर्जे पंढरपूर' !

६ जुलै २०२५, रविवार, दुपारी ४ वाजता, शिवाजी मंदिर‌, दादर

मुंबई : देवशयनी आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त साधत अखंड विठ्ठलमय वातावरणात रसिक भक्तांना भक्तिरसात न्हालवणारा एक आगळावेगळा संगीत सोहळा — ‘अवघे गर्जे पंढरपूर’ रंगणार आहे रविवार, ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. 

भगवंत प्राप्ती हेच मानवी जीवनाचे साध्य असून त्याची प्राप्ती झाल्यानंतर बाकी काहीच शिल्लक राहात नाही. कर कटावरी असलेल्या त्या सावळ्या विठ्ठलाचे समचरण पाहिले की परत फिरणे नाही. त्या माय बापाच्या दर्शनाला देश परदेशाच्या सीमा ओलांडून लाखो भाविक विठ्ठल नामाचा जयघोष करत वारीत चालत येतात.भक्ती आणि वारीच्या गजरात दुमदुमणारा जयघोष’ अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष वारीत जाण्याची आपली संधी हुकली असेल तर हा अनुभव गायनातून घडविण्यासाठीच 'एएसके' व 'दर्शन क्रिएशन्स' आणि 'अद्वैत थिएटर्स' यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राहुल भंडारे, समीर बापर्डेकर आणि अभिजीत जोशी यांच्या संकल्पनेतून सादर होणाऱ्या ‘अवघे गर्जे पंढरपूर’ या  कार्यक्रमातून घेता येणार आहे. अथांग भक्ति सागरात टाळ-मृदंगाच्या गजरात रसिकांना हा कार्यक्रम विठ्ठलमय करणार असून या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व एम. के. घारे ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को - ऑप. सोसायटी, मिनी मॅक्स ऍड्स प्रा. लि. ने स्वीकारले आहे. 

या कार्यक्रमात 'संगीत संन्यस्त खड्ग', 'संगीत हाच मुलाचा बाप', 'संगीत एकच प्याला' इत्यादी नाटकांमधील आघाडीची अभिनेत्री अर्थात प्रसिद्ध गायिका संपदा माने, गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई आणि स्वरा जोशी हे गुणी गायक-गायिका आपले सुरेल गायन सादर करतील. या भक्तिरसपूर्ण गायनाला संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांचे संगीत लाभणार असून, रसिकांची भक्तीची वाट आणखीनच अर्थपूर्ण करणारे निवेदन दीपाली केळकर यांच्या ओघवत्या शैलीतील आवाजातून साकारले जाणार आहे.

‘अवघे गर्जे पंढरपूर’ हा कार्यक्रम केवळ एक संगीत सादरीकरण नसून, तो एका आध्यात्मिक अनुभूतीचा जागर आहे. अशा या पवित्र संगीतमय यात्रेचा लाभ घेण्यासाठी आणि विठुरायाच्या भक्तीने अंत:करण भरून टाकण्यासाठी, प्रत्येक भक्ताने ६ जुलै २०२५, रविवार, दुपारी ४ वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे उपस्थित राहून या सशुल्क कार्यक्रमाला भरभरून दाद द्यावी.

अधिक माहितीसाठी राहुल पवार यांच्याशी 93246 99065 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K