महानगर गॅस लिमिटेड...
जास्त स्मार्ट, सुरक्षित, सोयीस्कर
महानगर गॅस लिमिटेड आता व्हॉट्सॲपवरून पीएनजी मीटर रीडिंग स्वीकारते
02 जुलै 2025, मुंबई : महानगर गॅस लिमिटेड, भारतामधील एक मोठी शहर गॅस वितरण कंपनी, ग्राहकांशी होणारे आदानप्रदान अधिक सुरळीत करण्यासाठी, आता व्हॉट्सॲपमार्फत पीएनजी मीटर रीडिंग पाठवण्याचा वापरकर्त्यांसाठी सोपा पर्याय सादर करून बिलिंग अधिक सोयीचे करत आहे.
घरगुती ग्राहक आता एमजीएलच्या अधिकृत व्हॉट्सॲप खात्यावरून आलेल्या विनंतीला उत्तर देताना त्यांच्या पीएनजी मीटरचा फोटो पाठवू शकतात, ज्यामध्ये ‘‘मीटर रीडिंग (8 अंकी) आणि मीटर क्रमांक’दिसत असेल. यामुळे बिलिंगची प्रक्रिया वेळच्या वेळी आणि अचूक रीतीने होईल.
व्हॉट्सॲपबरोबरच, ग्राहक अनेक विविध डिजिटल आणि पारंपरिक माध्यमांतून त्यांचे मीटर रीडिंग पाठवत राहू शकतात:
- एमजीएल कनेक्ट ॲप -ॲपवर मीटरचा फोटो अपलोड करून
- 9223555557 या क्रमांकावर <BP क्र.>स्पेस<5 अंक (काळे)> SMS करून
- मीटर फोटो आणि रीडिंगसह support@mahanagargas.com येथे ईमेल पाठवून
- वेबसाईट - www.mahanagargas.com येथे लॉगिन करून आणि त्यांचे मीटर रीडिंग प्रविष्ट करून
- ग्राहकसेवा - (022) 6867 4500 / (022) 6156 4500 येथे कॉल करून
ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी त्यांच्या बीपी / सीए क्र. वर नोंदवून घ्यावेत. यासाठी ग्राहकसेवेला (022) 6867 4500 / (022) 6156 4500 येथे कॉल करावा आणि आमच्या डिजिटल उपक्रमांमार्फत त्यांना अधिक चांगली सेवा पुरवण्यास आम्हाला साहाय्य करावे.
ग्राहकांना आम्ही असे सुचवतो की कोणतेही तपशील देण्यापूर्वी, त्यांनी एमजीएलच्या अधिकृत व्हॉट्सॲप खात्यावर निळी टिक असल्याची पडताळणी करून घ्यावी.
हा उपक्रम ग्राहकांना स्वच्छ ऊर्जा आणि सुलभ आणि सोयीस्कर प्रक्रिया उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एमजीएलच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
Comments
Post a Comment