Posts

Showing posts from October, 2025

जय जगदांबा प्रॉडक्शन्सचे निर्माता संजीव राठोड ‘शांताबाई’ गाण्याच्या कॉपीराईट हक्कांसाठी कायदेशीर लढाईत पुढे

Image
जय जगदांबा प्रॉडक्शन्सचे निर्माता संजीव राठोड 'शांताबाई' गाण्याच्या कॉपीराईट हक्कांसाठी कायदेशीर लढाईत पुढे  एकमेव आणि अनन्य हक्क १५ सप्टेंबर २०१५ रोजी जय जगदांबा प्रॉडक्शन्स आणि सुमित म्युझिक कंपनी यांच्यात एक करार झाला. करारानुसार, ‘शांताबाई’ गाण्याचे सर्व मराठी आणि हिंदी अधिकार एकमेव आणि अनन्य हक्क म्हणून जय जगदांबा प्रॉडक्शन्सकडे गेले. सुमित म्युझिक कंपनीने फक्त काही विशिष्ट हक्क स्वतःकडे ठेवले, बाकीचे सर्व अधिकार जय जगदांबा प्रॉडक्शन्सकडे हस्तांतरित केले. शांताबाई गाणे खूप लोकप्रिय आहे, आणि त्याची मागणी प्रेक्षकांमध्ये खूप जास्त आहे. उल्लंघन आणि व्यावसायिक नुकसान सुमित म्युझिक कंपनीने गाणे YouTube, Spotify, Jio Saavn, Amazon Prime, Apple Music अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वतःच्या नावाने अपलोड केले आणि PDL सारख्या कॉपीराईट सोसायटीमध्ये नोंदणी करून इतरांना परवाने दिले. यामुळे जय जगदांबा प्रॉडक्शन्सच्या हक्काचे व्यावसायिक नुकसान झाले, ब्रँडची प्रतिमा प्रभावित झाली आणि आगामी चित्रपटातील गाण्याच्या मार्केटिंगला धोका निर्माण झाला. कायदेशीर कारवाई चित्रपटाचे निर्माता संजीव राठोड यां...

‘प्रेमाची गोष्ट २’एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट

Image
'प्रेमाची गोष्ट २'  एका लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट  आधुनिक काळातील अनोखी प्रेमकथा सांगणारे धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि गाणी आधीच चर्चेत असून नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. या धमाल सोहळ्यात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी चित्रपटातील ‘ओल्या सांजवेळी २.०’ व  ‘ये ना पुन्हा’ या गाण्यांवर सुंदर नृत्य सादर केले. ट्रेलरमध्ये लालितच्या आयुष्यात आलेली वळणं ठळकपणे दिसत आहेत. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम. या सगळ्यामुळे त्याचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं आहे. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशेब करताना तो सगळ्याचा दोष देवाला देताना दिसतोय. परंतु देव त्याला खरंच नशिब बदलण्याची दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी लालितचं नशिब खरंच बदलेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. चित्रपटात आजच्या काळातील प्रेमाचे वास्तव...

वरुण धवन यांनी ‘इंडियाज बेस्ट वेडिंग मेकर्स’ पुरस्कार प्रदान

Image
व्होडका वरुण धवन यांनी 'इंडियाज बेस्ट वेडिंग मेकर्स' पुरस्कार प्रदान केले आणि नेहा धुपिया यांनी 'द ग्रेट इंडियन वेडिंग बुक' च्या ०५ व्या आवृत्तीचे अनावरण केले ~ ईशा गुप्ता यांनीही इंडियाज बेस्ट वेडिंग मेकर्स सन्मान प्रदान केले ~ मुंबई, 5 ऑक्टोबर 2025: लक्झरी आणि परंपरेचा मिलाफ असलेल्या एका झगमगत्या संध्याकाळी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यांनी इंडियाज बेस्ट वेडिंग मेकर्स (IBWM) 2025 कॉन्क्लेव्ह मध्ये सन्मान प्रदान केले, तर बहुगुणी अभिनेत्री नेहा धुपिया यांनी द ग्रेट इंडियन वेडिंग बुक (TGIWB) च्या 5 व्या आवृत्तीचे अनावरण केले. हा कार्यक्रम कॉपर इव्हेंट्स यांनी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी, मुंबई येथे आयोजित केला होता. ईशा गुप्ता यांच्या उपस्थितीने या सर्जनशीलता, कौशल्य आणि लक्झरीच्या रात्रीत आणखी तेज भरले. द ग्रेट इंडियन वेडिंग बुक (TGIWB) ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित वार्षिक कॉफी-टेबल बुक आहे जी लक्झरी वेडिंग्सचा प्रवास नोंदवते. इंडियाज बेस्ट वेडिंग मेकर्स (IBWM) कॉन्क्लेव्ह हा फक्त कार्यक्रम नव्हता; तो त्या प्रतिभावान व्यक्तींचा उत्सव होता जे लग्नांना अविस्मरणीय...

पुराणिक स्पिरिट्सचा प्रीमियम व्होडका आणि कॉन्यॅकसह भारतात प्रवेश

Image
पुराणिक स्पिरिट्सचा प्रीमियम व्होडका आणि कॉन्यॅकसह भारतात प्रवेश शेफ संजीव कपूर,अनुषा दांडेकर,सई मांजरेकर आणि महेश मांजरेकरांसह चित्रपटसृष्टीतील मान्यवर 'पुराणिक' च्या लॉचला उपस्थित प्रीमियम पेय उद्योगातील एक प्रतिष्ठित जागतिक नाव असलेल्या पुराणिक स्पिरिट्स कंपनीने आपल्या प्रमुख पोर्टफोलिओसह भारतीय बाजारपेठेत अधिकृत प्रवेशाची घोषणा केली आहे. मुंबईतील ताज लँड्स एंड येथे झालेल्या खास कार्यक्रमात ब्रँडने आपल्या दोन सिग्नेचर उत्पादनांचा म्हणजेच पुराणिक व्होडका, जी नऊ वेळा डिस्टिल केल्यामुळे अत्यंत स्मूथ आहे आणि पुराणिक व्हीएसओपी कॉन्यॅक, जे फ्रेंच कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, त्याचे भव्य अनावरण केले. या रणनीतिक प्रवेशाद्वारे पुराणिक स्पिरिट्सचा उद्देश युरोपीय डिस्टिलेशनचा वारसा भारतासारख्या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम स्पिरिट्स मार्केटमध्ये आणण्याचा आहे. कंपनीच्या उत्पादन केंद्रांचा पाया दोन जागतिक दर्जाच्या प्रदेशांमध्ये आहे. फ्रान्समधील कॉन्यॅक, जिथे परंपरेने उत्कृष्ट कॉन्यॅक, आर्मन्याक, लिकर्स आणि पिनो द शराँत वाईन्स तयार होतात आणि स्कॉटिश हायलँड्स, जिथे पुरस्कारप्राप...

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधील महेश मांजरेकर यांच्या लूकची सर्वत्र चर्चा

Image
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मधील महेश मांजरेकर यांच्या लूकची सर्वत्र चर्चा प हिल्यांदाच झळकणार साधूच्या रुपात! महेश वामन मांजरेकर लिखित, दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला असून, टिझर पाहून या सिनेमाबद्दलची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात चांगलीच वाढली आहे आणि त्यात भर घातली ती काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ या गाण्याने. या गाण्यात दिसणारा महेश मांजरेकर यांचा लूक प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज ठरला आहे. आतापर्यंत विविध सकारात्मक, नकारात्मक भूमिकांमध्ये दिसलेले मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यामुळे त्यांच्या या नवीन अवताराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या गाण्यात महेश मांजरेकर यांचा साधू रूपातील अतिशय वेगळा लूक पाहायला मिळत आहे. डोक्यावर भगवा कपडा, गळाभोवती रुद्राक्षांच्या माळा, विस्कटलेले केस, लांब दाढी आणि हातात शंख, या सर्वांमुळे त्यांची व्यक्तिरेखा प्रचंड उठून दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरील तीव्रता, डोळ्यातील चमक आणि व्यक्त होणारा करारी भाव पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी चाळवली आहे. महेश मांज...

चौथ्या आठवड्यातही दमदार दशावतार

Image
चौथ्या आठवड्यात दमदार दशावतार!! महाराष्ट्रात दिडशे चित्रपटगृहात दोनशेहून अधिक शो!! हिंदी चित्रपटांच्या लाटेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाने आपला गड उत्तम रित्या राखून ठेवला आहे. कंतारा’ च्या बरोबर आलेल्या बाॅलीवूडच्या चित्रपटाला कंताराने धडक दिली असली तरी ‘दशावतार’ ने चौथ्या आठवड्यातही आपले स्थान हलू दिलेले नाही. 1 चौथ्या आठवड्यातसुद्धा ‘दशावतार’ दिडशे थिएटर्स आणि सुमारे  दोनशे च्या वर शो तुफान गर्दीत सुरु आहेत. हीच मराठीतील सकस कथेची, अर्थपूर्ण मराठी चित्रपटाची आणि सुजाण मायबाप रसिकांच्या प्रेमाची ताकद आहे.  ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार ‘ चित्रपटाने गेले तीन आठवडे थिएटरमध्ये रसिकांचा धो धो वर्षाव पाहिला. अमेरिकेत शंभरहून जास्त शो होत आहेत तर ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देश येथे ‘दशावतार’ ने आपला झेंडा फडकवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच काळानंतर हे सळसळते चैतन्य लोकांना अनुभवायला मिळाले. दशावतार मुळे चित्रपट गृहांनी गणेशोत्सवानंतर लागलीच आपली दिवाळी साजरी केली.  कोकणातील अनेक बंद...

'प्रेमाची गोष्ट २’ मधून रिधिमा पंडितची मोठ्या पडद्यावर एन्ट्री!

Image
'प्रेमाची गोष्ट २'  चा मधून रिधिमा पंडितची मोठ्या पडद्यावर एन्ट्री! एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ हा दिवाळीत प्रदर्शित होणारा रोमॅण्टिक चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या चित्रपटात रिधिमा पंडित पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे. हिंदी मालिकांमधून (‘बहु हमारी रजनीकांत’, ‘खतरों के खिलाड़ी’) प्रचंड लोकप्रियता मिळवलेली रिधिमा तिच्या सोशल मीडियावरील सक्रिय उपस्थिती आणि रिलेटेबल कंटेंटमुळे जेन झी प्रेक्षकांमध्येही सुपरहिट ठरली आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट्स आणि रील्स नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात. त्यामुळे तिचं मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण केवळ मराठी चाहत्यांसाठीच नाही, तर हिंदी आणि तरुण प्रेक्षकांसाठीही एक खास सरप्राईज ठरणार आहे. नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘ये ना पुन्हा’ हे रिधिमा आणि ललित प्रभाकरवर चित्रित झालेलं रोमॅण्टिक गाणं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली असून, चित्रपटाबद्दलचं कुतूहल अधिकच वाढत चाललं आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाविषयी रिधिमा म्हणाली ,...

शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात ‘रणपति शिवराय’- स्वारी आग्रा

Image
  शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात   ‘ रणपति शिवराय’ -  स्वारी आग्रा छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी  ' श्री शिवराज अष्टक '  ही संकल्पना आणली. महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले. यातील  ‘ फर्जंद ’, ' फत्तेशिकस्त ',  शेर शिवराज , ‘ पावनखिंड ’, ‘ सुभेदार ’  ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांचं उदंड प्रेम आणि आशीर्वाद लाभले. या संकल्पनेतील सहावे चित्रपटरुपी पुष्प नवीन वर्षात १९ फेब्रुवारी २०२६ ला रसिक  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे नाव आहे.. ‘ रणपति शिवराय ’  - स्वारी आग्रा .  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल माध्यमातून या भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे.       छत्रपती शिवाजी महाराजांनी   अनेक मोठमोठ्या शत्रूंना आपल्या गनिमीकाव्याच...

'कढीपत्ता' चित्रपटाचा चटकदार टिझर प्रदर्शित...

'कढीपत्ता'  चा चित्रपटाचाा चटकदार टिझर प्रदर्शित... ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित... भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या 'कढीपत्त्या'चा सुगंध सध्या मराठी सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत पसरला आहे. 'कढीपत्ता' शीर्षक असलेला आगामी मराठी चित्रपट शीर्षकापासून नायक-नायिकेच्या नव्या कोऱ्या जोडीपर्यंतच्या विविध वैशिष्ट्यांमुळे लाइमलाईटमध्ये आला आहे. घोषणेनंतर पोस्टर्सच्या माध्यमातून या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला होता.  आता 'कढीपत्ता'चा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. शीर्षकाप्रमाणेच 'कढीपत्ता'चा टिझर चटकदार असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अल्पावधीतच 'कढीपत्ता'चा टिझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढविण्यात यशस्वी ठरला आहे. ७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 'कढीपत्ता'ची प्रस्तुती युवान प्रोडक्शनची असून, निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे. दिग्दर्शक विश्वा यांनी कथा लेखनासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळल...

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रावण कॅालिंग’

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार  'रावण कॉलिंग' ९ जानेवारीला होणार प्रदर्शित... दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पहिली झलक प्रदर्शित मराठी पडद्यावर लवकरच एका थ्रिलर, कॅामेडी  सिनेमाची एंट्री होणार असून येत्या नवीन वर्षात म्हणजेच ९ जानेवारी २०२६ मध्ये ‘रावण कॉलिंग’ हा धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. पोस्टरमध्ये लालसर पार्श्वभूमीवर आगीच्या ज्वाळांमध्ये जळणारी रावणाची मूर्ती दाखवण्यात आली आहे. धगधगत्या आगीतून उमटणारी ही छबी प्रेक्षकांना एका अनोख्या आणि रोमांचकारी प्रवासाची चाहूल देणारी आहे. गोल्डन गेट प्रॅाडक्शन निर्मित आणि मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी एकत्रितपणे सांभाळली आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा सुपुत्र अभिषेक गुणाजी या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. यात सचित पाटील, वंदन...

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर  'आली मोठी शहाणी'  ची घोषणा   ह्रता दुर्गेळे-सारंग साठ्ये पहिल्यांदाच झळकणार एकत्र मराठी चित्रपटसृष्टीत सतत नवनवीन प्रयोग होत आहेत. दमदार कथा, हटके विषय आणि फ्रेश जोड्या यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायमच वाढत असते. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एका खास चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना एक आगळीवेगळी ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून या चित्रपटात पहिल्यांदाच हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या ताज्या केमिस्ट्रीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.  ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटातून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी प्रेक्षकांसमोर घेऊन येणारे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यावेळी या नव्या जोडीला घेऊन येत आहेत. दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले , “लवकरच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहोत. या चित्रपटाची कथा लवकरच समोर येईल, इतकं नक्की की, हृता आणि सारंग यांच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देती...

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ ३१ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित चित्रपटाचा नवीन टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला !

Image
स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘ 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'  ३१ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित... चित्रपटाचा नवीन टिझर आला प्रेक्षकांच्या भेटीला! ‘’स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’’या दमदार घोषणेने महाराष्ट्रात एका विलक्षण चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून त्यांच्या सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्...

‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Image
तरुणाईला प्रेमाचा जादूई अनुभव देणारं 'ये ना पुन्हा' गाणं प्रदर्शित ! 'प्रेमाची गोष्ट २'  मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटी़ला.... एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता या चित्रपटातील पहिलं गोड, रोमँटिक गाणं ‘ये ना पुन्हा’ प्रदर्शित झालं आहे. रोहित राऊतच्या युथफुल आणि फ्रेश आवाजात सादर झालेलं हे गाणं श्रोत्यांना प्रेमाच्या नव्या भावविश्वात घेऊन जाणारं आहे. अविनाश–विश्वजीत यांनी दिलेलं आकर्षक आणि मॉडर्न टच असलेलं संगीत, तसेच विश्वजीत जोशी यांनी लिहिलेले आजच्या पिढीच्या मनाला भिडणारे शब्द यामुळे हे गाणं तरुणाईला निश्चितच आवडेल. हे गाणं ऐकताच कोणालाही प्रेमात हरवल्यासारखं, आठवणींमध्ये रममाण झाल्याचं वाटेल. दिग्दर्शक सतीश राजवाडे सांगतात , “प्रेमाच्या प्रवासातील काही क्षण आयुष्यभर लक्षात राहातात. ‘ये ना पुन्हा’ हे गाणं त्या क्षणांची जादू प्रामाणिकपणे प...
 

अनिता भाबी आणि तिवारीजी यांनी मुंबईतील गरबा नाइटमध्‍ये उत्‍साहाची भर केली

Image
  अ निता भाबी आणि तिवारीजी   यांनी मुंबईतील गरबा नाइटमध्‍ये उत्‍साहाची भर केली मालिका  ‘ भाबीजी घर पर है'मधील लोकप्रिय जोडी विदिशा श्रीवास्‍तव व रोहिताश्‍व गौड हजारो चाहत्‍यांसोबत सामील झाले आणि गरबा, आनंद व उत्‍सवी उत्‍साहाने भरलेल्‍या गरबा नाइटमध्‍ये नवरात्री साजरा करण्‍याचा आनंद घेतला भारतातील भव्‍य सणांपैकी एक नवरात्री सण जगभरात जल्‍लोषात साजरा केला जातो. या वर्षी  एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका  ‘ भाबीजी घर पर है' मधील लोकप्रिय जोडी  अनिता भाबी (विदिशा श्रीवास्‍तव)  व  मनमोहन तिवारी (रोहिताश्‍व गौड)  यांनी मुंबईतील प्रसिद्ध गरबा नाइटमध्‍ये उतसाहाची भर केली आणि चाहत्‍यांसोबत उत्‍सवी उत्‍साहाचा आनंद घेतला. हे साजरीकरण दुप्‍पट आनंदाचे ठरले, जेथे एण्‍ड टीव्‍ही लवकरच नवीन अलौकिक शक्‍तीसंदर्भातील विनोदी मालिका  ‘ घरवाली पेडवाली' सूरू करण्‍यास सज्‍ज आहे,ज्‍यामुळे प्रेक्षकांना अधिक मनोरंजन मिळणार आहे. उत्‍सवी उत्‍साहाची भर करत  रोहिताश्‍व गौड  ऊर्फ  मनमोहन तिवारी  म्‍हणाले,  “ तिवारीजीचे अनिता भाबीसोबत गरबा खेळण्‍याची संध...