दिपिका पादुकोण..
दिपिका आपल्या आगामी शकुन बत्रा यांच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या नियमित वाचनातून करतेय व्यक्तिरेखेचा अभ्यास! दिपिका आपल्या आव्हानात्मक भूमिकांच्या प्रक्रियेबाबत अधिक चर्चा करत नसेल, मात्र त्याविषयी प्रत्येक वेळी काही ना काही नवी माहिती हाती येते ज्यामुळे दिपिका आपल्या व्यक्तिरेखांचा कसा सखोल अभ्यास करते, हे कळते. अभिनेत्रीच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की,"दिपिकाने आपल्या दिवसातील काही वेळ शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी राखून ठेवला असून ती त्या स्क्रिप्टची काही पाने वाचण्यासाठी नियमित वेळ काढते आहे. या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेची तिला इतक्यात अधिक तयारी करायची नसली तरी, तिला आपल्या या व्यक्तिरेखेतून पूर्णपणे बाहेर देखील पडायचे नाही. कारण लॉकडाऊन उठल्यानंतर ती याच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे." जर लॉकडाऊन नसता तर, अभिनेत्री ने श्रीलंकेमध्ये चित्रपटाचे एक शेड्यूल आतापर्यंत पूर्ण केले असते. दिपिकाने या आधी देखील शकुन बत्रा यांच्या सोबत काम केले आहे, त्यांच्या सिनेमच्या स्वादाविषयी ती अनेकदा बोलली आहे आणि त्यामुळे ती त्यांच्या या ...