विद्या बालनने आपला चित्रपट 'शकुंतला देवी'च्या प्रदर्शनाआधी, ब्लैक एंड वाइटमध्ये भारतीय मुलींसाठी समर्पित केली एक कविता #womensupportingwomen
प्रत्येक आई- मुलीचे नाते हे आपल्यामध्ये एक खास असते. हे एक अनमोल मैत्रीचे आणि अगणित प्रेमाचे असे नाते असून त्याची व्याख्या करता येत नाही किंवा त्याला शब्दात देखील बसवता येणार नाही. आणि या नात्यांचे हे समीकरण प्रतिभावान गणितज्ञ शकुंतला देवी यांच्यासाठी देखील खरे होते, ज्या केवळ एक गणितीय आश्चर्य नव्हत्या तर एक प्रेमळ आई देखील होत्या. आपण  त्यांच्यावरील बायोपिकच्या रोमांचक प्रीमियर साठी सज्ज आहोत, विद्या बालन, जी यात गणिताच्या किमयागाराची भूमिका साकारणार आहे, तिने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी भारतातील सर्व मुलींसाठी एक कविता समर्पित केली आहे.
सुंदर मोनोक्रोमवर चित्रित करण्यात आलेल्या या कवितेला विद्याने सुंदरपणे सादर केले आहे की कशातऱ्हेने एक आई देखील कधी तरी मुलगी होती. कवितेतून प्रत्येक मुलीला निडर आणि सशक्त होण्याविषयी सांगितले आहे, जो वाटेतल्या सर्व काचांना चिरत पुढे जाईल आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट, आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्वतःवर अटळ विश्वास ठेवेल.
प्रत्येक महिलेला स्वतःला प्राथमिकता देण्यासाठी प्रोत्साहित करताना, विद्या बालनची ही भावुक आदरांजली खरोखर, यावेळी अतिशय महत्वपूर्ण आहे. एका  प्रेरणादायक महिलेचे चित्रण करताना, जी प्रगतिशील आणि आपल्या काळाच्या पुढे आहे, विद्या बालनने ऑन आणि ऑफ स्क्रीनवरील आपल्या कमालीच्या प्रेझेन्सने आपल्याला मुग्ध केले आहे. 'शकुंतला देवी' 31 जुलैला खास करून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
Link - https://youtu.be/RTDzS7TYSio

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..