सलाम बॉम्‍बे फाऊंडेशन वेबिनारचा राष्‍ट्रीय पोषण महिन्यानिमित्त कोविड-१९ दरम्‍यान रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍याच्‍या महत्त्वावर भर

मानवी संसाधन विकास मंत्रालयाने (एमएचआरडी) जारी केलेल्या मार्गदर्शकतत्त्वांच्या अनुषंगाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या वेबिनारने स्‍कूल अॅण्‍ड कम्‍युनिटी न्‍यूट्रिशन गार्डनिंगच्‍या महत्त्वाला  दाखवले.

मुंबई, २१ सप्‍टेंबर २०२०: व्‍यक्‍तीच्‍या सर्वांगीण विकासासाठी आरोग्‍य चांगले असणे आवश्‍यक आहे. पोषण हे आरोग्‍य चांगले आणि टिकवून ठेवण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. जलद वाढ व विकासाचा टप्पा असलेल्‍या पौगंडावस्‍थेमध्‍ये त्‍यांच्‍या शारीरिक व मानसिक विकासाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी उच्‍च पौष्टिक घटकांची गरज आहे. पौगंडावस्‍था हा असा काळ आहे, ज्‍यामध्‍ये भावनिक व वागणूकीसंदर्भातील पद्धती ठरतात, ज्‍या वृद्धापकाळापर्यंत राहतात. सध्‍याच्‍या महामारीदरमयान आहारासंदर्भात योग्‍य निवड, तसेच आरोग्‍यदायी आहाराचे सेवन व शारीरिक व्‍यायामाचे महत्त्व वाढले असल्‍यामुळे सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनने एका वेबिनारचे आयोजन केले. या वेबिनारचे नाव होते - 'कोविड-१९ दरम्‍यान रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासंदर्भात पोषणाचे महत्त्व आणि स्‍कूल अॅण्‍ड कम्‍युनिटी न्‍यूट्रिशन गार्डनिंगच्‍या दृष्टिकोनातून पोषण व आरोग्‍याकडे लक्ष'.

याप्रसंगी भारताच्‍या पश्चिमी प्रांतामधील एफएसएसएआयचे उपसंचालक डॉ. कृष्‍णा मेथेकर हे सन्‍माननीय अतिथी होते. त्‍यांनी 'कोविड-१९ महामारीदरम्‍यान रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासंदर्भात पोषणाच्या महत्त्वा'बाबत माहिती सांगितली. वेबिनारमध्‍ये इतर अतिथी प्रवक्‍ते होते मायकेल हायस्‍कूलच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती जीनी गोम्‍स,ज्‍यांनी 'शालेय परिसरातील किचन गार्डनिंग - अनुभव' या विषयाबाबत माहिती सांगितली आणि भारतातील अर्बन लीव्‍ह्जच्‍या संस्‍थापिका श्रीमती प्रीती पाटील,ज्‍यांनी 'किचन गार्डनिंग आणि अपशिष्टव नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर करून घरीचखत तयार करणे' याबाबत माहिती सांगितली. मानवी संसाधन विकास मंत्रालयाने (एमएचआरडी) जारीकेलेल्या मार्गदर्शकतत्त्वांच्या अनुषंगाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या वेबिनारने 'स्‍कूल अॅण्‍ड कम्‍युनिटी न्‍यूट्रिशन गार्डनिंग'च्‍या महत्त्वावर देखील लक्ष केंद्रित केले. या वेबिनारचा स्‍कूल न्‍यूट्रिशन (किचन) गार्डन्‍स स्‍थापित करण्‍याला प्रोत्‍साहन देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे शालेय मुलांमधील कुपोषण व सूक्ष्‍म-पोषण कमतरतेचे निराकरण करण्‍यामध्‍ये मदत होईल आणि मुलांना देखील त्‍यांचे स्‍वत:चे अन्‍न बनवण्‍याचे कौशल्‍य अवगत करता येईल.

याप्रसंगी बोलताना भारताच्‍या पश्चिमी प्रांतामधील एफएसएसएआयचे उपसंचालक डॉ. कृष्‍णा मेथेकर म्‍हणाले,''लॉकडाऊनदरम्‍यान देखील प्रीव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थ प्रोग्रामसह अथक मेहनत घेत असलेल्‍या सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनचे मी आभार मानतो. पौष्टिक आहाराचे सेवन करणे, फळांचे सेवन करत जीवनसत्त्व क मिळवणे आणि सर्व सुरक्षा व स्‍वच्‍छताविषयक नियमांचे पालन करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.तरूणांना याबाबत जागरूक करणे अत्‍यंत प्रशंसनीय आहे. आणि हो, शारीरिक व्‍यायामासोबत चिंतनासाठी योगा हे भावी भारतीय पिढीला आरोग्‍यदायी बनवतात.''

सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या प्रीव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थ प्रोग्रामच्‍या वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक श्रीमती प्रीती वैष्‍णव म्‍हणाल्‍या,''एसबीएफमध्‍ये आम्‍ही पोषण व आरोग्‍यदायी आहार सवयींबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी सातत्‍याने प्रयत्‍न करत आलो आहोत. ज्‍यामुळे पौगंडावस्‍थेतील मुलांना आहारासंदर्भात योग्‍य निवड करण्‍यामध्‍ये मदत होऊ शकेल. परिणामत: त्‍यांची वाढ, विकास व रोजच्‍या कृतींवर सकारात्‍मक परिणाम घडून येईल. तसेच त्‍यांचे शिक्षण व शिक्षणोत्तर उपक्रमांसाठी सकारात्‍मक परिणाम घडून येईल. आम्‍ही वर्ष २०१७ पासून आमचा उपक्रम 'खाना - नॉलेज ऑन हेल्थ अॅण्‍ड न्‍यूट्रिशन फॉर अडोलसट्स' या आरोग्‍य व पोषणावरील शालेय प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून हे कार्य करत आलो आहोत. महामारीमुळे प्रत्यक्षसंपर्क व ये-जा थांबली असल्‍यामुळे आम्‍ही या उपक्रमाप्रती आमचे प्रयत्‍न सुरू ठेवण्‍यासाठी व्‍हर्च्‍युअल मार्गाचा अवलंब करण्‍याचे ठरवले आणि आम्‍ही आतापर्यंत २२० बीएमसी व अनुदानित शाळांमधील १३,००० ते १५,००० हून अधिक विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचलो आहोत. आम्‍ही नियमितपणे कनेक्‍टेड असलेल्‍या ऑनलाइन सत्रांच्‍या माध्‍यमातून हे कार्य करत आहोत. या सत्रांमध्‍ये आमचे फॅसिलिटेटर्स स्‍पष्‍टीकरण देतात, खेळ व उपक्रम, चर्चासत्रे व प्रश्‍नोत्तरे फे-यांचे आयोजन करतात. मुले व त्‍यांच्‍या पालकांशी सत्रांच्‍या माध्‍यमातून संपर्क साधण्‍यात येत आहे. ही सत्रे झूम, गुगल, मायक्रोसॉफ्ट आधारित व्‍यासपीठांच्‍या माध्‍यमातून सादर करण्‍यात आली. आमचा उद्देश मार्च २०२१ पर्यंत जवळपास २०,००० विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचण्‍याचा आहे.''

सलाम बॉम्‍बे प्रीव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थ प्रोग्रामचा फोकस विशेषत: कोविड प्रादुर्भावादरम्‍यान तंबाखू सेवनाचे प्रतिकूल परिणाम, पोषण, स्‍वच्‍छता आणि शारीरिक व्‍यायाम व मानसिक आरोग्‍याचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करण्‍यावर आहे. यासोबत स्‍कूल अॅण्‍ड कम्‍युनिटी न्‍यूट्रिशन गार्डनिंगचे महत्त्व देखील सांगितले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..