डॉक्टर डॉनने गाठला १०० भागांचा यशस्वी टप्पा! कोविडच्या पार्श्वभूमीवर टीमने एक घेतला एक कौतुकास्पद निर्णय!
रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. देवा भाईची हटके स्टाईल, त्याची भन्नाट गॅंग, डॉलीबाई आणि त्याची जुगलबंदी आणि मुलीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्या कॉलेजमध्ये देवा भाईने केलेला दंगा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील देवा आणि डॉक्टर मोनिका ही पात्रं तर त्यांच्या मनात घरकरून बसली आहेत. सोशल मीडियाद्वारे देखील या कलाकारांवर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.
या मालिकेने नुकताच १०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे. १०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं पण कोविड १९ महामारीच्या परिस्थितीत डॉक्टर डॉनच्या टीमने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सध्याची परिस्थिति आणि इतर मालिकांच्या सेटवर नुकत्याच झालेल्या दुःखद घटनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय समंजसपणे हा माईलस्टोन साजरा न करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे.
देवा भाई म्हणजे देवदत्त नागे यांनी सांगितले, "प्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांचा मालिकेला मिळणार प्रतिसाद हीच या संपूर्ण टीमसाठी त्यांच्या कामाची पावती आहे. त्यामुळे हि मालिका अशा प्रकारेच प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहो आणि असे अनेक माईलस्टोन पुढे साजरे करत राहण्याची संधी वारंवार मिळत राहो अशी इच्छा आमची सम्पूर्ण टीमची आहे."
Comments
Post a Comment