माझगाव डॉक

माझगाव डॉकच्या आयपीओची किंमत Rs.१३५-१४५ प्रति शेअर इतकी असेलहा पब्लिक इश्यु २९ सप्टेंबर २०२० रोजी खुला होईल

·         Rs.१३५ - Rs.१४५ दरम्यान प्रत्येक शेअरची किंमत असेलदर्शनी मूल्य प्रत्येकी Rs. १०

·         भागविक्री सुरू होण्याची तारीख – २९ सप्टेंबर २०२० आणि भागविक्री बंद होण्याची तारीख – १ ऑक्टोबर २०२०

·         किमान बोली (मिनिमम बिड लॉट) १०३ समभाग आणि त्यानंतर १०३ समभागांच्या पटीत

·         ऑफर आणि नेट ऑफरमध्ये आमच्या कंपनीच्या पोस्ट ऑफर पेड अप इक्विटी शेअर कॅपिटलच्या अनुक्रमे १५.१७आणि १५. ००समभाग समाविष्ट असतील.

·         फ्लोअर किंमत ही इक्विटी शेअर्सच्या दर्शनी किमतीपेक्षा १३.५ पट आहे आणि कॅप किंमत ही इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या १४.५ पट आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या (आमची कंपनी किंवा इश्युअर) ३०,५९९,०१७ शेअर्सचे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग करण्यात येत आहे. त्यांचे दर्शनी मूल्य प्रत्येकी Rs.१० आहे. हे ऑफरिंग भारत सरकारच्या संरक्षण मत्रालयाच्या माध्यमातून काम करणाऱ्या राष्ट्रपतींकडून विक्रीसाठी देण्यात आले आहे. यांची किंमत प्रत्येक इक्विटी शेअरसाठी Rs.[●] (ऑफर किंमत) आहेयाचे एकूण मूल्य Rs.[●] दशलक्ष (ऑफर) असेल. ३४५,५१७ शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी (खालील व्याख्येनुसार) (कर्मचारी आरक्षण हिस्सा) आरक्षित आहेत. कर्मचाऱ्यासाठी आरक्षित असलेला हिस्सा वगळून असलेल्या ऑफरला नेट ऑफर असे म्हटले आहे. या ऑफरमध्ये ३०,२५३,५०० इक्विटी शेअरची नेट ऑफर आणि ३४५,५१७ शेअर्सचा कर्मचारी आरक्षित हिस्सा समाविष्ट आहे. ऑफर आणि नेट ऑफरमध्ये आमच्या कंपनीचे अनुक्रमे १५.१७% आणि १५.००% पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल समाविष्ट आहे. 

मुंबई२४ सप्टेंबर २०२० : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीला मिनी रत्न श्रेणीने पुरस्कृत करण्यात आले आहे. भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पारंपरिक पाणबुड्यांची बांधणी केवळ याच भारतीय जहाजबांधणी कंपनीने केली आहे (स्रोत : क्रिसिल अहवाल). या कंपनीतर्फे प्राथमिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) २९ सप्टेंबर २०२० रोजी सुरू करण्यात आलेला आहे आणि १ ऑक्टोबर २०२० रोजी ही विक्री बंद होणार आहे. प्रत्येक समभागाची किंमत Rs.१३५ ते Rs.१४५ या दरम्यान असणार आहे.  

सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (नियमन) नियम १९(२)(ब)१९५७ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यु ऑफ कॅपिटल अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट) नियम२०१८ च्या सुधारित नियम ३१ ला अनुसरून असलेल्या बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून ही ऑफर करण्यात आली आहेजिथे क्यूआयबी (क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्स) नेट ऑफरच्या ५०%हून अधिक नाहीनॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्स नेट ऑफरच्या किमान १५% आहेत आणि रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स नेट ऑफरच्या किमान ३५% आहेत.

आमच्या कंपनीच्या १५.१७% प्रि-ऑफर पेड अप इक्विटी शेअर कॅपिटलची शेअरहोल्डरना विक्री करून ३०,५९९,०१७ इक्विटी शेअर्सची निर्गुंतवणुक करणे हा या ऑफरचा हेतू आहे. या इश्युमधून जमा होणारा निधी भारत सरकारच्या (विक्री करणारा शेअरहोल्डर) संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून काम करणाऱ्या राष्ट्रपतींकडे जाईल.

येस सिक्युरिटीज इंडिया लिमिडेटअॅक्सिस कॅपिटल लिमिटेडएडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडडॅम कॅपिटल अॅडव्हायजर्स लिमिटेड (पूर्वीचे आयडीएफसी सिक्युरिटीज लिमिडेड) आणि जेएम फायनान्शिअल्स लिमिटेड हे या ऑफरसाठी बीआरएलएम आहेत.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल : एमडीएल ही संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण निर्मिती विभागांतर्गत असलेली संरक्षण सार्वजनिक जहाजबांधणी कंपनी आहे. त्यांची कमाल जहाजबांधणी आणि पाणबुडीची क्षमता ४०,००० डीडब्ल्यूटी इतकी आहे (स्रोत : क्रिसिल अहवाल). संरक्षण मंत्रालयासाठी भारतीय नौदलाकडून वापरण्यात येणाऱ्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी इतर जहाजांची बांधणी आणि दुरुस्ती करतात. ही पूर्णपणे सरकारच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीला २००६ साली मिनी रत्न ही प्रतिष्ठित श्रेणी डीपीईने प्रदान केली. भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या यांची निर्मिती करणारी ही एकमेव कंपनी आहे. त्याचप्रमाणे भारतात कोर्व्हेट्स (वीर आणि खुकरी या विभाग) निर्मिती करणारी ही एकमेव कंपनी आहे. (स्रोत : क्रिसिल अहवाल). जहाजबांधणीपाणबुड्या आणि अवजड अभियांत्रिकी व्यवसाय विभागांमध्ये ही कंपनी काम करते. त्यांच्या जहाजबांधणी विभागात नौदल नौकांची बांधणी आणि दुरुस्ती यांचा समावेश आहे. ही कंपनी सध्या  चार पी-१५बी डिस्ट्रॉयर आणि चार पी-१७ए स्टील्थ फ्रिगेटची निर्मिती करत आहे आणि भारतीय नौदलाच्या वापरासाठी संरक्षण मंत्रालयासाठी जहाजांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करत आहे. त्यांच्या पाणबुडी आणि अवजड अभियांत्रिकी विभागातर्फे डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांची बांधणीदुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे काम करण्यात येते. नेव्हल ग्रुपसमवेत असलेल्या तंत्रज्ञान कराराच्या हस्तांतरणाचा भाग म्हणून या कंपनीतर्फे सध्या ४ स्कॉर्पिन विभागातील पाणबुड्यांची बांधणी/डिलिव्हरीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या वापरासाठी संरक्षण मंत्रालयासाठी एका मीडियम रिफिट आणि पाणबुडीचे लाइफ सर्टिफिकेशन करण्यात येत आहे. १९६० पासून एमडीएलने एकूण ७९५ जहाजांची बांधणी केली आहे. यात आधुनिक विध्वंसकांपासून ते मिसाइल बोटी आणि पाणबुड्या अशा एकूण २५ युद्धनौकांची बांधणी केली आहे. (स्रोत : क्रिसिल रिपोर्ट). या कंपनीतर्फे मालवाहू नौकाप्रवासी जहाजेसप्लाय व्हेसल्सबहुपयोगी सपोर्ट व्हेसल्सवॉटर टँकर्सटग्सड्रेजर्सफिशिंग ट्रॉलर्सबार्जेस आणि भारतातील तसेच परदेशातील अनेक ग्राहकांसाठी बार्जेस आणि बॉर्डर आउटपोस्ट्सची निर्मिती केली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..