ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडकडून १ जानेवारी २०२१ पासून लागू होणा-या सर्वसाधारण दरवाढीची घोषणा
- १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत साइन अप करणा-या ग्राहकांसाठी वाढीव दर लागू होणार नाहीत
मुंबई, २३ सप्टेंबर २०२०: ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड या दक्षिण आशियाच्या प्रिमिअर एक्स्प्रेस हवाई आणि एकीकृत परिवहन व वितरण एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स कंपनीने आज १ जानेवारी २०२१ पासून लागू होणा-या सर्वसाधारण दरवाढ (जीपीआय)ची घोषणा केली. सरासरी शिपमेंट किंमतीमध्ये शिपिंग प्रोफाइलनुसार वर्ष २०२०च्या तुलनेत ९.६ टक्क्यांची वाढ होईल.
ब्लू डार्ट महागाई, चलन व्यवहार, इंधन खर्चामधील चढ-उतार आणि इतर उदयास येणारे नियामक व अनिवार्य खर्च जसे कंपनी सेवा देत असलेल्या अनेक ठिकाणी कर्मचारी सुधारित सुरक्षितता नियमांचे पालन करत असल्याची खात्री घेण्यासंदर्भात असलेला खर्च लक्षात घेऊन दरवर्षाला त्यांच्या किंमतींमध्ये समायोजन करते.
या घोषणेबाबत बोलताना ब्लू डार्टचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बालफोर मॅन्युएल म्हणाले, ''ब्लू डार्ट उद्योगक्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण व सुलभ सोल्यूशन्सची व्यापक रेंज देते. देशाप्रती 'ट्रेड फॅसिलिटेटर' म्हणून आमची भूमिका अधिक प्रबळ करत आमच्या टीम्सनी महामारीदरम्यान प्रत्येक दिवशी काम करत आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे होण्याची खात्री घेतली. आपण नवीन नियमांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना ब्लू डार्ट सातत्याने ग्राहक अनुभव सुधारण्यासोबत वाढवण्यासाठी प्रत्येक आवश्यक पाऊल उचलत आहे. सर्वसाधारण दरवाढ आम्ही केलेल्या खर्चानुसार, तसेच आमच्या ग्राहकांना बेस्ट अनुभव देण्यासाठी आमच्या पायाभूत सुविधा व तंत्रज्ञानामध्ये केलेल्या गुंतवणूकीनुसार असणार आहे. आमचा आमच्या क्षमता वाढवण्याचा आणि महामारीच्या काळात प्रथम, मध्यम व शेवटच्या अंतरापर्यंतच्या डिलिव्हरीजसाठी तंत्रज्ञान व डिजिटायझेशन क्षमतांचा उपयोग करत आमच्या ग्राहकांना अधिक स्थिर सोल्यूशन्स देण्याचा मनसुबा आहे. तसेच आमचा आमच्या ग्राहकांसाठी विश्वसनीय ब्रॅण्ड म्हणून आमची विजयी घौडदौड कायम ठेवण्याचा आणि प्रोव्हायडर ऑफ चॉइस कंपनी असण्यामध्ये प्रत्येक खात्री घेण्याचा देखील मनसुबा आहे.''
ब्लू डार्टचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी आणि व्यवसाय विकासाचे प्रमुख केतन कुलकर्णी म्हणाले, ''एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स उद्योगक्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेल्या ब्लू डार्टने गतीशील वातावरणाला अनुसरून अग्रणी राहण्यासाठी धोरणात्मक गुंतवणूका केल्या आहेत. यामध्ये आमच्या पोहोचमध्ये विस्तारीकरण, परिवहन कालावधीमध्ये सुधारणा, नेटवर्क सानुकूलन, पायाभूत सुविधा व तंत्रज्ञान सोल्यूशन्स आणि उदयोन्मुख बाजारपेठा, एसएमई व प्रमुख विभागांवर फोकस यांचा समावेश आहे.''
देशातील ई-कॉमर्स, लाइफसायन्सेस अॅण्ड हेल्थकेअर, ऑटोमोबाइल्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, बँकिंग / आर्थिक सेवा आणि विमा अशा विभागांमधील अग्रणी कंपन्यांसाठी प्रोव्हायडर ऑफ चॉइस असलेली कंपनी ब्लू डार्ट तंत्रज्ञान, ऑटोमेशन व पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने गुंतवणूक करण्याशी कटिबद्ध आहे, ज्यामुळे ऑफर करण्यात येणारे सोल्यूशन्स उद्योगक्षेत्रामध्ये बेंचमार्क्स स्थापित करतील आणि जागतिक दर्जांनुसार असतील.
Comments
Post a Comment