दस-याच्या मुहूर्तावर सोनाली खरे करतेय 8 वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक

अभिनेत्री सोनाली खरे 2014 मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा दस-याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात परततेय. कलर्स मराठीवरच्या ‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे. 
आपल्या कमबॅकविषयी सोनाली खरे म्हणते, “मला आनंद आहे की, मी पून्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परततेय. स्वयंपाक करणं, कोणत्याही गृहिणीला नवीन नाही. आणि मला पहिल्यापासूनच बेकिंगची आवड होती. पण लॉकडाउनमध्ये मी भरपूर नव्या रेसिपी शिकले. त्यामूळे जणू ह्या शोची रंगीत तालिम झाली होती. त्यात मला माझ्या काही पूर्वीच्या सहकलाकारांसोबतही ह्या शोमूळे स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे, ह्याचा एक वेगळाच आनंद आहे.”
सोनालीने ह्याअगोदर ‘कॉलेज माझी जान’, ‘गमंतगढ’, ‘आम्ही सारे खवैय्ये’, अशा टेलिव्हिजन शोजचे सुत्रसंचालन केले होते.आता  सोनालीच्या चाहत्यांना दस-यापासून तिला टेलिव्हिजनवर पून्हा पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.  
ह्या शोची खासियत सांगताना सोनाली म्हणते, “इतर कुकिंगविषयीच्या शोमध्ये फक्त येणारे पाहुणेच रेसिपी दाखवतात. पण इथे मात्र मीही काही पदार्थ बनवणार आहे. योगाभ्यांसामूळे शिकलेल्या काही टिप्स आणि काही किचनटिप्सही मी शेअर करणार आहे. आलेल्या पाहुण्यांसोबत माझ्या कुकिंगविषयीच्या गप्पा रंगणार आहेत. काही फुडरिलेटेड खेळही असतील. जे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजक वाटतील. असं मला वाटतं.”  
‘न्यू नॉर्मल’मध्ये शुटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल सोनाली म्हणते, “सतत मास्क घालण्याची सवय नसते. त्यामूळे पूर्णवेळ मास्क घालून शूटिंगस्थळी राहणं, हे थोडं दमछाक करवणारं असलं, तरीही आपल्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे, असं मला वाटतं. स्वादिष्ट जेवण बनवण्याची पहिली पायरी ही स्वच्छता (hygine) आहे. त्यामूळे सेटवरचं वातावरणं तसंच असतं, ह्याचा मला आनंद आहे.”

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..