नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तेजस्विनी पंडित म्हणतेय, ‘भूतदया परमो धर्मा:’ !!

अभिनेत्री तेजस्विनी पंडित यंदाच्या नवरात्रीमध्ये कोरोनायोध्द्यांना ईलस्ट्रेशन फोटो सीरिजव्दारे आदरांजली अपर्ण करत आहे. नऊ दिवसात नऊ वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कोरोनायोध्द्यांना ट्रिब्यूट देण्यसाठी चालू केलेल्या फोटो सीरिजमध्ये पाचव्या दिवशी तिने प्राणीमात्रांवर भूतदया करण्याचा सामाजिक संदेश दिलेला आहे.

प्राण्यांना मायेने खाऊ घालणा-या प्राणीमित्रांमधल्या दैवी कर्मांना ह्या फोटोव्दारे तेजस्विनी पंडितने आदरांजली अर्पण केली आहे. तेजस्विनी पंडित म्हणते, भूतदया परमो धर्मा: ही शिकवण आज आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कोरोना पसरण्याची सुरूवात होण्याच्या काळात एक अफवा पसरली होती, की, प्राण्यांमूळेही कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा ह्या अफवेची सत्यासत्यता न पडताळता अनेकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढले होते. ह्याच काळात अचानक सगळं लॉकडाऊन झाल्याने अनेक रस्त्यावरच्या प्राण्यांवर आणि पक्षांवरही उपासमारीची पाळी आली. तेव्हा प्राणीमित्र देवासारखे धावून गेले. आणि ह्या मुक्या जीवांना मदतीचा हात दिला. त्यांना आपल्या घासातला घास दिला. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता घराबाहेर पडून मुक्याजीवांना जवळ करणा-या प्राणीमित्रांना ह्या ईलस्ट्रेशन फोटोव्दारे माझे वंदन आहे.

तेजस्विनी पूढे म्हणते, माणूस तोंडाने सांगू शकतो की, त्यांला काही त्रास होतोय. पण हे बिचारे मुके प्राणी मात्र आपलं दुखणं-खुपणं नाही सांगू शकतं. ते बोलू शकत नाही, ह्याचा अर्थ की त्यांना भावना नसतात, असा नाही. पण आज जिथे माणूसच माणसाला विसरलाय, तिथे प्राण्यांची काय अवस्था झाली असेल. आपल्याकडे जनावरांना काहीच महत्व दिलं जात नाही हे दुर्देव. प्राणीमित्रांना आणि प्राणीमित्रसंघटनांनाही सरकारचा विशेष पाठिंबा नाही. प्राण्यांच्या शेल्टरहोमना अचानक बंद केल्याने अनेक आजारी- म्हातारे प्राणी बेवारशाप्रमाणे रस्त्यावर आले. हे सगळं कुठेतरी मनात खदखदत होतं. जे ह्या फोटोव्दारे साकारण्याचा प्रयत्न केलाय.” 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..