टेमासेक यांनी स्थापन केलेल्या गुडवर्कर चे सोनू सूद आणि स्कूलनेट सोबत सहकार्यकष्टकरी कामगारांसाठी तंत्रज्ञान व्यासपीठ उभारण्यात रुपये 250 कोटींची गुंतवणूक करणार

  • प्रवासी रोजगारसोनू सूद आणि स्कूलनेट यांच्या उपक्रमात चार महिन्यांच्या कालावधीत 10 लाख रोजगार इच्छुकांना संधी देत हजारो कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत
  • 10 कोटी कष्टकरी कामगारांना रोजगारसक्षमताकौशल्यवृद्धीआर्थिक आणि इतर सेवा‌ देऊ करण्यासाठी गुडवर्कर करणार प्रवासी रोजगार ची वृद्धी

मुंबई, 26 नोव्हेंबर - कोविड-19 च्या संकटातून सावरत भारत आता स्वयंसिद्ध होण्याकडे आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याने रोजगार आणि सक्षमतेच्या मुद्दयांवर कष्टकरी म्हणजेच ज्यांना आपण ब्ल्यू कॉलर कामगार म्हणून ओळखतो त्यांना येणाऱ्या आव्हानांवर तात्काळ उपाय शोधणे आवश्यक आहेही दरी भरून काढण्यासाठी गुडवर्कर या डिजिटल जॉब मॅचिंग व्यासपीठाने सोनू सूद आणि स्कूलनेट या आघाडीच्या शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण प्रदातांसोबत सहकार्य करत रुपये  250  कोटींची (~US$ 34M) प्राथमिक गुंतवणूक करून हा संयुक्त उपक्रम सुरू केला आहे.

कौशल्य विकास सेवांसोबतच आर्थिकवैद्यकीय आणि सामाजिक सुरक्षा सेवा पुरवून उत्तम नोकऱ्या आणि करिअर पुढे नेण्यास साह्यकारी अशा सेवा देऊ करत 10 कोटी भारतीयांपर्यंत पोहोचण्याचा या तंत्रज्ञान व्यासपीठाचा मानस आहेया उपक्रमामुळे रोजगार प्रदात्यांनाही प्रामाणिक कष्टकरी कामगारांची नेमणुक करणे आणि त्यांना कायम कामावर ठेवणे शक्य होणार आहेत्यामुळे उत्पादकता वाढेलनफ्यात वृद्धी होईल आणि कार्यचलन शाश्वत होईल.

टेमासेकसिंगापुर गुंतवणूक कंपनीने स्थापन केलेल्या अफिनिडी ने उभारलेले हे विकेंद्रीत तंत्रज्ञान व्यासपीठ आहे आणि यातून कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना डिजिटल ओळख आणि पडताळून पाहता येण्याजोगे क्रेडेंशिअल्स पुरवले जातीलकामगारांना त्यांच्या माहितीवर नियंत्रण ठेवता येईल आणि रोजगार संधी तसेच आयुष्य सक्षम करणाऱ्या सेवांची उपलब्धता मिळेल.

या जागतिक महासंकटात लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्याविशेषतस्थलांतरित कामगारांनीत्यामुळे नोकऱ्या शोधू पाहणाऱ्यांसाठी सोनू सूद आणि स्कूलनेट यांच्यासोबत जुलै 2020 मध्ये प्रवासी रोजगार ची स्थापना केलीसर्वच भागधारकांकडून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभलासादरीकरणानंतर अवघ्या चार महिन्यांतच या व्यासपीठावर 10 लाखांहून अधिक कामगार आणि हजारो मालकांनी नोंदणी केलीप्रवासी रोजगार ची व्याप्ती आता फक्त जॉब मॅचिंगपुरती मर्यादित राहिली नसून गुडवर्कर च्या भागीदारीतून स्थलांतरितांपर्यंत पोहोचणेशिक्षणकौशल्य आणि तंत्रज्ञान अशा सर्व क्षमता विकसित केल्या जाणार आहेतभारतभरातील स्कूलनेट च्या प्रत्यक्ष नेटवर्कच्या साह्याने मुख्य डिजिटल व्यासपीठासंदर्भात हे धोरण असणार आहेया संयुक्त उपक्रमाद्वारे पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपली उत्पादने सादर केली जातील.

मुंबईतील इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म एकम अडवायजर्स नी सर्व भागीदारांना एकत्र आणून या उपक्रमाच्या धोरणांवर मार्गदर्शन करत आहे.

या भागीदारीची घोषणा करताना गुडवर्कर चे संचालक मंडळ सदस्य प्रद्युम्न अग्रवाल म्हणाले, " गुडवर्कर ने देऊ केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतातील व्यवसायांना योग्य प्रतिभेचा शोध घेत आपले कार्यचलन परिणामकारकरित्या वृद्धिंगत करता येणार आहेत्याचप्रमाणे कामगारांना डिजिटल उत्पादने आणि सेवांच्या माध्यमातून व्यापकता अनुभवताना आपल्या माहितीवरही नियंत्रण ठेवता येणार आहेकोविड-19 च्या संकटात डिजिटल बदलांना वेग आला आहेअशात गुडवर्कर गुंतवणुकीतून भारतातील तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून होणाऱ्या बदलांबद्दलचा आमचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो."

स्कूलनेट चे संचालक मंडळ सदस्य आरसीएम रेड्डी आणि केके अय्यर म्हणाले, " स्कूलनेट ही शिक्षण आणि कौशल्य सेवांमधील आघाडीची कंपनी आपल्या सखोल ज्ञान आणि कार्यचलनच्या इतिहासासह एक कोटींहून अधिक विद्यार्थीतरुण आणि उद्योजकांपर्यंत पोहोचली आहेत्यामुळेच, सक्षम कष्टकरी कामगारांचा समुदाय निर्माण करण्यासाठी ते अगदी योग्य ठरतात."

स्थलांतरित कामगारांसाठी सोनू सूद यांनी केलेले मानवतावादी कार्य अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरलेते म्हणाले, "लाखो तरुणांना अधिक चांगले आयुष्य देणे आणि त्यांच्यासाठी रोजगाराची शाश्वतता देणे हे माझे स्वप्न पूर्ण करण्यात या भागीदारीचा लाभ होईलसामाजिकदृट्या सुयोग्य अशा या तांत्रिक व्यासपीठासोबत भागीदारी करणेहे माझे सुदैव आहेयामुळे प्रवासी रोजगार चे मानवतावादी प्रयत्न संस्थात्मक रूप घेतील आणि त्यांची व्याप्ती वाढेल."

आर्थिक प्रगतीरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासाला साह्य करणे या सरकारच्या उपक्रमालाही या भागीदारीतून साह्य होणार आहे.


Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight

Racks & Rollers..