फिनोलेक्सने आपली उत्पादन यादी केली वृद्धिंगत

सादर करत आहेत अँटी बॅक्टेरिया सीलिंग फॅन



मुंबई, 26 नोव्हेंबर 2020: आपल्या उत्पादनांमध्ये वृद्धी करत फिनोलेक्स केबल्सने आपल्या उत्पादनांमध्ये अँटी बॅक्टेरिया पंखे सादर केले आहेत. या पंख्यांवर सुक्ष्मजैविक वाढीविरोधात संपूर्ण संरक्षण देणाऱ्या कमी टॉक्सिसिटी बायोसाइड्सचा समावेश असलेल्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. सुक्ष्मजीव पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यास हा घटक त्यांना निष्क्रिय करतो वा मारतो. याआधी सादर केलेल्या अँटी-डस्ट फॅन्ससोबतच आता कंपनीने हे पंखे सादर केले आहेत.

दोन उन्हाळ्यांपूर्वी फिनोलेक्सने पंख्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी यशस्वीरित्या सीलिंग, टेबल, वॉल, इंडस्ट्रीअल हेवी ड्युटी एक्झॉस्ट आणि मल्टि पर्पझ फॅन्सची खास श्रेणी सादर करत या काळात आपला पंख्यांचा व्यवसाय लक्षणीय प्रमाणात कंपनीने वाढवला. या रेंजमध्ये 'प्रिमिअम', 'डेकोरेटिव्ह' आणि 'स्मार्ट' पंखे आहेत. हे पंखे त्यांची विश्वासार्हता, आकर्षक हवा तसेच रूंद टोकाची पाती, धुळविरहित वैशिष्ट्ये आणि इतर नाविन्यपूर्ण डिझाइन वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात.

आपल्या उत्पादन यादीत अँटी-बॅक्टेरिया पंखे सादर करण्यासंदर्भात फिनोलेक्स केबल्स लि. चे कार्यकारी अध्यक्ष दीपक के. छाब्रिया म्हणाले, "ग्राहककेंद्री कंपनी म्हणून फिनोलेक्स ग्राहकांमधील ट्रेंडचा अभ्यास करते, ते समजून घेते. आमच्या या अभ्यासातून आमच्या लक्षात आले की ग्राहकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबद्दलची जागरुकता आणि भर वाढतो आहे. त्यानुसारच आम्ही अँटी डस्ट, अँटी बॅक्टेरिया तंत्रज्ञान असलेले पंखे सादर करून ग्राहकांना धोकादायक जीवाणू आणि जंतूंपासून संरक्षण देत आहोत. यामुळे सीलिंग फॅनमधील गैरसोयही टाळली जाते आणि ग्राहकांसाठी हा खऱ्या अर्थाने अजिबात कटकट नसलेला पंखा ठरतो."

गेल्या काही महिन्यांपासून फिनोलेक्सने सातत्याने सादर केलेल्या नव्या उत्पादनांमध्ये आता या नव्या युगातील पंख्यांची भर पडली आहे. याआधी त्यांनी समकालीन स्वरूप लक्षात घेऊन तयार केलेल्या अनेक अॅक्सेसरीजही सादर केल्या आहेत, जसे की डोअर बेल, एक्सटेंशन बॉक्स, स्पाइक गार्ड, अँगल/बॅटन होल्डर्स, एलईडी-पीसी पॅनल्स, स्ट्रिप्स, कॅबिनेट लाईट्स. त्यानंतर त्यांनी विविध पोल कन्फिगरेशनमध्ये 63 - 800 Amp मध्ये एमसीसीबीही सादर केले.

अँटी-बॅक्टेरिया पंख्यांची गरज विषद करताना फिनोलेक्स केबल्स लि.च्या सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित माथूर म्हणाले, "गेल्या सहा महिन्यात आम्ही आमच्या पंख्यांच्या व्यवसायासाठी दमदार वितरण जाळे तयार केले आहे. 350 हून अधिक खास वितरक नेमल्याने या आर्थिक वर्षात आम्ही विक्रीमध्ये प्रचंड वाढ अनुभवली. यामुळे देशातील आमचे अस्तित्व वृद्धिंगत झाले आहे आणि त्यामुळे ग्राहकांना आमचे पंखे आणि इतर उत्पादने अगदी नजिकच्या इलेक्ट्रिकल दुकानांमधून खरेदी करणे शक्य झाले आहे."

अमित पुढे म्हणाले, "उन्हाळ्याच्या मोसमाची तयारी म्हणून आम्ही टेबल, वॉल, पेडस्टल्स आणि सीलिंग फॅन्सच्या रेंजमध्ये वेगळ्या डिझाइन आणि रंगांसह नवे प्रकार सादर करणार आहोत. विविध विभागाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही एलईडी फॅन्स, ड्युअल टोन इलेक्ट्रोप्लेटेड फॅन्स, मॉड्युलर एक्झॉस्ट फॅन्स आणि हेवी ड्युटी इंडस्ट्रीयल फॅन्समध्ये नवी रेंज सादर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मुलांचे आरोग्य आणि स्वच्छता यासंदर्भात पालकांची संवेदनशीलता लक्षात घेऊन आम्ही मुलांच्या विभागातही अँटी-बॅक्टेरिया फॅन रेंज सादर करणार आहोत."

फिनोलेक्स केबल्सने सातत्याने आपल्या इलेक्ट्रिकल वस्तूंचा विभाग वृद्धिंगत केला आहे. यात इलेक्ट्रिक वॉटर हीटर्स, फॅन्स, मिनिएचर सर्किट ब्रेकर्स (एमसीबी), स्विचेस आणि लायटिंग उत्पादनांचा समावेश होता.

फिनोलेक्सला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल अमित म्हणाले, "आम्ही दिल्लीत इलेक्रामामध्ये आयओटी समर्थित स्मार्ट फॅन्स आणि एलईडीमधील आगामी उत्पादनांची संपूर्ण रेंज सादर केली होती. आमचे पंखे या प्रदर्शनात एक आकर्षणकेंद्र ठरले. कारण, या क्षेत्रातील भागधारकांना आम्ही सादर केलेल्या अभूतपूर्व वैशिष्ट्यांबद्दल उत्सुकता होती. बाजारपेठेतून आम्हाला मिळालेला प्रतिसाद फारच प्रोत्साहनपर होता."

ही ग्राहककेंद्री रेंज अशाच प्रकारे वाढवण्यावर कंपनीचा भर असणार आहे आणि एक परिपूर्ण इलेक्ट्रिकल उत्पादन कंपनी आणि दमदार बी2सी कंपनी बनण्यासाठी ते आपल्या ब्रँड इक्विटीचा पुरेपूर वापर करणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार