-----------वेब सीरिज ‘नक्षलबारी’ लवकरच होणार प्रदर्शित---------------------------------------------------------------------------------

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जिसिम्स’ची निर्मिती असलेली बहुप्रतीक्षित वेब सीरिज ‘नक्षलबारी’ लवकरच होणार प्रदर्शित

कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान गोवा येथे चित्रीत झालेल्या या वेब सीरिजच्या माध्यमातून हिंदी मालिका निर्मितीमध्ये ‘जीसिम्स’चा प्रवेश

‘कोविड-१९’रोगसाथीच्या आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग हे स्तिमित झालेले असताना अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जिसिम्स’ने मनोरंजन क्षेत्रातील निर्मितीसाठी एक वेगळा मार्ग धुंडाळला आणि आपल्या वेब सिरीजचे गोवा येथे चित्रीकरण पूर्ण केले.‘नक्षलबारी’ या बहुप्रतीक्षित आणि लवकरच येऊ घातलेल्या वेब सिरीजची निर्मितीमागील कथाही अनोखी आहे. निर्माते आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आता कशाप्रकारे हिंदी वेब सिरीजच्या क्षेत्रात उडी घेत आहेत त्याचीसुद्धा ही एक आगळी कहाणी आहे.

निर्मात्यांनी या वेब सिरीजचा  एकटीझर नुकताच प्रकाशित केला त्यावरुन या वेब सिरीजच्या कथेची आणि एकूण हाताळणीचा अंदाज प्रेक्षकांना येतो.‘नक्षलबारी’ ही जंगलात राहणाऱ्या लोकांची त्यांच्या हक्कांसाठीची एक चळवळ असून व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला तो एक लढा आहे. ही वेब सिरीज या चळवळीचा आणि लढ्याचा जवळजवळ प्रत्येक कंगोरा समोर आणते.त्यात मग आदिवासी आणि या गावकऱ्यांची त्यांच्या हक्कांपासून होणारी कुचंबना, ज्या नैसर्गिक संपत्तीवर त्यांचा अधिकार आहे त्यापासून त्यांना वंचित ठेवले जाणे किंवा राजकारणी व उद्योजक यांच्याकडून त्यांच्या हक्काच्या गोष्टींमधील  मलिदा उकळला जाणे या सर्व बाबी या मालिकेत येतात. या ट्रेलरमधून ही कथा नेमकी काय आहे, याबद्दलचा ढोबळ अंदाज बांधता येतो आणि त्यामुळे त्यातून प्रेक्षकांची प्रतिक्षा आणखीन ताणली जाते.

‘नक्षलबारी’ ही ‘जीसिम्स’ची पहिली वेबसिरीज असून लवकरच ती ‘झी5’वर प्रदर्शित होणार आहे.‘जीसीम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट अंड मीडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)ही भारतीय मनोरंजन क्षेत्राच्या प्रत्येक घटकामध्ये कार्यरत आहे. त्यात चित्रपट, टेलिव्हिजन, वेबसीरिज, निर्मिती, टॅलेंट व्यवस्थापन आणि सॅटेलाइटसमूहन यांचा समावेश होतो.आता कंपनीने नव्या जमान्याच्या विषयांच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला आहे. ‘समांतर’ या आपल्या सुपरहिट मराठी वेब सिरीजनंतर कंपनीने लॉकडाउनच्या काळातच ‘नक्सलबारी’ या नवीन हिंदी वेब सिरीजची निर्मिती केली आहे.ही मालिका आता ‘ओटीटी’ व्यासपीठावर प्रदर्शित होण्यास सज्ज झाली आहे.

मालिका सध्या चर्चेत आहे ती तिचा विषय वेगळा आहे म्हणूनही आणि त्याशिवाय निर्मात्यांनी कोरोना साथरोगाच्या काळातील लॉकडाऊनमध्ये ती पूर्ण करण्यासाठी जे विशेष प्रयत्न केले त्यासाठीसुद्धा. ‘जीसिम्स’बद्दल सुद्धा मनोरंजन विश्वात चर्चा सुरू आहे कारण ‘नक्षलबारी’चे चित्रीकरण अगदी कोरोना साथरोगाच्या काळातही गोवा येथे सुरु करणारी ती पहिली कंपनी होती. ‘एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा’च्या मदतीने कंपनीने या मालिकेची निर्मिती पूर्ण केली. या मालिकेमध्ये असलेले आघाडीचे कलाकार आणि या मालिकेचे दिग्दर्शक यांच्यामुळेसुद्धा या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रतीक्षा लागून राहिली आहे.

नक्षलबारीचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक पार्थ मित्रा यांनी केले असून या मालिकेत राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद,आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पार्थो मित्रा हे भारतातील एक आघाडीचे दिग्दर्शक असून त्यांनी हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन आणि डिजिटल क्षेत्रामध्ये गाजलेल्या मालिका व चित्रपट दिले आहेत. बडे अच्छे लगते है, कसम से आणि इतना करो ना मुझे प्यार यालोकप्रिय भारतीय सोप ऑपेरांचे दिग्दर्शन या प्रतिभावान दिग्दर्शकाने केले आहे.‘कोई आप सा’ हा हिंदी चित्रपट आणि ‘हम’ ही वेबसिरीजसुद्धा त्यांनी दिग्दर्शित केली होती.

जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणतात, “आम्ही मनोरंजन क्षेत्रात ज्या ज्या विभागामध्ये निर्मिती केली ती दर्जेदार असेल यावर आमचा कटाक्ष राहिला आहे.कोविड-१९ या साथरोग प्रसाराच्या सुरुवातीलाच आमची ‘समांतर’ ही वेबसिरीज सुरु होती आणि प्रेक्षकांकडून तिला भरघोस प्रतिसाद लाभला. या मालिकेचा दुसरा भाग ‘समांतर- भाग २’चे दिग्दर्शन प्रख्यात मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी केले असून ही मालिका लवकरच प्रदर्शित होत आहे. वेब सिरीज क्षेत्रातील आमच्या प्रवेशाला भरघोस प्रतिसाद लाभत असला तरी मराठी चित्रपटांची निर्मिती सुरूच ठेवली आहे. लवकरच आम्ही ‘जीसिम्स’तर्फे एकदम वेगळ्या विषयाला हात घालत असून त्यातून ‘बळी-व्हिक्टीम’ या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.त्याचे दिग्दर्शन विशाल फुरिया करत असून त्यात आघाडीचा मराठी अभिनेता स्वप्निल जोशी प्रमुख भूमिकेत आहे.

जीसिम्सला नेहमीच सर्वोत्तम अशा विषय आणि कथांची आस राहिली आहेआणि त्याद्वारे उभरती प्रतिभा समोर आणावी असा प्रयत्न कंपनीने ‘रायटर्स झोन’ या आपल्या संकल्पनेतून केला आहे.‘रायटर्स झोन’ हे व्यासपीठ नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी असून त्याद्वारे त्यांना वेगळी संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.“आम्ही चित्रपट आणि मालिकांच्या क्षेत्रात विविध विभागांमध्ये कथा तयार ठेवल्या असून त्यांची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे,” असे उद्गार अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार