स्थानिकांच्या मदतीने अक्सा बीच स्वच्छ करण्यासाठी दिरिसॉर्टचे कर्मचारी बनले पर्यावरण योद्धे

मुंबई, २७ जानेवारी २०२१: प्रजासत्ताक दिनाच्या एका दिवसानंतर मुंबईचा अत्यंत सुंदर अक्सा बीच अधिक सुंदर, देखणा आणि स्वच्छ झाला. दि रिसॉर्ट, मुंबईचे कर्मचारी आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक रहिवाशांनी एक मोठी स्वच्छता मोहीम हाती घेतल्यामुळे हे शक्य झाले.

मागील काही वर्षांपासून दि रिसॉर्टकडून वार्षिक पातळीवर स्थानिकांच्या मदतीने स्वच्छता उपक्रम हाती घेतले जातात आणि बीचवर जाणाऱ्या लोकांमध्ये कचरा टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी जागरूकता निर्माण केली जाते. अक्सा बीच हा अरबी समुद्रालगत असलेला मुंबईतील सर्वांत सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हे पर्यटकांच्या आवडीचे स्थान आहे कारण त्याचे सौंदर्य आणि परिसर यांचा आनंद घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते.

एका दिवसात दि रिसॉर्टचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सुमारे १२० टन प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा केला. त्यानंतर गोळा केलेला कचरा महापालिकेने ट्रकमधून नेला आणि योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात आली. गोळा केलेल्या बऱ्याचशा कचऱ्यात प्लास्टिक बाटल्या आणि कॅन्स होते. ते जैव विघटनशील नाहीत आणि त्यामुळे पक्षी, प्राणी तसेच समुद्री जीवनाला मोठा धोका निर्माण होतो. प्लास्टिकच्या जीवघेण्या पकडीत पक्षी आणि प्राणी अडकण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा सागरी कचरा समुद्री वातावरणासाठी धोकादायक आहे.

दि रिसॉर्टने हा क्लीन अप उपक्रम बीचचे सौंदर्य राखण्याच्या आपल्या जबाबदारीचा भाग म्हणून हाती घेतला होता. त्यांची मालमत्ता अक्साजवळ स्थित असल्यामुळे या बीचमुळे त्यांच्या हॉटेलचे सौंदर्य वाढते. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) बीचची नियमित मेकॅनिकल स्वच्छता करते. परंतु मनुष्यनिर्मित कचरा व अस्वच्छता बीचचे सौंदर्य आणि शुद्धता बिघडवण्यातील प्रमुख गुन्हेगार आहेत.

दि रिसॉर्ट मुंबईचे महाव्यवस्थापक सत्यजीत कोतवाल म्हणाले की, आपल्याला विशेषतः सणांच्या काळात तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करत असल्यामुळे बीचवर प्रचंड कचरा झालेला दिसतो. परिसर सुंदर असतानाही हे दृश्य सौंदर्य हिरावून घेते. कचरा आणि अस्वच्छतेमुळे समुद्राचे सौंदर्य बिघडते आणि समुद्री जीवन तसेच जमिनीवरील प्राण्यांसाठी पर्यावरणाचे धोके निर्माण करते. नागरिक म्हणून समुद्रकिनाऱ्यांची नीट देखभाल घेऊन ते सुंदर ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आम्हाला आशा आहे की, या प्रयत्नांत जास्तीत-जास्त लोक सहभागी होतील आणि आम्ही त्यांच्या सहभागाने बीचची उत्तम देखभाल करू शकू.”

दि रिसॉर्टची टीम आणि स्थानिक नागरिक बीचवरील कचरा काढत असताना समोरून जाणाऱ्या अनेकांनी त्यांना पाहिले आणि त्यांनी या मोहिमेत भाग घेण्यास स्वारस्य दाखवले.

दि रिसॉर्ट अक्सा बीचजवळच्या अत्यंत सुंदर स्थानासाठी ओळखला जातो आणि शहरात राहूनच शहराच्या धावपळीपासून दूर असल्याची जाणीव करून देण्यासाठी अनेक लोक त्याला पसंती देतात.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..