प्रेक्षकांची लाडकी मालिका 'डॉक्टर डॉन'ने गाठला २०० भागांचा टप्पा

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे नुकतंच या मालिकेने २०० भागांचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने हा यशस्वी माईलस्टोन गाठला असं मालिकेचा प्रमुख अभिनेता देवदत्त नागे याचं म्हणणं आहे. सेटवर केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.
या आनंदाच्या क्षणी देवा म्हणजे अभिनेता देवदत्त नागे म्हणाला, "डॉक्टर डॉन या मालिकेला जवळपास १ वर्ष पूर्ण झालंय आणि मालिकेने २०० भागांचा टप्पा देखील गाठला. हे सगळं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमचे आणि प्रेक्षकांचे मी खूप खूप आभार मानतो. प्रेक्षक वेळात वेळ काढून आम्हाला रोज टीव्ही स्क्रीनवर बघतात आणि आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही कलाकार टीव्हीवर दिसतो पण प्रत्येक भाग तुमच्यासमोर सादर करण्यासाठी पडद्यामागे खूप मोठी टीम कार्यरत आहे या संपूर्ण टीमचे देखील मी अभिनंदन करतो. प्रेक्षक या पुढेही आमच्यावर असाच प्रेम करत राहतील याची मला खात्री आहे."  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable