अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आज होणार 'पिकासो'चे जागतिक प्रीमियर!

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आता सेवेवर आपली पहिली मराठी डायरेक्ट-टू-सर्व्हिस ऑफरिंग स्ट्रीम करीत आहे

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या पहिल्या मराठी डायरेक्ट टू सर्व्हिस ऑफर ‘पिकासो’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमिअर जाहीर केला आणि तेव्हापासूनच प्रेक्षक या चित्रपटाच्या माध्यमातून 'दशावतार' कलाप्रकार अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत. १० व्या जागरण फिल्म फेस्टिव्हलसह विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित केलेला 'पिकासो' आता जगातील २४० पेक्षा जास्त देशांमध्ये आणि प्रांतांमध्ये पाहिला जाऊ शकतो.
प्रेक्षकांना सांगण्याची आवश्यकता असलेल्या कथांचा मार्ग मोकळा करून, पिकासो 'दशावतार' या कलेवर आधारित आपल्या कथेसह एक बेंचमार्क सेट करेल यात शंका नाही. मुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने लढणाऱ्या बापाची भूमिका साकारणारे प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम अभिनयाचा कस दाखवणारे कलाकार आपल्या अभिनयातून ही कथा कशी  मांडतात हे पाहायला मिळणे म्हणजे पर्वणीच आहे
चित्रपटातून प्रेरणा मिळावी यासाठी पिकासो हे प्रत्येकासाठी आणि विशेषत: विविध क्षेत्रातील सर्व कलाकारांनी अवलोकन करण्यासाठी एकदा तरी हा चित्रपट पाहायला हवा.. प्लाटून वन फिल्म्स अँड एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली शिलादित्य बोरा निर्मित, पिकासोचे  दिग्दर्शन आणि लेखन अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे.
अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर लॉग इन करून 'पिकासो' चा आनंद घ्या!

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

BlueStone Jewellery & Lifestyle IPO

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025