डॉक्टर डॉन मध्ये देवा भाईची 'री-एंट्री'

विक्रांत आणि मोनिकाचा साखरपुडा होणार का?
देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झालं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणून अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
या मालिकेत कॉलेजचा नवीन डीन डॉक्टर विक्रांत म्हणजेच अभिनेता सागर कारंडेची एंट्री झाल्यापासून मालिकेने वेगळंच वळण घेतलं आहे. विक्रांतने मोनिकाला आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली. देवा मोनिकापासून दूर असला तरी पण मोनिका देवाचं प्रेम विसरून विक्रांतचं प्रेम स्वीकारण्यासाठी तयार नाही आहे. मोनिकाच्या आईने तिला ७ दिवसांची दिलेली मुदत संपली आणि ठरल्या प्रमाणे तिने मोनिकाचा हात विक्रांतच्या हातात द्यायचं ठरवलं. या ७ दिवसात कबीर आणि देवाची गॅंग देवाला शोधण्याचा खूप प्रयत्न करतात पण देवाचा काहीच पत्ता लागत नाही. आता विक्रांत आणि मोनिकाचा साखरपुडा होणार इतक्यात देवा तिकडे हजर होतो. अशा मौक्यावर मालिकेत देवाची री-एंट्री झाली आहे. त्यामुळे आता देवाला पाहून मोनिकाचा निर्णय बदलणार का? विक्रांत आणि मोनिकाचा साखरपुडा संपन्न होणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार