अनुपम खेर यांच्या पुतणीचं लग्न, आई दुलारीनं उघड केलं सिकंदरच्या बालपणीचं रहस्य

31 डिसेंबर, 2021: अनुपम खेर यांनी नुकतेच सोशल मिडीयावर आपली भाची वृंदाच्या लग्नाचे फोटो आणि व्हीडिओज शेअर केले आहेत. यासोबतच खेर यांनी आपली आई आणि मुलाचे व्हीडिओही टाकले आहेत. यात त्यांच्या आई दुलारी नातवाच्या बालपणीच्या गोष्टी शेअर करत आहेत. 

बॉलिवुडमधले ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर कायमच सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. ते सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी चाहत्यांशी मोकळेपणाने शेअर करत असतात. वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टींसोबतच ते सामाजिक राजकीय मुद्द्यांवरही भाष्य करत असतात. सध्या खेर पुतणी वृंदाच्या लग्नात गुंतलेले आहेत. वृंदा राजू खेर यांची मुलगी आहे. खेर यांनी या सोहळ्याचे अनेक व्हीडिओ शेअर केलेत. त्यातलाच एक गंमतीदार व्हीडिओ अनेकांना आवडतो आहे.  

खेर यांनी 'कू'च्या ऑफिशियल अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात त्यांची आई सिकंदरला म्हणते आहे, की केस रंगवून घे जेणेकरून तू म्हातारा दिसणार नाहीस. सोबतच ती जमलेल्या लोकांना सांगते आहे, की लहानपणी सिकंदरचं वजन खूप जास्त होते. कारण तो भूक नसतानाही खात रहायचा. अगदी एका वेळी 10 अंडीही तो फस्त करायचा. ही गोष्ट ऐकताच सगळे लोक हसायला लागतात आणि सिकंदरची मनसोक्त मजाही घेतात.

यापूर्वीही वृंदाच्या लग्नाचे अनेक व्हीडिओ समोर आले आहेत मात्र एक व्हीडिओ नेटकऱ्यांना जास्तच आवडतो आहे. हा व्हीडिओ पोस्ट करताना खेर यांनी लिहीलं आहे, 'कळालंच नाही, वृंदा इतकी मोठी कधी झाली... म्हटलं जातं, की मुली लग्नानंतर परक्या होऊन जातात मात्र आम्ही मानतो की तिचं केवळ घर शिफ्ट झालं आहे. मुंबईहून दिल्लीला. आता तिची दोन कुटुंबं आहेत. तिचं सुखदु:ख वाटून घेणारे आता खूप लोक असतील. आनंदी रहा! खूप आशिर्वाद!'

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K