किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड

केएफआयएलने व्‍यवसायातील उत्‍कृष्‍टतेसाठी पटकावला सीआयआय-एक्झिम बँक पुरस्‍कार

पुणे, भारतनोव्‍हेंबर २०२१: किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड (केएफआयएल)(बीएसई५००२४५या भारतातील सर्वांत मोठ्या कास्टिंग आणि पिग आयर्न उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने २०२१ मधील व्यवसायामधील उत्कृष्टतेसाठी प्रतिष्ठेचा सीआयआय-एक्झिम बँक पुरस्कार प्राप्त केला आहे२६ नोव्हेंबर २०२१ रोजीहॉटेल ताज यशवंतपुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका चमकदार पुरस्कार सोहळ्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी अधिकारी श्रीआरव्हीगुमास्ते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

केएफआयएलचा बिझनेस एक्सलन्स अर्थात व्यवसायातील उत्कृष्टतेचा प्रवास किर्लोस्कर समूहातील टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या संकल्पनेसहकिर्लोस्कर समूहात दिल्या जाणाऱ्या रवि किर्लोस्कर क्वालिटी प्राइझ स्पर्धेच्या स्वरूपात सुरू झालासंपूर्ण किर्लोस्कर समूहात क्वालिटी मुव्हमेंटचा पाया घालणारे दिवंगत श्रीरवी किर्लोस्कर यांच्या स्मरणार्थ १९८४ मध्ये ही स्पर्धा सुरू करण्यात आलीसमूहातील कंपन्यांना उत्पादनेप्रणालीप्रक्रिया आणि एकंदर व्यवसायातील कामगिरीचा दर्जा सुधारून तो एका लक्षणीय स्तरावर नेण्यामध्ये या स्पर्धेची मदत झालीया स्पर्धेने समूहातील कंपन्यांना बिझनेस एक्सलन्स ही संकल्पना स्वीकारण्यासाठी सज्ज केले.

किर्लोस्कर समूहात २००० मध्ये सीआयआय एक्झिम बँक/ईएफक्यूएम मॉडेल आणले गेलेकेएफआयएलने २००९-१० पासून सीआयआय एक्झिम मूल्यमापनात सहभाग घेण्यास सुरुवात केलीकेएफआयएल वर्षागणिक कामगिरीमध्ये सातत्याने प्रगती करत राहिले  यावर्षी या पुरस्काराला आव्हान देत कंपनीने तो प्राप्तही केला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

World & Olympic Champion Beatrice Chebet to headline Inaugural SFC Global 10K