इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) ऑक्टोवर 2022 ला खुली होणार, प्रति समभाग किंमत पट्टा Rs. 56 ते Rs. 59 च्या दरम्यान

·        Rs..10 दर्शनी मुल्याचे समभाग Rs... 56 – Rs.. 59 प्रति समभाग किंमत पट्ट्यात.

·        बोली/प्रस्ताव खुला होण्याची तारीख  – मंगळवार, 04 ऑक्टोबर, 2022 आणि बोली/प्रस्ताव समाप्तीची तारीख – शुक्रवार, 07 ऑक्टोबर, 2022.

·        कमीतकमी 254 समभागांसाठी बोली लावता येणार आणि त्यानंतर 254 च्या पटीत.

·        समभागाची किंमत दर्शनी मुल्याच्या 5.6 पट and तर कमाल किंमत दर्शनी मुल्याच्या 5.9 पट.

Risks to Investors:

• The Issue Price, market capitalization to revenue from operations multiple and price to earnings ratio based on the Issue Price of our Company may not be indicative of the market price of the Company on listing or thereafter.

Particulars

Fiscal 2022

Revenue from operations

Rs.4349.32 crore

Profit after tax

Rs.103.89 crore

Market capitalization to revenue from operations at the upper end of the Price Band (number of times)

0.52

Price to Earnings Ratio (based on diluted EPS as of March 31,2022) at the upper end of the Price Band (number of times)

17.05

• The weighted average cost of acquisition of all Equity Shares transacted in the three years and one year preceding the date of the Red Herring Prospectus is as follows:

Period

Weighted Average Cost of Acquisition (in Rs.)*

Cap Price (Rs. 59)  is ‘X' times the Weighted Average Cost of Acquisition*

Range of acquisition price: lowest price -highest price (in  Rs.)*

Last three years  preceding the date of the Red Herring Prospectus

Nil

Nil

Nil

Last one year preceding the date of the Red Herring Prospectus

Nil

Nil

Nil

*As certified by Komandoor & Co LLP Chartered Accountants, by way of their certificate dated September 27, 2022.

• Average cost of acquisition of Equity Shares held by the Promoters is Rs. 10 per Equity Share and Issue Price at the upper end of the Price Band is Rs. 59 per Equity Share.

• The three BRLMs associated with the Issue have handled 53 public issues in the past three years, out of which 16 issues closed below the offer price on the listing date.

मुंबईसप्टेंबर 28 2022: हैदराबाद स्थित ग्राहकोपयोगी वस्तुंची रिटेल दालनांची साखळी चालवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडने (कंपनी/इएमआयएल) आपल्या पहिल्या सार्वजनिक समभाग विक्रिसाठी Rs..56 ते 59 च्या किंमत पट्ट्यात प्रति समभाग किंमत निश्चित केली आहे. कंपनीची सदर प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) गुरवार, 4 ऑक्टोबर, 2022 रोजी विक्रिसाठी खूली होणार आहे आणि शुक्रवार ७ ऑक्टोबर, 2022 रोजी समाप्त होणार आहे. गुंतवणूकदार कमीतकमी 254 समभाग आणि त्यानंतर 254 समभागांच्या पटीत बोली लावू शकतील.

एकूण Rs. 500 crore किमतीचे समभाग यात विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत ज्यात ऑफर फॉर सेल हिश्शाचा समावेश नाही.

इएमआयएल ही भारतातील चौथ्या क्रमाकांची आणि सर्वात वेगाने वाढणारी ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्सची रिटेलर असून कंपनीचा व्यवसाय 1.12 दशलक्ष चौरस फूटावर फोफावलेला आहे. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीची 36 शहरात/शहरी भागात 112 दालने आहेत ज्यातील 100  दालने ही मल्टी ब्रॅंड आऊटलेट्स (एमबीओ) आहेत आणि 12 ही एक्सक्ल्युसिव्ह ब्रॅंड आउटलेट्स (ईबीओ) आहेत. कंपनी बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा मध्ये 89 मल्टी ब्रॅंड आऊटलेट्स (एमबीओ), इलेक्ट्रॉनिक्स मार्ट या नावाने एनसीआर मध्ये 8 मल्टी ब्रॅंड आऊटलेट्स (एमबीओ) चालवते आणि  स्वयंपाकगृहाशी संबंधित गरजा भागवणारी दोन विशेष श्रेणीतील दालने किटन स्टोरिज या नावाने चालवते आणि उच्च दर्जाच्या होम ऑडिओ आणि होम ऑटोमेशन सोल्यूशन्ससाठी ऑडिओ ऍंड बियॉंड या नावाने विशेष दालन चालवते.

सध्या इएमआयएलचे दक्षिण भारतात वर्चस्व आहे. आयपीओतून प्राप्त निधीतून कंपनीचे सध्या विस्तार असलेल्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या भागात आपले जाळे आणखी मजबूत कRs.न बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्याचे ध्येय आहे. त्याबरोबरच 26 मल्टी ब्रॅंड आउटलेट्स (एमबीओ) चालू कRs.न एनसीआर भागात आपला विस्तार करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

70 पेक्षा अधिक ग्राहकोपयोगी आणि इलेट्रॉनिक्स ब्रॅंड्सच्या विविध उत्पादन श्रेणीतील 6000 वस्तू (एसकेयू) इएमआयएल आपल्या दालनात विक्रिसाठी ठेवते. रिटेल, व्होलसेल आणि इ-कॉमर्स अशा तीन प्रकारात कंपनी कार्यरत आहे.

वित्त वर्ष 2022 मध्ये रिटेल विक्रीत 35.03% वाढ नोंदवली गेल्याने गेल्या वर्षीच्या याच काळातील Rs. 3,201.88 crore च्या तुलनेत वित्तवर्ष 2022 मध्ये कंपनीच्या महसुलात 35.84% वाढ होऊन तो Rs 4,349.32 crore पोहचला ज्या मागे वित्स वर्ष 2022 मध्ये घाऊक विक्रीत झालेली वाढ कारणीभूत होती. करोत्तर नफ्याबाबत वित्त वर्ष 2021 मधील Rs. 58.62 crore तुलनेत वित्त वर्ष 2022 मध्ये त्यात 77.22%  वाढ होऊन तो Rs. 103.89 crore पोहचला.  वित्तवर्ष 2020 ते वित्तवर्ष 2022 दरम्यान कंपनीच्या कार्यातून प्राप्त महसूलात 17.09% सीएजीआर एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे आणि वित्तवर्ष 2021 पर्यंत आपल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत ऑपरेटिंग मार्जिन्स बाबत कंपनी  दुसर्‍या क्रमांकावर होती. 30 जुन, 2022ला समाप्त तिमाहीत कार्यातून प्राप्त उत्पन्न Rs. 1408.45 crore एवढे राहिले आणि करोत्तर नफा Rs. 40.66 crore राहिला.

किंमत पट्ट्यात कोणताही बदल झाल्यास प्रस्ताव/बोलीसाठीचा कालावधी तीन कार्यालयीन दिवसांनी किंमत पट्ट्यात बदल केल्यानंतर वाढवण्यात येईल ज्यात प्रस्ताव/बोलीसाठीचा एकूण कालावधी 10 कार्यालयीन दिवसांपेक्षा जास्त नसेल. कोणती दैवी आपत्तीसंप अथवा तत्सम परिस्थितीत कंपनी बीआरएलएमच्या सल्ल्याने लिखित स्वRs.पात प्रस्ताव/बोलीचा कालावधी तीन कार्यालयीन दिवसांनी वाढवेल ज्यात प्रस्ताव/बोलीचा एकूण कालावधी 10 कार्यालयीन दिवसांपेक्षा जास्त नसेल. किंमत पट्ट्यात कोणताही बदल आणि प्रस्तावात/बोलीत सुधारणा करण्याचा कालावधीजर लागू असेल तर, तर तशी माहिती स्टॉक एक्सचेंजना सुचने द्वारे, प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येईल आणि  तसे बदल सिंडिकेट मेंबर्सच्या टर्मिनल्सवरही दर्शवण्यात येईल आणि नियुक्त मध्यस्थांनाही कळवण्यात येईल.

सदर प्रस्ताव सुधारित सिक्युरिटिज कॉंट्रॅक्ट्स (नियमन) नियम, 1957 (एससीआरआर) च्या 19(2)(बीबरोबरच सिक्युरिटी ऍंड एक्सचेंज बॉर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यू ऑफ कॅपिटल ऍंड डिस्क्लोझर रिक्वायमेंट्स) विनियमन 2018 सुधारित (सेबी आयसीडीआर विनिमय) च्या नियम 31  यांना अनुसRs.न आहे. हा प्रस्ताव सेबी आयसीडीआर विनिमयच्या नियम 6(1) नुसार बुक बिल्डिंग प्रोसेस द्वारा सादर करण्यात येत असून ज्यातील 50% पर्यंत समभाग पात्र संस्थात्मक गुंतवणूक खरेदीदारांना (क्यूआयबी) प्रणाणशीर पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध असतील (क्यूआयबी पोर्शन), परंतू स्वेच्छाधिकारात कंपनी बीआरएलएमशी सल्लामसलतीने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठीच्या हिश्श्यातील 60% हिश्श्याचे सुकाणू गुंतवणूकदारांना वाटप कRs. शकते ज्यातील एक तृतियांश हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखीव असेल जे देशांतर्गत म्युच्युअल फंड्स अथवा वरिल सुकाणू गुंतवणूकदारांकडून सेबी आयसीडीआर विनियमांना अनुसRs.न सुकाणू गुंतवणूकदारांसाठी निर्धारित किमतीला बोली प्राप्त होण्यावर अवलंबून असेल. सुकाणू गुंतवणूकदारांच्या हिश्श्याबाबत निर्धारित किंमतीवर विक्री न झाल्याच्या अथवा वाटप न झाल्याच्या परिस्थितीत बाकी राहिलेले समभाग क्यूआयबी हिश्शात जमा करण्यात येतील. याबरोबरच, एकूण क्युआयबी हिश्श्यातील 5% भाग हा फक्त म्युच्युअल फंड्सना प्रमाणाशीर वाटपासाठी राखीव असतील आणि बाकी क्यूआयबी हिस्सा हा सर्व क्यूआयबी बोलिदारांना (सुकाणू गुंतवणूकदार वगळता) प्रमाणशीर वाटपासाठी राखीव असेल ज्यात म्युच्युअल फंड्स कडून साधारण मागणी जर क्यूआयबी हिश्श्यातील त्यांच्यासाठी राखीव 5% पेक्षा कमी असेल तर सदर हिश्श्यातील बाकी समभाग क्यूआयबी बोलिदारांना प्रमाणशीर वाटपासाठी क्यूआयबी हिश्शात जमा करण्यात येतील. या बरोबरच, 15% पर्यंत वाटप हे प्रमाणशीर पद्धतीने बिगर संस्थात्मक बोलिदारांसाठी (बिगर संस्थात्मक हिस्सा) असेल ज्यातील बिगर संस्थात्मक बोलिदारांसाठीचा एक तृतियांश हिस्सा हा Rs..200,000 ते 1,000,000 या आकारमानात अर्ज दाखल करणाऱ्या बिगर संस्थात्मक बोलिदारांसाठी उपलब्ध असेल तर Rs..1,000,000 पेक्षा जास्त किंमतीत अर्ज करणाऱ्या बिगर संस्थात्मक बोलिदारांसाठी दोन तृतियांश हिस्सा उपलब्ध असेल आणि बिगर संस्थात्मक बोलिदारांच्या दोन्ही प्रकारात अपेक्षित विक्री न झाल्याच्या परिस्थितीत सदर हिस्सा बिगर संस्थात्मक बोलिदारांच्या इतर उपप्रकारात त्यांचे वाटप करण्यात येईल आणि प्रस्तावातील 35% पर्यंत वाटप हे घाऊक वैयक्तिक बोलिदारांसाठी सेबी आयसीडीआर विनियमांनुसार इपलब्ध असेल जे प्रस्तावात नमूद किंमतींवर अथवा त्याहून अधिक किंमतीवर बोली प्राप्त होण्यावर अवलंबून असेल. सर्व बोलिदारांना (सुकाणू गुंतवणूकदार वगळता) अर्ज ब्लॉक्ड अमाऊंट (एएसबीए) पद्धतीने सहभागी होता येईल ज्यात त्यांच्या संबंधित बॅंक खात्यांची माहिती (यूपीआय पद्धतीने सहभागी होणार्‍या बोलिदारांसाठी यूपीआय आयडी) त्यांना द्यावी लागेल ज्यात एससीएसबी अथवा स्पॉन्सर्स बॅंक बोलीची रक्कम ब्लॉक करतील. सुकाणु गुंतवणूकदारांना एएसबीए प्रक्रियेद्वारे सहभागी होता येणार नाही. अधिक माहितीसाठी आरएचपीचे पृष्ठ क्रं.344 पहावे. आनंद राठी अॅडव्हायझर्स लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटिज लिमिटेड आणि जेएम फायनांशियल्स हे बूक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. तर केफिन टेक्नॉलॉजिज हे या प्रस्तावाचे रजिस्ट्रार आहेत. इथे वापरेल्या सर्व अटी आणि इथे नमुद न केलेल्या अटींचा आरएचपी प्रमाणेच अर्थ असेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..