‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटाचे पाच शहरांत दिमाखदार प्रिमियर

‘शिवप्रतापगरुडझेप’ चित्रपटाचे पाच शहरांत दिमाखदार प्रिमियर

‘शिवप्रतापगरुडझेप’ हा डॉ.अमोल कोल्हे यांचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विजयादशमीच्या  मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रतापगरुडझेप’ प्रदर्शित होत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार दाखवणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाआधी या चित्रपटाचे ५ शहरांत विशेष शो आयोजित करण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या भव्यतेप्रमाणेच प्रिमियरची भव्य तयारी करण्यात आलेली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव या पाच महत्त्वाच्या शहरात हे प्रिमियर संपन्न होणार आहेत.

शनिवार १ ऑक्टोबरला नाशिकच्या सिटी सेंटरला सायं ७.०० वा., रविवार २ ऑक्टोबरला सिटीप्राइड कोथरुड, पुणे सायं ७.०० वा., सोमवार ३ ऑक्टोबरला कोल्हापूर आयनॉक्स सायं ७.०० वा., मंगळवार ४ ऑक्टोबरला बेळगाव आयनॉक्स सायं ७.०० वा. तर दसऱ्याला ५ ऑक्टोबरला मुंबईत अंधेरी इन्फिनिटी रात्रौ ८.०० वा. हे दिमाखदार प्रिमियर रंगणार आहे. चित्रपटातील कलाकारांच्या टीमसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या खास शो साठी राहणार आहे.

‘आग्र्याहून सुटका’ हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय ‘शिवप्रतापगरुडझेप’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर,  प्रतीक्षा लोणकरहरक अमोल भारतीयशैलेश दातारहरीश दुधाडेमनवा नाईकपल्लवी वैद्यअजय तपकिरेरमेश रोकडेअलका बडोला कौशलआदी ईराणीविश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.

डॉ.अमोल कोल्हेविलास सावंतसोनाली घनश्याम रावचंद्रशेखर ढवळीकरकार्तिक राजाराम केंढे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

Racks & Rollers..